Scheme for construction of farmhouse फार्म हाऊस बांधण्यासाठी शेतकरी योजना

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmers facing two many problems for keeping their agriculture equipment safe on agriculture land due to lack of accommodation to the agriculture equipment and crops.So government has given instruction to the banks to give loans to the farmers for construction of farmhouse on their agriculture land to keep their equipment safe. So many banks introduced farmers Scheme For Construction of Farmhouse on Agriculture land.

शेतकऱ्यांना शेतामध्ये फार्म हाऊस बांधून ज्यामध्ये राहण्यासाठी वापर व फार्महाऊस मध्ये शेती साठी लागणारे सर्व कृषीचे अवजारे तसेच शेतातून निर्माण झालेले उत्पन्न म्हणजे शेतातील पिकवलेला माल सुरक्षित ठेवण्यासाठी Scheme For Construction of Farmhouse on Agriculture land शेतकऱ्यांना फार्म हाऊस बांधण्यासाठी ची योजना याबद्दल सविस्तर माहिती या पोस्टमध्ये असणार आहे.

सरकारी आदेशाप्रमाणे सदर योजना अंतर्गत लोन म्हणजे कर्ज देण्याचे सर्व बँकांना आदेश देण्यात आलेले आहे तर ह्या पोस्टमध्ये  Bank Of Maharashtra Loan Scheme farmers तर्फे देण्यात येणाऱ्या या योजनेबद्दल माहिती असणार आहे.

शेतकरी फार्म हाऊस बांधणी योजना

शेतकरी फार्म हाऊस बांधणी योजना यामध्ये कोणत्या प्रकारच्या सुविधा असणारा आहे त्या आपण पाहणार आहोत.

सदर योजनेअंतर्गत बँकेतर्फे Agriculture Term Loan  (ATL ) म्हणजे कृषी टर्म लोन मिळणार आहे.

या योजनेचा मुख्य उद्देश

शेतीकडे एक व्यवसाय म्हणून पाहिले जात आहे त्यामुळे प्रभावीपणे शेती व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांना पूरक सुविधा पुरवण्यासाठी सरकार मदत करत असते. शेतकऱ्यांचे शेतामध्ये पक्के घर नसल्यामुळे शेतीचे अवजारे, खते, शेतातून उत्पन्न होणारे धान्य याचे पाऊस व उन्हापासून होणारे नुकसान टाळावे म्हणून शेतकऱ्यांसाठी या योजनेद्वारे फार्म हाऊस बांधून त्या फार्म हाऊस मध्ये सदर गोष्टी सुरक्षित राहून सदर गोष्टीचे रक्षण होण्यासाठी ही योजना आहे. जेणेकरून शेतकऱ्यांचे होणार नुकसान कळेल व शेती व्यवस्थापनामध्ये याचा अधिक प्रभावी वापर करता येईल. सदर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा उत्पन्न होणारा धान्याचा संचय हा व्यवस्थित राहील व त्यातून शेतीचे उत्पादन वाढवता येईल तसेच इतर गरजांची पूर्तता होईल याची काळजी घेतली आहे.

योजनेसाठी ची पात्रता

  • 1. जी व्यक्ती स्वतंत्रपणे किंवा आपल्या कुटुंबासमवेत हे पूर्ण वेळ शेती व्यवसायासाठी निगडित आहे.
  • 2. कमीत कमी 2.5 एकर शेती असणारे शेतकरी
  • 3. स्वतःच्या शेती तसेच शेतीशी निगडित व्यवसायातून पुरेसे आर्थिक उत्पन्न असणारे शेतकरी.
  • 4. कोणत्याही वित्तीय संस्था कुठल्याही बँकेकडून कृषी कर्ज घेतलेले नसावे व ज्यांनी कर्ज घेतलेले आहे त्यांचे मागच्या तीन वर्षांमध्ये कुठलेही कर्जाचे हप्ते थकित नसलेले असावे.
  • 5.एक पेक्षा जास्त बँकांमध्ये तुमचे खाते नसावे व एक पेक्षा जास्त बँकांमध्ये कर्ज घेतलेले नसावे.

