PM Kusum Solar Yojana 2024:पीएम कुसुम  सौर पंप योजना;सोलार योजनेअंतर्गत सौर पंप मिळवण्याची प्रक्रिया,95 टक्के अनुदान!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शेतकऱ्याच्या शेतात पाण्याची सोय असूनही विजेच्या अभावी शेतात पाणी तसेच  अनेक भागात विज असूनही सतत विजेचा खंडित पुरवठा या समस्येला तोंड देण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना दिवसा शेतीला  पाणी पुरवठा करता यावा यासाठी   केंद्र सरकारने PM Kusum Solar Yojana आणलेली आहे, ही योजना महाऊर्जा कुसुम योजना म्हणून ही ओळखली जाते .
या योजनेअंतर्गत केंद्र व राज्य आर्थिक पुरवठा करून शेतकऱ्यांना सौर पंप पुरवठा करते तर आपण या योजनेचा सविस्तर आढावा घेवू .

किती एचपी चे सौर पंप पुरवले जातात

3 HP सौर पंप

5 HP सौर पंप

7.5 HP सोर पंप

पात्र अर्जदार शेतकऱ्याला अनुदान किती

  • सर्वसाधारण प्रवर्ग 90 टक्के अनुदान.
  • अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग 95 टक्के अनुदान.
               आपली जमीन आपल्या नावावर आहे हे सिद्ध करणारे काही शासकीय पुरावे

कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2024 अंतर्गत अनुदान कसे दिले जाते

3 HP सौर पंप

एकूण बाजार मुल्य -1,93,803.

जर पात्र शेतकरी open Category मधील असेल तर त्याला एकूण 19 हजार 380 रुपये भरावे लागतात

जर पात्र शेतकरी SC/ST category मधील असेल तर त्याला एकूण 9 हजार 690 रुपये भरावे लागतात

5 HP सौर पंप

एकूण बाजार मुल्य -2,69,746

जर पात्र शेतकरी open Category मधील असेल तर त्याला एकूण 26 हजार 975 रुपये भरावे लागतात

जर पात्र शेतकरी SC/ST category मधील असेल तर त्याला एकूण 13 हजार 488 रुपये भरावे लागतात

7.5 HP सौर पंप

एकूण बाजार मुल्य -3,74,402

जर पात्र शेतकरी open Category मधील असेल तर त्याला एकूण 37 हजार 440 रुपये भरावे लागतात

जर पात्र शेतकरी SC/ST category मधील असेल तर त्याला एकूण 18 हजार 720 रुपये भरावे लागतात

सौर पंपासाठी जमिनीची अट

  • 2.5 पेपर पर्यंत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यास तीन एचपी सौर पंप दिला जातो.
  • 2.5 ते पाच एकर पर्यंत पाच एचपी सौर पंप दिला जातो.
  • ५ एकर पेक्षा जास्त असणाऱ्या शेतकऱ्यास 7.5 एचपी सौर पंप दिला जातो.

पात्रतेच्या अटी

या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर खालील पात्रता पूर्ण करणे गरजेचे आहे

  • शेतकऱ्याकडे पूर्वीचे वीज कनेक्शन नसावे.
  • शेतकऱ्याकडे बारा महिने पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असावा यामध्ये उदाहरणार्थ विहीर बोरवेल शेततळे व नदी नाले शेजारील शेतकरी.
  • शेतकऱ्याने यापूर्वी अटल सौर कृषी पंप योजना आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना यापैकी कुठल्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे

  • सातबारा उतारा,
  • उपलब्ध असलेल्या पाण्याचा शाश्वत स्त्रोत म्हणजेच विहीर बोरवेल किंवा शेततळे याची सातबारावर नोंद असणे आवश्यक,
  • आधार कार्ड,
  • जातीचा दाखला,
  • बँक पासबुक झेरॉक्स,
  • पासपोर्ट आकारचा फोटो,
  • सामुदायिक सातबारा असेल तर दोनशे रुपये दोनशे रुपये बॉण्ड वर इतर शेतकऱ्यांचे ना हरकत प्रमाणपत्र.
Read more: PM Kusum Solar Yojana 2024:पीएम कुसुम  सौर पंप योजना;सोलार योजनेअंतर्गत सौर पंप मिळवण्याची प्रक्रिया,95 टक्के अनुदान!

PM कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2024 online नोंदणी कशी करायची ?

