आपली जमीन आपल्या नावावर आहे हे सिद्ध करणारे काही शासकीय पुरावे land proof certificate

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आपण पाहतो की महाराष्ट्रात अनेक जमिनीचे वाद high court मध्ये प्रलंबित आहेत आणि हे वाद रोज वाढत चालले आहेत कोर्टामध्ये रोज अनेक केसेस जमिनीच्या वादावरून निर्माण झालेल्या दिसून येतात आपण कुठल्याही Police station मध्ये गेलो असता त्यामध्ये जास्त प्रकरणे जमीन वादावरून झालेली भांडणे हे दिसून येतात.

जी जमीन पिकवतो किंवा विविध पिके घेतो ,आपला उदरनिर्वाहासाठी वापर करतो  किंवा ज्या जमिनीवर आपले घर आहे किंवा आपले व्यवसाय आहे त्या जमिनीविषयी अचानक कोणी वाद केले तर किंवा त्या जमिनीवर कोणी हक्क दाखवला तर किंवा त्या जमिनीच्या बॉर्डर विषयी काही वाद झाले तर आपल्याकडे काही जमिनीची मालकी हक्काचे शासकीय ग्राह्य पुरावे असणे गरजेचे आहे, की जे पुरावे शासन दरबारी मान्य केले जातात ते land proof certificate पुरावे आपण जतन करणे गरजेचे असतं आणि आपण आपल्या होणारे नुकसान आणि मनस्ताप आपण टाळू शकतो.

त्यामुळे आपण आपली जमीन आपल्या नावावर आहे का हे जाणून घेण्यासाठी काही शासकीय पुरावे Land Record Maharashtra तपासणे गरजेचे आहे, ते शासकीय पुरावे जर आपल्या बाजूने असतील तर आपण कुठेही कमकुवत ठरणार नाही किंवा कुठल्याही कोर्टात ते आपण सगळे पुरावे land ownership म्हणून वापरू करू शकतो ते कुठले पुरावे याचा आपण आज सविस्तर अभ्यास करणार आहोत आणि याचा आपण सुर्वांना नक्कीच फायदा होईल.

1.जमिनीचे खरेदीखत दस्त

खरेदी खत(sale deed) म्हणजे आपण जी जमिन विकत घेतली आहे आणि विकत घेतल्यानुसार आपल्याला जे Land Ownership प्राप्त झालेले आहेत त्या मालकी हक्काचा पुरावा समजला जातो कारण या खरेदी खतामध्ये झालेल्या व्यवहाराची सविस्तर माहिती असते, यामध्ये काय असतं तर ज्या दोन व्यक्तींमध्ये व्यवहार झाला आहे विक्री करणाऱ्याचे नाव व खरेदी करणाऱ्यांची नाव यांची सविस्तर माहिती असते, हा व्यवहार कोणत्या तारखेला झाला आहे आणि ह्या व्यवहारात एकूण किती क्षेत्राची विक्री झाली आहे, आणि आणि हा व्यवहार पैशाच्या स्वरूपात किती रुपयांचा झाला, आहे याची सविस्तर माहिती असते.तसेच यामध्ये झालेल्या जमिनीचा गट नंबर सर्वे नंबर व क्षेत्र याचा सविस्तर माहिती असतं भविष्यात वाद होऊ नये म्हणून ही माहिती सविस्तर असते .

2. 7/12 उतारा

प्रत्येक जणांना 7/12 काय असतो? सातबारा म्हणजे काय? हे आता प्रत्येकाला माहीत आहे ते काही नवीन सांगायची गरज नाही परंतु मित्रांनो सातबारा मध्ये दोन प्रकार असतात त्यालाच गाव नमुने असे म्हणतात एक असतो गाव नमुना 7 आणि दुसरा असतो गाव नमुना 12 तर.

  • अ) गाव नमुना 7 हा जमिनीच्या मालका विषयी माहिती देतो म्हणजेच त्यामध्ये जमिनीच्या मालक कोण आहे याची  सविस्तर माहिती असते.
  • ब) गाव नमुना 12 आता गाव नमुना बारा काय असतो तर गाव नमुना बारा हा पिकाची नोंदवही असते, म्हणजे त्या जमिनीत कोणते पीक लावले याविषयी सविस्तर नोंद असते यावरून आपल्याला कोणत्या वर्षी कोणते पिके घेतली याची माहिती मिळते.

