Gramvikash gr: ग्रामविकास व पंचायत राज ;विभागाचे महत्त्वाचे निर्णय!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

थेट सरपंच निवडणूक –

• गावाच्या  मतदारांकडून पंचायतीच्या सरपंचपदाची थेट निवडणूक.

• थेट निवडून आलेल्या सरपंचांविरूद्धच्या अविश्वासाच्या प्रस्तावास ग्रामसभेद्वारे आणि शिरगणना करून साध्या बहुमताने अनुसमर्थन देण्याची तरतूद.

डेअरी फार्म व्यवसाय संपूर्ण माहिती  

अध्यक्ष व उपाध्यक्ष

• महाराष्ट्र जिल्हापरिषद व पंचायतसमित्या अधिनियम १९६१ मध्ये सुधारणा करून सन २०२२च्या अधिनियम ४६ अन्वये अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा पदावधी तीन महिन्यांपर्यंत वाढवण्यात निर्णय.

सदस्य संख्या

• महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ मध्ये सुधारणा करून जिल्ह्यातील मतदार विभागांमधून प्रत्यक्ष निवडून आलेल्या ७५ पेक्षा अधिक नसणाऱ्या व ५० पेक्षा कमी नसणाऱ्या सदस्यांचा जिल्हा परिषदेत समावेश करण्याचा निर्णय.

सर्वांसाठी घरे – २०२४

• राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात राहणाऱ्या असणाऱ्या पात्र सर्व लाभार्थ्यांना सन २०२४ पर्यंत स्वतःचे हक्काचे घर.

• पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थसाहाय्य योजनेंतून जागा खरेदी करत असाल तर  प्रधानमंत्री आवास योजना- शहरीच्या धर्तीवर मुद्रांक शुल्काची रक्कम फक्त रुपये १ हजार

• पं दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनें चा जर आपण लाभ घेत असाल तर  आत्ता लाभार्थ्यांना घर बांधतान 2 मजली वरुण  4 मजली घर बांधू शकतो.

• अतिक्रमणे नियमानुकूल करताना महसूल  विभागाच्या तरतुदीप्रमाणे मागासवर्गीय लाभार्थ्यांना विनामूल्य नियमानुकूल करून देण्यातही मान्यता.

हे ही वाचा :पीएम कुसुम  सौर पंप योजना, सोलार योजनेअंतर्गत सौर पंप मिळवण्याची प्रक्रिया, 95 टक्के अनुदान.

Leave a Comment