Step 1

सर्वात आधी गोकुळ करून ओपन करून त्यावर  mahaurja.com असे सर्च करायचे आहे आणि लगेच तुमच्यासमोर महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण म्हणजेच महाऊर्जाची वेबसाईट ओपन होईल.

Step 2

ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर या वेबसाईटवर उजव्या बाजूला एका रकान्यात तुम्हाला “महाकृषी ऊर्जा अभियान कुसुम सौर कृषी पंप अर्ज नोंदणी ” लिहिलेले दिसेल यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.

Step 3

क्लिक केल्यानंतर लगेच तुमच्या समोर  “महा कृषी ऊर्जा अभियान- प्रधानमंत्री कृषी योजना सूचना “असे दिसेल ती सविस्तर वाचून घ्यायची आहे वाचून झाल्यानंतर खाली असलेला बंद या बटनवर क्लिक करायचे आहे आणि ते बंद होईल.

Step 4

आता एक नवीन विंडो ओपन होईल त्यामध्ये उजवीकडे लागवड या पर्यायावर क्लिक करून आपली लँग्वेज सिलेक्ट करायचे आहे,

त्यानंतर पीएम कुसुम योजना लाभार्थी नोंदणी अर्ज तुमच्यासमोर ओपण होईल.

आपल्या मोबाईल मध्ये शेती विषय लागणारे सर्व कागदपत्रे सहज पाहता व मिळवता येतील कसे

Step 5

यात खालील मुद्दे असतील त्याची माहिती व्यवस्थित भरायची आहे,

सध्या तुम्ही डिजिल पंप वापरतात काय,

अर्जदाराची वैयक्तिक व जमीन विषयक माहिती,

ही माहिती भरल्यानंतर जर तुम्ही भरत असल्यास जिल्ह्यातील कोटा संपला असेल तर आपल्यासमोर

"आपल्या अर्जातील पंप प्रकार आणि जिल्ह्यानुसार कोटा संपला आहे नवीन कोटा प्राप्त झाल्यानंतर आपण अर्ज पूर्ण करू शकता " 

असे नोटिफिकेशन दिसेल तेव्हा सदरील अर्ज पुन्हा कोटा उपलब्ध झाल्यानंतर माहिती भरायचे आहे.

Step 6

जर कोटा उपलब्ध असेल तर असे नोटिफिकेशन दिसणार नाही आणि तुम्ही खाली दिलेल्या  “ऑनलाईन अर्ज साठी भरणा ” या बटन वर क्लिक करायचे आहे,

Step 7

पुढे पंपाचा तपशील आणि तुम्ही निवडलेल्या जिल्ह्यामध्ये कुठल्या प्रवर्गासाठी किती कोटा शिल्लक आहे हे सर्व दिसून येईल,

याखाली तुम्हाला ग्रीन बॉक्स मध्ये “लाभार्थी हिस्सा भरण्याची प्रक्रिया ” असे दिसेल यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.

Step 8,

आणि आपल्या स्क्रीनवर अर्ज करण्याची प्रक्रिया असे नोटिफिकेशन दिसेल त्यामध्ये तुम्हाला ट्रांजेक्शन आयडी दिला जाईल आणि त्याखाली नोंदणी शंभर रुपये सांगितले जाईल,

Step 9

पुढे प्रोसेस केल्यानंतर पेमेंट करण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध होतील यामध्ये सुरुवातीला आपली वैयक्तिक माहिती भरायची आहे आणि त्यानंतर पेमेंट करावयाचा आहे पेमेंट झालेला मेसेज तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसून येईल,

Step 10

यानंतर तुमच्या मोबाईलवर तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड येऊन जाईल आणि तो आला म्हणजे तुमची नोंदणी पूर्ण झाली आहे असे समजून घ्या.

टीप

“सदर नोंद केलेली ही तुमची योजनेसाठी ची प्राथमिक नोंद आहे जेव्हा कोटा  उपलब्ध होईल त्यावेळी शेतकऱ्याला मेसेज द्वारे शासनाकडून कळविण्यात येईल त्यानंतर अजून अर्जदाराचे संपूर्ण माहिती भरणे पंपाचे कोटेशन देणे लाभार्थी करणे पंपाची कंपनी निवडणूक आणि सौर पंपाचे वाटप ही प्रक्रिया पूर्ण होईल.”

