Pmksk:सुरू झाली नवी योजना;प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 जुलै रोजी राजस्थान येथील शिकोर मधून देशभरात एक लाख 25 हजार प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राचे लोकार्पण केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र(PM Kisan Samriddhi Kendra )सुरू करण्यात आले आहे.

आधुनिक तंत्रज्ञान शेतकरी मार्गदर्शन सर्व खते इत्यादी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी pmkskप्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राची स्थापना करण्यात आली .

शेतकऱ्याला शेतातील पेरणी करण्यापासून कापणी करण्यापर्यंत व इतर शेतीची माहिती घेण्यासाठी शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागते किंवा लोकांचे मार्गदर्शन घ्यावे लागते तसेच यासाठी विविध साहित्याची गरज भासते परंतु आता शेतकऱ्यांना वेगवेगळ्या केंद्रावर न जाता प्रधान मंत्री केसात समृद्धी केंद्राच्या माध्यमातून या संपूर्ण सुविधा शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत

pmks केंद्राच्या माध्यमातून विविध स्तरावरील शेतकऱ्यांना स्तरावर सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत

पी एम किसान सुविधा केंद्र मध्ये काय असणार आहे

गाव स्तर

केंद्रात आलेल्या साहित्याचे योग्य पद्धतीने देखभाल करण्यासाठी साहित्याचे रॅक,

आलेल्या शेतकऱ्यांना बसण्याची व्यवस्था,

ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी मशीन किंवा कोड बारकोड स्कॅनर

किती माल  उपलब्ध आहे त्यावर सबसिडी किती व त्यांची किंमत किती दर्शविणारे डिजिटल बोर्ड

पीक सहित्य तक्ता

माती सुपीकता नकाशा

शासकीय विभागाकडून विभागाकडून प्राप्त झालेले विविध संदेश चे प्रदर्शन

तालुकास्तर

इंटरनेट सुविधा स्मार्ट टीव्ही

शेतकऱ्यासाठी मदत कक्ष

सामायिक सेवा केंद्र

माती परीक्षण

बियाणांची चाचणी व नमुना संकलन

शेतीसाठी लागणाऱ्या अवजारे आधुनिक तंत्रज्ञान ड्रोन

जिल्हास्तर

उपलब्ध कृषी निविष्ठा श्रेणी दर्शविणारे मोठे बोर्ड

मोठी बैठक व्यवस्था

माती बियाणे आणि पाणी आणि कीटकनाशके चाचणी सुविधा

स्मार्ट टीव्हीच्या माध्यमातून व्हिडिओ मार्फत आधुनिक कृषी पद्धती शेतकऱ्याचे यशोगाथा नवनवीन विकसित तंत्रज्ञान उत्पादने त्यांचे वैज्ञानिक प्रयोग उपयोग इत्यादी व्हिडिओ स्वरूपात दाखवले जाणार आहेत

तसेच काही ठिकाणी एटीएम व सौर ऊर्जा पॅनल सुद्धा लावले जाणार आहेत

                सुंदर घराचे स्वप्न पूर्ण ;नवीन योजना कमी कागदपत्रे !

प्रधानमंत्री कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून काय प्राप्त होणार आहे

सर्व प्रकारचे दर्जेदार खाते खतावर 20% सूट

कीटकनाशके बियाणे औषधेशेती तसेच शेतीसाठी आवश्यक असलेले साहित्य फवारणीसाठी ड्रोन इत्यादी शेतकी शेती करणे घेण्यासाठी मदत करणे

कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या विविध बियाण्याच्या जाती लागवड करण्यास मदत करणे

शेतकऱ्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध योजनांची माहिती देणे

 पिक सल्ला हवामान अंदाज शेतीमालाची माहिती लागवडीच्या नवीन पद्धती बियाण्याच्या विविध जाती इत्यादीची माहिती उपलब्ध करून देणे

महाराष्ट्र मध्ये 14 हजार 780 प्रधानमंत्री किसान केंद्राचे उद्घाटन झाले आहे.

शेतकऱ्यांना शेतीतज्ञांचे मार्गदर्शन मिळणार

pm kisan samriddhi kendra (pmksk)मार्फत महिन्याच्या दर दुसऱ्या रविवारी बैठका ठेवल्या जातील.

या बैठकामध्ये किसान की बात या कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना त्यांचे विचार मांडण्याची

तसेच या कार्यक्रमांतर्गत कृषी तज्ञ शास्त्रज्ञ प्रगतशील शेतकरी यांचा ज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन उपलब्ध केले जाणार आहे.

प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र म्हणजे काय (PMKSK) ?

प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र म्हणजे असे केंद्र जिथे शेतकऱ्यांना सर्व खते कीटकनाशक खरेदी तसेच अनेक शेती उपकरणे मार्गदर्शन विविध परीक्षण शेती सल्ला शेती मार्गदर्शन नवीन तंत्रज्ञानाची माहिती इत्यादी सर्व सोयी सुविधा लाव तसेच शेतीशी लागणारे खते उत्पन्न यांच्या खरेदीवर 20% सवलत दिली जाते असे केंद्र होय.

1 thought on “Pmksk:सुरू झाली नवी योजना;प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र!”

Leave a Comment