अ) गाव नमुना सात मध्ये एक प्रकार असतो तो म्हणजे भूधारणा पद्धत म्हणजेच भोगवटा धारकाची पद्धत यावरून आपल्याला या जमिनीचा खरा मालक कोण याची माहिती मिळते आता या भूधारणा पद्धतीच्या एकूण चार पद्धती

हे ही वाचा : आपल्या मोबाईल मध्ये शेती विषय लागणारे सर्व कागदपत्रे

भोगवाटादार वर्ग

जर त्या सातबारावर भोगवाटादार वर्ग-१ असे नमूद केले असेल तर समजून घ्या या जमिनीचे हस्तांतरण करण्यास शासनाचे कुठलेही निर्बंध नाहीत किंवा नसतात शेतकरीच त्या जमिनीचा मालक आहे असे समजावे म्हणजे त्या जमिनीचे पूर्ण land ownership त्या शेतकऱ्याकडे आहेत आणि तोच मालक आहे .

भोगवाटादार वर्ग-2

ज्या  सातबारावर भोगवटादार वर्ग-२ असा उल्लेख असेल समजून घ्या की त्या जमिनीवर निर्बंध असतात म्हणजेच असे जमिनीचे खरेदी विक्री व्यवहार शासनाच्या परवानगीशिवाय  करता येत नाही किंवा त त्यांची परवानगी घ्यावी लागते .

भोगवाटादार वर्ग -3

 ज्या सातबारा भोगवटादार वर्ग -3 असा उल्लेख असेल त्या जमिनी किंवा जागा या शासनाच्या मालकी हक्काच्या असतात म्हणजे त्या जमिनीची खरेदी विक्री किंवा वापर करण्याचा अधिकार पूर्णतः शासनाला असतात त्यावर इतर कोणाची ही वैयक्तीक मालकी नसते.

भोगवाटादार वर्ग

ज्या सातबारा वर भोगवटादार वर्ग-४ असा उल्लेख असेल त्या जमिनी किंवा जागा शासनाने भाड्याने दिले आहेत असे समजावे आपण भरपूर वेळा ऐकतो की 99 वर्षाच्या भाडेतत्त्वावर एखादी जमीण  किंवा जागा मी घेतलेली आहे म्हणजेच तो व्यक्ती भोगवाटादार वर्ग चार असतो या जमिनी मुख्यत्वे दहा वर्ष तीस वर्ष पन्नास वर्ष किंवा 99 वर्ष इतक्या काळासाठी भाड्याने दिलेल्या असतात किंवा भाडे करार केलेला असतो .

. 8 . नमुना

आपण पाहतो की काही शेतकऱ्यांची जमीन हे वेगवेगळ्या गट क्रमांकात असते म्हणजे काही जमीन गावच्या त्या बाजूला काही जमीन दुसऱ्या बाजूला तेव्हा त्या दोन्ही जमिनीला वेगवेगळे गट नंबर मिळालेले असतात किंवा इतर अनेक जागांमध्ये त्याची जमीन असू शकते वेगवेगळ्या गट क्रमांक जमीनीला असतो ती एकत्रितपणे आठ उताऱ्यावर नमूद केलेलीअसते त्यावरून त्याची एकूण जमीन कळून येते तुम्ही आठ उतारा काढला तर आपल्या मालकीची total land कोण कोणत्या गटात आहे हे समजून येते त्यामुळेच 8अ उताऱ्याला ही land proof certificate महत्त्व आहे .

.मोजणीचा नकाशा

भरपूर वेळा बघतो की दोन जमीनदार शेजारी असतील तर त्या दोघांमध्ये हमखास बांधावरून वाद निर्माण होतात, हे वाद मुख्यतः जमिनीचे मालकी हक्क म्हणजे landmaping कोणाचे यावरून  निर्माण होतात म्हणजे त्या मालकास असे वाटते माझी जमीन  दुसऱ्या शेतकऱ्याकडे गेलेली आहे त्यामुळे तो त्या जमिनीवर मालकत्व सांगू लागतो, कायद्याने तो मालक सिद्द होण्यासाठी तुमच्याकडे त्या जमिनीचा मोजणी नकाशा असणे  गरजेचे आहे. मोजणी नकाशाच्या आधारे तुम्ही त्या जमिनीवर मालकी हक्क सांगू शकता त्यामुळे आपल्याला जमिनची शासकीय मोजणी करून त्या जमिनीचे मोजणी नकाशे प्रींट करून जपून ठेवणे कधीही चांगले ते कधी कामास येतील हे सांगता येत नाही यामध्ये प्रामुख्याने त्या गटात त्या शेतकऱ्याच्या नावाने एकूण किती जमीन आहे आणि तुमच्या चतुर सीमा प्रमाणे तुमच्या चारी बाजूला कोणता गट क्रमांक आहे किंवा कोणता शेतकरी आहे याचा उल्लेख असतो तसेच त्या जमिनीच्या सर्व बाजू किती लांबीचे आहेत याचा उल्लेख असतो म्हणजे या land proof certificate भू नकाशात Bhunaksha सर्व माहिती सविस्तर असते.