महाराष्ट्रात कोटा उपलब्ध असलेली जिल्हे

अमरावती ,चंद्रपूर , गोंदिया , लातूर , पालघर , रायगड , सांगली , सिंधुदुर्ग , वर्धा , यवतमाळ , अकोला , भंडारा , गडचिरोली , कोल्हापूर , नागपूर , पुणे , रत्नागिरी , सातारा , ठाणे , वाशिम .

महाराष्ट्रात  कोटा उपलब्ध नसलेली जिल्हे

सोलापूर,छत्रपती संभाजी नगर, परभणी, अहमदनगर, धाराशिव, बुलढाणा, नाशिक, बीड, नंदुरबार, धुळे, नांदेड, हिंगोली, मुंबई उपनगर, मुंबई, हिंगोली, जालना, जळगाव .

 PM Kusum Helpline Number

पीएम कुसुम सौर पंप योजनेसंबंधी तुम्हाला जर काही अडचणी असतील किंवा काही तक्रार असतील किंवा काही माहिती पाहिजे असेल तर खालील पीएम कुसुम हेल्पलाइन नंबर PM kusum Helpline Number 020-35000450 या नंबर वर संपर्क करून तुम्ही तुमचे प्रश्न सोडवू शकतात

कुसुम सोलर योजनेचे शेतकऱ्यांना होणारे फायदे

  • रात्री अपरात्री  शेतकरी शेतीला पाणी देण्यासाठी जातात त्यावेळेस विविध अपघात घडून येतात उदाहरणार्थ सर्प दंश ,विजेचा झटका ,रानटी प्राण्यांचा हल्ला इत्यादी संकटापासून पूर्णता मुक्ती मिळणार आहे कारण आता शेतकरी दिवसाही आपल्या पाणी देऊ शकते .
  • ग्रामीण भागात सतत विज चे लपंडाव चालू असतो त्यामुळे अनेक वेळा हाताशी आलेले पीक पाण्याअभावी चुकून जाते व शेतकऱ्याचे मोठे नुकसान होते ते आता होणार नाही कारण आपल्याला 24 तास वीज उपलब्ध  होणार आहे .
  • हा सर पंप शेतकऱ्यांची आर्थिक बचत करणार आहे कारण सौर पंप असल्यामुळे कुठलेही विजेचे बिल येणार नाही भरमसाठ येणाऱ्या विजेच्या बिलापासून शेतकऱ्यांना मुक्ती मिळेल .
  • शेतीला येणारे विज बिल भरमसाठ असते ते वाचल्यामुळे शेती शेतकऱ्याची आर्थिक  परिस्थिती सुधारेल आणि देशात शेतकऱ्यांचे चांगले दिवस येतील .

Conclusion

सदरील   लेखामध्ये आपण पीएम कुसुम सोलर पंप योजना विषयी महत्त्वपूर्ण अशी माहिती पाहिली आहे यामध्ये आपण यासाठी असणारे पात्र शेतकरी त्यासाठी अर्ज कसा करायचा त्यासाठी लागणारे कागदपत्रे आणि पात्रतेच्या अटी कुठल्या प्रकारची पंप मिळणार त्यामुळे होणारे शेतकऱ्यांना फायदा आणि कुठल्या जिल्ह्यात उपलब्ध आहे ती जिल्हे .

यावरून योजना शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे असे दृष्टीने ते प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा करून घेतला पाहिजे यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान ठेवून त्याची प्रगती होण्यास मदत होणार आहे ,

लेखा विषयी आपल्याला काही अडचणी असल्या किंवा काही माहिती अधिक सविस्तर पाहिजे असेल तर आपण आमच्या खाली कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करू शकता किंवा आमच्याशी डायरेक्ट संपर्क करू शकता या लेखाचा उद्देश हा शेतकऱ्यांची मदत करणे हा आहे त्यामुळे ही जर माहिती यावा आपल्याला आवडली असेल तर ही गरजू शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा त्यामुळे त्याचा अनेकांना फायदा होईल .

9 thoughts on “PM Kusum Solar Yojana 2024:पीएम कुसुम  सौर पंप योजना;सोलार योजनेअंतर्गत सौर पंप मिळवण्याची प्रक्रिया,95 टक्के अनुदान!”

    • धन्यवाद माहिती आवडली असेल तर आपल्या whatsap ग्रुप वर नक्की शेयर करा

      Reply
    • धन्यवाद माहिती आवडली असेल तर आपल्या whatsap ग्रुप वर नक्की शेयर करा

      Reply

Leave a Comment