महाराष्ट्रात जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार करताय ? फसवणूक होऊ नये म्हणून ही घ्या काळजी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्राचे जमीन खरेदी करताना अनेक वेळा असे दिसून येते की एका जमिनीची चार ते पाच वेळा विक्री होते आणि तसे जाहीर प्रगटने निघते आणि नंतर प्रत्येकी या जमिनीमध्ये खरेदी विक्री व्यवहारात फसवणूक झालेली आहे महाराष्ट्रात शेत जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारात अशा फसवणूक होतात.

सुरुवातीला आपण महाराष्ट्रात शेत जमीन खरेदी विक्री व्यवहारात जमिनीच्या फसवणुकीत होणारे पाच प्रकार पाहू.

बनावट कागदपत्रे आणि लबाड व्यक्ती

जमिनीचे व्यवहारात फसवणूक कोणाचे पहिले मेन कारण म्हणजे बनावट कागदपत्रे आणि लबाड किंवा खोटे व्यक्ती जमिनीचा व्यवहार होत असताना खूप वेळा खोटे कागदपत्रे दाखवले जातात तसेच बनावट व्यक्ती उभे केले जातात आणि त्यातून हे खरे आहेत असे दर्शविले जाते आणि नंतर ज्यावेळेस जमिनीचे व्यवहार होतो त्यावर त्यावेळेस आपल्याला असे दिसून येते की या जमिनीचा म्हणजेच व्यवहार होत असल्या जमिनीचा मालक हा वेगळा आहे यापूर्वी जो आपल्यासमोर होता ती व्यक्ती व मालक नसून खरा मालक हा दुसराच आहे आणि दाखवलेल्या कागदपत्रात ही तफावत दिसून येते परंतु तोपर्यंत आपली फसवणूक झालेली असते यात कागदपत्र मध्ये दाखवलेली जमीन दुसरीकडे असते आणि आपण खरेदी करतो ति जमिन  दुसरीकडेच निघते.

एक शेत जमीन अनेक व्यक्तींना विकणे

जमिनीच्या व्यवहारात फसवणुकीचा दुसरा प्रकार म्हणजे एक शेत जमीन अनेक व्यक्तींना विकणे आपण अनेक वेळा पाहतो की आजूबाजूला आपल्या असे तेव्हा दिसून येतात यामध्ये ज्यावेळेस व्यवहार होता त्यावेळेस असे लक्षात येते की ही शेत जमीन आपला व्यवहार होण्यापूर्वी दुसऱ्या कुण्या वेगळ्याच व्यक्तीला विकली गेलेली आहे  ही फसवणूक कशी होते तर होते असे की ज्यावेळेस आपण एखादी जमीन खरेदी करतो त्यावेळेस त्या जमिनीचे खरेदी खत रजिस्टर केलं जातं आणि त्यानंतर त्याची सातबारा उतारा नोंद केली जाते परंतु ही प्रक्रिया पूर्ण व्हायला कमीत कमी तीन महिन्याचा कालावधी सहज निघून जातो परंतु याच कालावधीचा फायदा घेऊन मूळ मालक रजिस्टर खरेदीखत चा वापर करून नवीन पार्टीला विकू शकतो आणि आपली येथे फसवणूक होते.

इसार एका व्यक्ती कडून घेणे आणि जमीन विक्री दुसऱ्या व्यक्तीला करणे.

आपण पाहतो की कुठलीही वस्तूची खरेदी झाल्यानंतर आधी आडवांस देतात आणि नंतर व्यवहार पूर्ण झाल्यानंतर बाकीचे पैसे दिले जातात तसाच प्रकार जमिनी खरेदी विक्री व्यवहारातही असतो म्हणजे ज्यावेळेस एखाद्या जमिनी चा व्यवहार ठरवला जातो तेव्हा इसार म्हणून काही रक्कम दिली जाते आणि जमिनीचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर बाकीची उरलेले रक्कम दिली जाते आणि व्यवहार पूर्ण केला जातो असे दिसते की एखाद्या व्यक्तीने इसार  दिला नंतर दुसरी व्यक्ती तीच जमीन अधिक मोबदला देऊन खरेदी करतो असे त्याला प्रलोभन देते तेव्हा ती व्यक्ती पूर्वी इसार घेतलेला असला तरी अधिकच्या पैशासाठी त्या शेत जमिनीचा मालक रजिस्टर खत करून दुसऱ्या व्यक्तीबरोबर व्यवहार पूर्ण करतो आणि यात पूर्वी ज्यांनी इसार दिला होता अशा व्यक्तीची फसवणूक घडून येते इसार दिल्यानंतर लवकरात लवकर जमिनीचा पूर्ण व्यवहार खरेदीखत करून मिटवून टाकावा.