५.महसूल कर भरलेल्या पावत्या

भरपूर व्यक्तीना माहित नसेल की आपल्या जमिनीला विशिष्ट revenutax म्हणजे महसूल कर असतो आणि तो भरावा लागतो हा भरल्यानंतर आपल्या सज्जाला जो तलाठी आहे त्या मार्फत महसूल कर भरलेली एक पावती दिली जाते या पावत्या आपण आपल्या जमिनीचे मालकी हक्क  प्रसिद्ध करण्यासाठी वापरू शकतो म्हणजे तुम्ही जर पूर्वीच्या अनेक वर्षापासून या पावत्या म्हणजेच महसूल कर भरून जपून ठेवले असतील तर त्या वाद निर्माण झाल्यास जमिनीचा मालकी land proof certificate हक्क सिद्ध करण्यासाठी फार महत्त्वाच्या असतात.

.जमिनी संबंधित केस किंवा खटले

आपल्या जमिनी विषयी  पूर्वी कधी एखादी केस किंवा कोर्ट कचेरी झाली असेल खटला चालला असेल आणि त्यात जो काही निकाल आला असेल त्याच्या प्रति  असतील तर त्या आपण जमिनीचे मालकी हक्क land proof certificate सिद्ध करण्यासाठी वापरू शकतो.

.मालमत्ता पत्रक

वरील सहा मुद्दे शेत जमिनीसाठी लागू होतात परंतु तुमची जर एखादी जमीन बिगर शेत जमीन असेल म्हणजे त्यावर तुमचे घर गोडाऊन किंवा इतर कोणताही व्यवसाय स्थित असेल तर अशा जमिनीवर मालकी हक्क सांगणारे महत्त्वाचा पुरावा म्हणजे मालमत्ता पत्रक यालाच property card असे देखील म्हणतात या मालमत्ता पत्रकात बिगर शेत जमिनीवर एखाद्या व्यक्तीची किती क्षेत्रावर घर आहे किंवा इतर मालकी आहे याची माहिती दिलेली असते बिगर शेत जमिनी मालक या हक्कासाठी महत्त्वाचा पुरावा land proof certificate मानला जातो .

.घरपट्टी पावत्या

बिगर शेत जमीन च्या वादामध्ये घर पावत्याही मालकी हक्क दर्शवण्यासाठी महत्त्वाचा पुरावा मानला जातो  जर  तुम्ही तुमची घरपट्टी वेळोवेळी भरली असेल आणि त्या पावत्या जपून ठेवल्या असतील तर त्या तुम्हाला खटल्यामध्ये मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी उपयोगी पडू शकतात म्हणून मित्रांनो घरपट्टी वेळोवेळी भरणे आपल्या फायद्याचे ठरते मग आपले घर ग्रामपंचायत एरियात असो किंवा नगरपंचायत एरियात असो आपण आपली घरपट्टी वेळोवेळी भरलेली असावी ते भविष्यात कामास येऊ शकते तर वरील पुरावे आपल्याकडे असतील तर आपण बिनधास्तपणे राहू शकता कारण तुमच्या जमिनीवर कोणीही मालकी हक्क land proof certificate सांगू शकत नाही.

Conclusion

आजच्या लेखामध्ये आपण जमीन मालकी हक्काविषयी Land Ownership Required Documents List खूपच महत्त्वपूर्ण अशी माहिती घेतलेली आहे त्यामध्ये आपली जमिनीची मालकी प्रसिद्ध करणारे पुरावे दिले आहेत की जेणेकरून भविष्यात आपल्याला कुठल्याही जमिनीच्या वादाला तोंड द्यावे लागणार नाही हे पुरावे आपल्याला सर्वांना माहीत असणे गरजेचे आहे.

महाराष्ट्रात जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार करताय ?   फसवणूक होऊ नये म्हणून ही घ्या काळजी.

6 thoughts on “आपली जमीन आपल्या नावावर आहे हे सिद्ध करणारे काही शासकीय पुरावे land proof certificate”

  1. गट नंबर 83 कासारखेड़ा मालेगाव रोड नांदेड़

    Reply

Leave a Comment