या योजनेसाठी ची वयोमर्यादा

  • 1. सदर योजनेसाठी चा अर्जदार शेतकरी हा अठरा वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
  • 2. या योजनेसाठी जास्तीत जास्त 65 वयाच्या आतील व्यक्ती अर्ज करू शकतात की पण त्यासाठी तुमचे उत्पन्न हे किती आहे ते कागदपत्रे दाखवणे गरजेचे आहे व 75 पेक्षा जास्त वय नसू .

या योजनेअंतर्गत मिळणारी कर्जाची रक्कम

  • 1.  2 लाख ते 10 लाखापर्यंत कर्ज मिळणार आहे – 2.5 एकर जमीन असणारे अर्जदार शेतकरी याचं स्वतःच्या शेती व शेतीपासून मिळणारे उत्पन्न लक्षात घेता कर्जाची रक्कम मंजूरी
  • 2. 10 लाख ते 50 लाख – 5 एकर जमीन असणारे अर्जदार शेतकरी याचं स्वतःच्या शेती व शेतीपासून मिळणारे उत्पन्न लक्षात घेता कर्जाची रक्कम मंजूरी

अर्जदार शेतकऱ्यांसाठीचे मार्जिन

सदर योजनेत अंतर्गत अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना फार्म हाऊस बांधण्यासाठी लागणाऱ्या खर्चाच्या 25 टक्के बांधकाम हे स्वतःचे खर्चातून करणे आहे.

सदर योजनेअंतर्गत कर्जासाठी चा व्याजदर

Up to Rs 10.00 Lakh : 1 Year MCLR + BSS @ 0.05% + 2%

Above Up to Rs 10.00 Lakh : 1 Year MCLR + BSS @ 0.05% + 3%

योजनेअंतर्गत लागणारे तारण

1. सदर योजनेअंतर्गत लोन घेण्यासाठी आपण फार्म हाऊस बांधत असलेली शेती व बांधलेले फार्म हाऊस, व उत्पन्न देत असते शेती याचे मॉडगेज

2. सदर योजने अंतर्गत कर्जासाठी अर्ज करताना योग्य उत्पन्न असणारे दोन जामीनदार व्यक्ती.

योजनेअंतर्गत कर्जाची परतफेड कालावधी

1.  कर्जदार शेतकरी कर्जाची रक्कम बँक खात्यात वर्ग झाल्यापासून 18 महिन्यानंतर ह्या कर्जाची परतफेड सुरू होते.

2. अर्जदार शेतकरी सदर कर्जाची व्याजासह परतफेड वार्षिक, , तीमाही व महिना वारी हप्त्यामध्ये पंधरा वर्षांमध्ये परतफेड करू शकतात परतफेड करू शकतात.

योजनेचा लाभ घेण्यासाठी इन्शुरन्स काढण्याची आवश्यकता

सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकऱ्यांनी पूर्ण मालमत्तेचा इन्शुरन्स काढणे आवश्यक आहे म्हणजेच ज्यांच्या नावावर सदर योजनेचे कर्ज काढण्यात येतात येते त्या व्यक्तीच्या नावाने इन्शुरन्स काढणे हे अत्यावश्यक आहे.

या योजनेसाठीच्या महत्त्वाच्या कायदेशीर बाबी

1. संबंधित शेतीवर फार्म हाऊस बांधण्यासाठी त्या अंतर्गत असणाऱ्या सर्व सरकारी परवाना जसे की बांधकाम विषयक परवाना.

2. बँकेकडून नियुक्त वकिलांकडून जी शेतजमीन मोडगेज करणार आहोत त्या जमिनीचा सर्च रिपोर्ट व टायटल क्लियरन्स रिपोर्ट काढणे गरजेचे आहे.

सदर योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

सुदर योजनेसाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे.