गहान शेत जमिनीची विक्री करणे

गहाण शेत जमीन म्हणजे एखादा शेतकरी किंवा जमिनीचा मूळ मालक आपली जमीन बँकेकडे किंवा प्रायव्हेट फायनान्स कंपनीकडे किंवा एखाद्या जमीनदाराकडे गहान ठेवून त्या बदल्यात कर्ज घेतो म्हणजे त्या जमिनीवर त्याच्या कर्जाचा बोजा चढवला जातो परंतु तो बोजा त्या जमिनीवर चढवण्या अगोदर किंवा सातबारावर नोंद येण्या अगोदर ती व्यक्ती त्या जमिनीची विक्री करतो अशा वेळेस खरेदी करणाऱ्याची फसवणूक होते म्हणून जमीन खरेदी करत असताना त्या जमिनीवर कुठला बोजा चढवला आहे का किंवा ती जमीन गहाण ठेवून कुठले कर्ज घेतले आहे का हे तपासणी गरजेचे असते .

वारसांची हरकत

एखादा जमीन एखादा जमिनीचा मूळ मालक मृत्यू पावल्यानंतर त्याच्या जमिनीवर सातबारावर त्याच्या मुलांची किंवा मुलींची किंवा इतर व्यक्तीची नावे वारस म्हणून लागलेली असतात अनेक वेळा त्या उताऱ्यावर फक्त मुलांची नावे दिसतात इतर वारसांची नावे दिसत नाहीत फक्त इतर वारस हक्क कायम अशी नोंद केलेली असते अशा वेळेस ती जमिनी खरेदी करूनही काही उपयोग होत नाही कारण या जमिनीचा व्यवहार होत असताना त्या जमिनीच्या मूळ मालकांच्या मुलींनी किंवा इतर वारसांनी कोर्टात धाव घेतली तर हे प्रकरण कोर्टात खूप वर्षे चालू शकते आपले नुकसान होते तेव्हा जमिनीची खरेदी करत असताना गावातील विश्वासू व्यक्तीला संपर्क साधून किंवा त्या गावातील तलाठ्याशी संपर्क साधून खरेदी करत असलेल्या जमिनीचा सातबारा अपडेट आहे का किंवा योग्य आहे का ते आपल्या परीने शहानिशा केली पाहिजे आपली फसवणूक टाळता येते.

जमीन खरेदी विक्री व्यवहारात फसवणूक झाली तर तक्रार कोठे करावी ?

  • जर काळजी घेऊही  जमिनीच्या व्यवहारात फसवून झाली असेल तर या व्यक्तीची फसवणूक झाली आहे ती व्यक्ती एक अर्ज लिहून व त्या अर्जासोबत आपल्या व्यवहारातील कागदपत्रे जोडून तहसीलदार किंवा त्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी यांच्याकडे देऊन तक्रार करू शकते किंवा नोंदवू शकते ही कागदपत्राची तपासणी करून सरकारी यंत्रणा पुढील तपासणी करते.
  • जर या शेत जमिनीच्या खरेदी व्यवहारात पैशाचा व्यवहार झाला असेल म्हणजे खरेदी दाराची आर्थिक फसवणूक झाली असेल तर अशा वेळेस ती व्यक्ती जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये आपली तक्रार देऊ शकते पोलीस त्याबाबतची योग्य तपासणी करून पुढील कार्यवाही करतात.

शेतजमीन व्यवहारात फसवणूक होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी ?

आपण कुठल्याही जमिनीचा व्यवहार करत असताना आपल्याला जर फसवणूक टाळायची असेल म्हणजे खरेदी विक्री व्यवहार करून नंतर होणारा नाहक मनस्ताप व आर्थिक फसवणूक टाळायची असेल तर खालील गोष्टी ध्यानात घेणे गरजेचे आहे.

७/१२ उतारा 8

आपण ज्या गावातील जमीन खरेदी करणारा आहोत  त्या गावातील शेत जमिनीचा अपडेटेड 7/12 उतारा,8 अ आणि जमिनीचा नकाशा बघून घ्यावा.

7/12 उतारावर काय पहावे

सातबारा उताऱ्यावर जी व्यक्ती जमीन विक्री करत आहे त्याचे नाव आहे का ते तपासून घ्यावे.

