electric tractor in india : या कंपनीने आणला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, 2 फक्त तास चार्जिंग मध्ये चालेल इतका वेळ…

नमस्कार शेतकरी मित्रानो , आपल्याला माहिती आहे कि आता पूर्वीप्रमाणे बैल जोडी ठेवून खूप कमी शेतकरी बांधव शेती करत आहेत कारण आता सगळी कामे यंत्राच्या साहाय्याने होत आहेत.

शेतकरी बांधवामध्ये शेतीउपयुक्त यंत्रामध्ये सगळ्यात जास्त फायद्याचे यंत्र म्हणजे ट्रॅक्टर.

सध्याच्या काळात आपल्याला शेतीतून उपत्पन्न जर वाढवायचे असेल तर आपल्याला आधुनिकतेची कास धरयलाच हवी आणि विविध शेतीउपयोगी यंत्रांचा वापर करायलाच हवा.

आपली शेती यंत्राद्वारे करण्याचे खूप फायदे आहेत कारण कमी वेळामध्ये शारीरिक कष्ट कमी करून जास्तीत जास्त शेतीचे काम करता येते.

तर आपण जे सर्वाधिक वापरले जाते ते यंत्र म्हणजे ट्रॅक्टर याबद्दल बोलत होतो कारण सध्या शेतीचे सर्वच कामे ट्रॅक्टर शिवाय करणे हणजे अशक्यच आहे.

सध्या आपल्याकडे डिझेलद्वारे चालणारे ट्रॅक्टर वापरले जाते, पण सध्याचे डिझेलचे भाव पाहता याहून कमी खर्च मध्ये कसे ट्रॅक्टर चालेल याचा विविध कंपन्या विचार करत होत्या.

जसे कि आपण पाहतो साध्ये इलेक्ट्रिक मोटर त्यामध्ये स्कुटी व कार सध्या खूप प्रमाणात खरेदी केल्या जात आहेत कारण सध्याचे इंधनाचे वाढलेले भाव पाहता जनता इलेक्ट्रिक वाचनाकडे वळत आहे.

याच बाबींचा विचार करता ट्रॅक्टर सुद्धा चार्जिंगवरचे येणे गरजेचे होते आणि आता ते सत्यात पण उतरले आहे.

भारतातील पहिले इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लॉन्च झाले आहे.

भारतीय ट्रॅक्टर उद्योगात क्रांती घडवत सोनालीने ट्रॅक्टर्स कंपनीने भारतातील पहिला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर सादर केला आहे

सोनालीका या भारतातील अग्रगण्य ट्रॅक्टर कंपनीने त्यांचा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लॉन्च केला आहे

या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचे नाव आहे Sonalika Tiger Electric tractor

कंपनीद्वारे हे ह्या ट्रॅक्टर्स हि बुकिंग सुरु आहे.

आपली जमीन आपल्या नावावर आहे हे सिद्ध करणारे काही शासकीय पुरावे

कंपनीने या ट्रॅक्टरचे सांगीतलेले फायदे

ह्या ट्रॅक्टर द्वारे इंधनाची बचत होते त्यामुळे उत्पन्न खर्च कमी होतो.

तसेच हे ट्रॅक्टर जलद गतीने काम करते.

ह्या ट्रॅक्टर चा वापर करताना जुन्या डिझेलच्या ट्रॅक्टर प्रमाणे ह्याचा फायरिंग कमी असते म्हणजे ट्रॅक्टरच्या इंजिनच्या आवाजाच्या गोंगाटाशिवाय शांत पद्धतीने काम करू शकता.

हा ट्रॅक्टर जास्त गरम होत नाही त्यामुळे आपले कामाचे तास वाढू शकतात तयामुळे आपली क्रयशमता वाढते.

कंपनीद्वारे असा दावा केलेला आहे कि ४ तास चार्जिंग केल्यांनतर हा ट्रॅक्टर ८ तास काम करेल.

तसेच हा ट्रॅक्टतर पूर्ण पणे चार्जिंग वरचा असल्यामुळे कोणतेही प्रदूषण होणार नाही.

तसेच या चार्जिंग वरच्या Sonalika Tiger Electric tractor price ट्रॅक्टर ची किंमत ६ लाखांपासून पुढे आहे.

तर नक्कीच हा ट्रॅक्टर शेतकऱ्यांना फायद्याचा ठरू शकतो. पण शेतकरी बांधवानी हा ट्रॅक्टर घ्यायच्या अगोदर स्वतः चौकशी व खात्री करून मगच हा घ्यायचा आहे.

भविष्यात आणखीन काही कंपनीद्वारे असे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लॉन्च केले जाण्याची शक्यता आहे.

1 thought on “electric tractor in india : या कंपनीने आणला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, 2 फक्त तास चार्जिंग मध्ये चालेल इतका वेळ…”

Leave a Comment