नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना शेतकऱ्यांना मिळणार 12,000 रुपये.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात Maharashtra Budget 2023  विधानसभेत मांडत असताना  “नमो शेतकरी महा सन्मान योजने”ची घोषणा केली.त्यांनी असे स्पष्ट केले की या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या अनुदानात अधिकच वाढ होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे या नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेमुळे शेतकऱ्यांना अधिक सन्मानाने जगता येणार आहे सरकारने जणू यांचा सन्मानच वाढवला आहे तर आपण आज या योजनेविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत.

यावेळी फडणवीस असे म्हणाले की अन्नदाता बळीराजा यांच्या उत्पन्न वाढीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून अस्तित्वात आलेल्या “पंतप्रधान कृषी सन्मान निधी योजना “आणि या योजनेत महाराष्ट्र शासनाच्या अधिकच्या अनुदानाची भर घालणारी योजना म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना होय.

या योजनेबद्दल सविस्तर माहिती आपण खालील पाच मुद्द्याच्या आधारे घेणार आहोत.

“नमो शेतकरी सन्मान निधी योजना” म्हणजे आहे तरी काय ?

Indian government संपूर्ण देशातपूर्वीपासूनच पीएम किसान सन्मान निधी योजना  शेतकरी हितासाठी चालवत आहे या योजनेत प्रत्येक शेतकऱ्याला केंद्र सरकारकडून दरवर्षी 6 हजार रुपये इतका किसान सन्मान निधी दिला जातो.प्रत्येक चार महिन्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 2000 रुपये सन्मान निधी जमा होतो.

पण आता महत्त्वाची गोष्ट अशी आहे की केंद्र सरकारने जमा केलेल्या 6 हजार रुपयांमध्ये राज्य सरकार आणखीन 6 हजार रुपये निधी देणार आहे .

म्हणजे शेतकऱ्याच्या खात्यावर एकूण 12 हजार रुपये इतकी मदत येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीचे आर्थिक मदत राज्य सरकारच्या मदतीने होणार आहे आणि शेतकऱ्यांना येणाऱ्या आर्थिक अडचणींचा सामना कमी होणार आहे असे शासनास वाटते त्यामुळे महाराष्ट्र शासनातर्फे ही योजना आणली आहे आणि या योजना चा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे म्हटले आहे.

या नवीन योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकरी कोणते ?

जे शेतकरी पूर्वीपासून पीएम किसान सन्मान निधी योजनेत नाव नोंदवून पात्र ठरले आहेत व त्यांना यापूर्वीच पीएम किसान सन्मान निधी खात्यावर जमा होत आलेला आहे असे सर्व शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतील म्हणजे जे शेतकरी या योजनेत पात्र आहेत त्यांच्या खात्यावर पीएम किसान सन्मान निधी योजने सोबतच राज्य सरकारकडून या योजनेचा निधी जमा केला जाणार आहे.

ही नवीन योजना लागू होणार कधी ?

मोदी सरकारच्या पीएम किसान सन्मान निधीचा 130 वा हप्ता यावर्षी फेब्रुवारी महिन्यातील  27 तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे या योजनेच्या आतापर्यंतच्या नियोजनानुसार पुढील शेतकरी हप्ता अंदाजे यावर्षीच म्हणजे 2023 मध्येच एप्रिल ते जुलै या कालावधीत खात्यावर जमा केला जाऊ शकतो तेव्हा महाराष्ट्र शासनही आपला सन्माननिधी सहा हजार रुपये यासोबतच जमा करेल अशी शक्यता आहेपरंतु यावर अजून शासनाचा मान्य जीआर आलेला नाही जेव्हा शासन निर्णय येईल त्यावेळेस या योजनेचे स्वरूप अधिक स्पष्ट होईल.

या योजनेचा महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना लाभ मिळणार ?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी महासंघ निधी योजनेचा लाभ महाराष्ट्रातील एक कोटी पंधरा लाख शेतकरी कुटुंब घेतील किंवा त्यांना होईल असे विधानसभेत सांगितले.

पण जेव्हा सध्या परिस्थितीचा अभ्यास केला असता संपूर्ण देशात गेल्या काही महिन्यांपासून पी एम किसान निधी म्हणजेच namo shetkari yojana तील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या कमी होत चालली आहे सुरुवातीला ती एकूण 11 कोटी अशी होती तर सध्या ती 8.5 कोटीवर येऊन थांबली आहे .

या सर्वगोष्टी चा विचार केला असता महाराष्ट्र शासन ही योजना ज्या दिवशी लागू करेल तेव्हा अचूक आकडेवारी समोर येईल .

पीएम किसान योजनेतील शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी !

आत्तापर्यंत पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपयांचा हप्ता जमा झालेला आहे त्या लाभधारकांनी जमा होत असलेले बँक खाते यांना आपला आधार नंबर आणि मोबाईल नंबर लिंक करणे गरजेचे आहे.

शासकीय माहितीनुसार महाराष्ट्र राज्यात एकूण 12 लाख लाभधारक शेतकरी आहेत की ज्यांनी अजून आतापर्यंत आपल्या बँक खात्याशी आपला आधार नंबर आणि मोबाईल नंबर लिंक केलेला नाही.

त्यामुळे शासनाच्या या योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल तर पूर्वीच्या लाभधारकांनी त्वरित बँकेशी संपर्क साधून किंवा आपल्या जवळच्या मदत केंद्राची संपर्क साधून आपला बँक खातं मोबाईल नंबर व आधार नंबर से लिंक करून घ्यावे याचा मुख्य फायदा असा होईल की ही योजना शासनाला लवकरात लवकर राबवता येईल व या योजनेत कुठल्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत मोबाईल नंबर व आधार नंबर बँक खात्याचे लिंक असतील तर महाराष्ट्र शासन आपल्या खात्यावर हा निधी सुरळीतपणे जमा करू शकेल.

Conclusion

आजच्या आर्टिकल मध्ये आपणनमो शेतकरी महा सन्मान निधी विषयी असलेले शेतकऱ्यांच्या मनातील संभ्रम दूर केला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना याविषयी अतिशय उपयुक्त माहिती मिळाली आहे असा आम्हाला विश्वास आहेयामुळे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिक सोयीचे होणार आहे तसेच शासनाची योजना शेतकऱ्यापर्यंत योग्य मार्गाने पोहोचणार आहे आपण वर हे योजना कधी लागू होणार या योजनेत किती सन्माननीती भेटणार आणि पात्र शेतकरी कोण असणार याविषयी सविस्तर माहिती पाहिले आहे त्यामुळे शेतकरी या योजनेत अधिक संख्येने सामील होतील.

तसेच आपणास काही प्रतिक्रिया द्यावयाच्या असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये त्या देऊ शकता किंवा सदरील लेखा विषयी आपल्याला आणखीन काही माहिती वाचल्यास आपण आमच्याशी संपर्क साधू शकता .

10 thoughts on “नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना शेतकऱ्यांना मिळणार 12,000 रुपये.”

 1. मला केवळ एकच हाप्ता मीळालेला आहे नंतर एकही हाप्ता मिळाला नाही तर मला या योजनेचा लाभ मिळेल का

  Reply
  • धन्यवाद माहिती आवडली असेल तर आपल्या whatsap ग्रुप वर नक्की शेयर करा

   Reply
  • धन्यवाद माहिती आवडली असेल तर आपल्या whatsap ग्रुप वर नक्की शेयर करा

   Reply
  • धन्यवाद माहिती आवडली असेल तर आपल्या whatsap ग्रुप वर नक्की शेयर करा

   Reply

Leave a Comment