त्या सातबारा मयत व्यक्ती किंवा जुन्या मालकाचे नाव असेल तर ते व्यवहारापूर्वी काढून टाकण्या सांगावे .

त्या शेती जमिनीव वर कुठल्या बँकेचे किंवा संस्थेचे कर्ज बोजा आहे का ते तपासावे असल्यास ते काढून टाकण्यास सांगावे.

तसेच सदरील शेत जमिनीवर कुठला न्यायालयीन खटला चालू आहे का ते तपासून पाहावे.

सदरील जमिनीतून कुठलाही नियोजित महामार्ग किंवा रस्ता जाणार नसल्याची खात्री करावी किंवा याची त्या सातबारा उतारा नोंद आहे का ते तपासून पहावे.

भूधारणा पद्धती

त्या सातबारावर भूधारणा पद्धती समोर काय नोंदवलेले आहे ते पाहावे जर त्यासमोर

भोगवाटादार वर्ग-1 अशी नोंद असेल तर त्याचा अर्थ तो शेतकरी त्या जमिनीचा मालक आहे आणि त्या जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारावर शासनाचे कुठलेही निर्बंध नसतात.

भोगवाटादार वर्ग 2 असे नमूद केले असेल तर सदरील जमीन शासनाच्या परवानगीशिवाय खरेदी विक्री करता येत नाही.

जमिनीचा भूनकाशा

आपल्याला ज्या जमिनीत गटातील जमीन खरेदी करायचे आहे त्या गटाचा भूनकाशा पाहणं गरजेचं असतं जर आपण तो भूनकाशा पाहिला तर त्यातून आपल्याला जमिनीची हद्द तसेच जमिनीच्या चतुर सीमा म्हणजे जमिनीच्या चारी बाजूला कोणते शेतकरी आहेत हे कळते व जमिनीच्या चारी बाजूला कोणते गट नंबर आहेत हे पण कळून येते म्हणजे आपण जी कागदा पत्रावर जमीन पाहिली आहे त्या जमिनीची आपण खरेदी करतो आहे याची खात्री होते.

आपली जमीन आपल्या नावावर आहे हे सिद्ध करणारे काही शासकीय पुरावे land proof certificate

शेत रस्ते

आपण जी जमिनी खरेदी करणार आहोत त्या शेतात जाण्यासाठी आधी रस्ता आहे का ते तपासून घेणे गरजेचे असते नाहीतर नंतर शेत रस्ता पाहिजे शेजारील शेतकऱ्यांची वाद उद्भवतात बिनशेती असेल तर त्या जमिनीच्या नकाशावर त्या जमिनीपर्यंत जाण्याचा रस्ता दाखवलेला असतो परंतु ती जमीन शेतजमीन असेल तर रस्त्यासाठी दाखवलेली जमीन आणि संबंधित मालक यांची हरकत नसल्याची पूर्णतः खात्री करून घेणे गरजेचे असते

खरेदी खत

जमिनीचा व्यवहार ठरल्यानंतर सदरील जमिनीचा व्यवहार हा तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये आवश्यक त्या कागदपत्राची तपासणी करून दाखल करावे व त्या जमिनीवर व्यवहारासाठी असलेले शुल्क भरून खरेदीखत करणे गरजेचे आहे यात मूळ गट नंबर मूळ मालकाचे नाव चतुर सीमा जमिनीचे क्षेत्र इत्यादी तपासून पहावे कारण एकदा खरेदीखत झाल्यानंतर ते दुरुस्त होण्यासाठी खूप अडचणी येतात त्यामुळे आपण खरेदी करत असलेले जमीन आणि प्रत्यक्ष जमीन एकच आहे का हे तपासून सर्व कागदपत्रे ची पूर्तता करावी

पीएम कुसुम  सौर पंप योजना, सोलार योजनेअंतर्गत सौर पंप मिळवण्याची प्रक्रिया, 95 टक्के अनुदान.

FAQ

भारतात सरकारी जमीन खरेदी करता येते का ?

एखादी जमीन सरकारच्या मालकीची जमीन म्हणून निश्चित केले असल्यास अशा जमिनीची तुम्ही खरेदी करू शकत नाही परंतु तुम्ही जर जमिनी खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली तर संबंधित प्राधिकरणाचे संपर्क करून ती भाड्याने घेऊ शकता.

खरेदी खत म्हणजे काय ?