1.लोन Form No -138, & Enclosure – B2  अर्जासाठी ची कागदपत्रे

  • • सर्व जमिनीचा 7/12, 8अ व सदर जमिनीच्या चतुर सीमा
  • •जर सह अर्जदार नोकरी करत असेल किंवा व्यवसाय करत असल्यास त्याचे शेवटचे तीन महिन्याचे पगार पत्र, इन्कम टॅक्स रिटर्न, फॉर्म 16 व बॅलन्स शीट इत्यादी कागदपत्रे
  • •सदर शहरातील इतर बँकांची बे बाकी पत्र
  • •वकिलाकडून दिलेले सर्च रिपोर्ट व त्या जमिनीचे इतर कागदपत्रे जे मॉडगेज करण्यासाठी वापरले जाणार आहे
  • •सदर फार्म हाऊस बांधण्यासाठी चे बजेट इस्टिमेट, बांधकामाचा , बांधकाम परवाना व लेआउट लिखित स्वरूपात
  • •सदर जमिनीचे सरकारी व्हॅल्युएशन अधिकाऱ्यांकडून सध्याचे जमिनीचे मूल्य पत्र
  • •अर्जदाराचे आधार कार्ड, पॅन कार्ड व रहिवासी प्रमाणपत्र
  • 2. गॅरंटी फॉर्म-148 / हमीपत्र
  • • दोन्ही जामीनदार व्यक्तीचे 7/12, 8अ कागदपत्रे
  • • जर जामीनदार व्यक्ती पैकी व्यक्ती व्यवसायिक किंवा नोकरी करणारी असेल तर शेवटचे तीन महिन्याचे पगार पत्र, इन्कम टॅक्स रिटर्न, फॉर्म 16 व बॅलन्स शीट इत्यादी कागदपत्रे
  • • जामीनदार व्यक्तीचे आधार , पॅन कार्ड व रहिवासी प्रमाणपत्र

सदर योजनेसाठी च्या नियम व अटी

1. सदर फार्म हाऊस योजनेसाठी जर सदर शेतजमीन यांनी जमीन एन ए एकरण्यासाठी ची गरज नसते.

2. सदर शेती जमीनीचे त्या क्षेत्रातील रजिस्टर किंवा उप रजिस्टर करून जमिनीचे मूल्यांकन करून घेणे व त्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

3. सदर योजनेसाठी अर्ज करत असलेल्या शेतकऱ्याची कर्जाचे हप्ते व कर्ज परतफेड करण्याची आर्थिक क्षमता असणे आवश्यक आहे

4.अर्जदार शेतकऱ्यांचे केवायसी डॉक्युमेंट कम्प्लीट करणे गरजेचे आहे

5.जर शेतकऱ्यांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरलेले नसेल तर संबंधित तहसीलदार मंडल अधिकारी किंवा महसूल विभागातील अधिकाऱ्यांकडून दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल.

फार्म हाऊस चे फायदे

  • काढलेले धान्य साठवण्यासाठी.
  • शेतीची अवजारे वगैरे ठेवण्यासाठी.
  • खत बी बियाणे ठेवण्यासाठी.
  • पावसाळी काळात शेतकऱ्याला आसरा म्हणून उपयोग.
  • ऊन वारा पाऊस यापासून संरक्षण.
  • तसेच शेतकरी कुटुंबाला राहण्यासाठी ही याचा वापर.

Conclusion

सदर ब्लॉग पोस्ट मध्ये Scheme for construction of farmhouse फार्म हाऊस बांधण्यासाठी शेतकरी लोन योजना याबद्दल अतिशय महत्वाची व शेतकरी उपयोगाची माहिती दिलेली आहे यामध्ये आपण  योजनेचा उद्देश, पात्रता, वयोमर्यादा, मिळणारी कर्जाची रक्कम, कर्जा चा व्याजदर, कर्ज परतफेड कालावधी, कायदेशीर बाबी,आवश्यक कागदपत्रे,योजने चे नियम व अर्ज करण्याची बँकेची अधिकृत वेबसाईट इत्यादी गोष्टीची सविस्तर माहिती दिलेली आहे.

6 thoughts on “Scheme for construction of farmhouse फार्म हाऊस बांधण्यासाठी शेतकरी योजना”

    • धन्यवाद माहिती आवडली असेल तर आपल्या whatsap ग्रुप वर नक्की शेयर करा

      Reply
    • धन्यवाद माहिती आवडली असेल तर आपल्या whatsap ग्रुप वर नक्की शेयर करा

      Reply

Leave a Comment