खरेदी खत म्हणजे कुठल्याही जमिनीच्या मालकी हक्काचा प्रथम पुरावा होय यामध्ये प्रामुख्याने जमिनीचा व्यवहार कोणत्या दोन व्यक्ती म्हणजे झाला तो पैशाच्या स्वरूपात किती रुपयांना झाला त्यामध्ये किती क्षेत्र खरेदी विक्री झाले त्याचा गट नंबर काय इत्यादी सविस्तर माहिती नोंदवली असते व त्यावर नवीन खरेदी करणाऱ्या मालकाचे नाव आलेले असते.

खरेदी खत कसे करावे ?

खरेदी खत म्हणजे त्या जमिनीच्या मालकी हक्काचा प्रथम पुरावा असतो जमिनीचा व्यवहार झाल्यानंतर नजदीकच्या तालुका दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन योग्य ती कागदपत्रे जमा करावी व झालेल्या खरेदी व्यवहारातील जमीन क्षेत्र गट नंबर तपासून घेऊन विक्री करणाऱ्या व्यक्तीच्या वारसदारांची संमती घेऊन ते खरेदी ची नोंद रजिस्टर करावे व सदरील खरेदीखत तलाठ्यामार्फत फेरफार ओढून त्या जमिनीची सातबारा यावर नवीन मालकाचे नोंद करून घ्यावी.

खरेदी खत रद्द करता येते का ?

जर जमिनीचा व्यवहार पूर्ण झाला नसेल म्हणजे रक्कम पूर्ण पोहोचलेली नसेल तर खरेदीखत करू नये कारण खरेदी खत झाले म्हणजे त्या जमिनीवर पूर्वी ज्या शेतमालकाचा मालक आहे त्याने तो सोडून दिला असं अर्थ होतो म्हणजे तो आपला मालक हक्क नवीन जमिनीत खरेदी करणाऱ्या व्यक्तीस देतो सर्वसाधारणपणे खरेदी कर सहजरीत्या रद्द होत नाही कारण अशा खटल्याबाबत खरेदीखत रद्द करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला असतो.

दोन गुंठे जमीन नावावर होते का ?

जर एखाद्या गट नंबर चे क्षेत्र दोन एकर असेल तर त्या सर्वे नंबर मधील दोन गुंटे जमीन नावावर होत नाही जरी ते तुम्ही विकत घेतली असली तरी त्याची दस्त नोंदणी होत नाही.

जमीन खरेदी करताना लागणारी कागदपत्रे ?

जमिनीचा व्यवहार झाल्यानंतर खरेदी खत तयार करण्यासाठी पुढील कागदपत्रे लागतात सातबारा,खरेदीदार आणि विक्री करणारी व्यक्ती यांची आधार कार्ड,उतारा ८,मुद्रांक शुल्क भरल्याची पावती,प्रतिज्ञापत्र,फेरफार ,दोन जामीनदार व्यक्तीचे फोटो व आधार कार्ड ,NA ऑर्डर ची प्रत, सदरील कागदपत्रे एकत्र जोडून डाटा एंट्री करुण दुय्यम  निबंधक कार्यालय मध्ये दस्त नोंदणीसाठी सादर करावी लागतात.

तुम्ही जमीन मालकाला काय म्हणता ?

जमीन मालकाची व्याख्या करायची झाली तर त्याला  जमीन धारक किंवा मालक किंवा मालमत्ता मालक असे म्हणता येईल.

Conclusion

सदरील लेखांमध्ये होणाऱ्या जमीन व्यवहारातील फसवणुकीवर आपण प्रकाश टाकलेला आहे जेणेकरून कुठल्याही व्यक्तीची जमीन व्यवहारात फसवणूक होणार नाही त्यासाठी घ्यावयाची काळजी आपण सविस्तर मांडले आहे यामुळे प्रत्येक जमीन धारक असल्याचा फायदा होईल जे नवीन जमिनी खरेदी करत आहेत त्यांना याचा निश्चितच लाभ होईल अशी इच्छा आहे जेणेकरून कुठल्याही व्यक्तीची फसवणूक टाळता येईल व प्रत्येक नागरिक अधिक सजग होईल.

3 thoughts on “महाराष्ट्रात जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार करताय ? फसवणूक होऊ नये म्हणून ही घ्या काळजी.”

  1. धन्यवाद माहिती आवडली असेल तर आपल्या whatsap ग्रुप वर नक्की शेयर करा

    Reply

Leave a Comment