Panjab Dakh : उघाड दिलेला पाऊस परत कधी येणार? पंजाबराव डख म्हणतात कि !
नमस्कार शेतकरी मित्रहो आपल्यायाला माहित आहे कि पंजाबराव डख हे नेहमी शेतकरी हिताचा हवामान अंदाज देत असतात.
पंजाबराव डख यांनी दिलेल्या हवामान अंदाजच शेतकरी बांधवाना फायदा होत असतो कारण हवामानाचा अंदाज घेऊन शेतीचे नियोजन करणे सोपे जाते व होणारे नुकसान टाळता येते.
तर या वर्षी महाराष्ट्र सर्वत्र बऱ्यापैकी पाऊस झाला आहे व सर्व दूर पेरण्या झालेल्या आहेत व पिके पण व्यस्थित जोमदार उगवली आहेत. काही ठिकाणी सोयाबीन पिकाला गोगलगाय चा प्रादुर्भाव झाला आहे ह्यामध्ये शेतकरी बांधवांचा नुकसान झाले आहे.
पण उर्वरित ठिकाणी जिथे पिके व्यवस्थित आहेत तिथे आता शेतकरी बांधवांची कोळपणी, खुरपणी, फवारणी ची कामे पावसाने उघड दिल्यामुळे व्यवस्थित पार पडली आहेत.
परंतु आता उघड देऊन पण सात ते आठ दिवस झाले आहेत, तर मग आता परत पाऊस कधी पडणार या संदर्भात हवामानअभ्यासक पंजाबराव डख यानी महत्वाचा हवामान अंदाज दिलेला आहे तो खालील प्रमाणे आहे.
पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज Panjabrav Dakh Weather Report
नुकत्याच दिलेल्या हवामान अंदाज मध्ये पंजाबराव डख असे सांगतात कि महाराष्ट्रात सगळीकडे पेरण्या झाल्या आहेत व पिके पण जोमदार आहेत पण उघड दिलेला पाऊस कधी परत येणार याची चिंता शेतकरी बांधवाना सतावत आहे.
पण घाबरू नका ह्यावर्षी महाराष्ट्रत दुष्काळ पडणार नाही अजून दोन ते अडीच महिने पाऊस पडणार आहे व उघड दिलेला पाऊस लवकरच परत सुरु होणार आहे असे त्यांनी सांगितले आहे.
पंजाबराव डख यांनी पुढे असे नमूद केले कि दर वर्षी ऑगस्ट च्या पहिल्या पंधरवड्यात पाऊस उघड देत असतो व १५ ऑगस्ट नंतर म्हणजे १६ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट पर्यंत पुन्हा पाऊस जोमाने पडत असतो.
त्यामुळे यावर्षीही उघड दिलेला पाऊस आता परत ५ दिवसांनी म्हणजे १६ ऑगस्ट पासून पडणार आहे त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांची, खुरपणी, कोळपणी, फवारणी इत्यादी राहिले असेल त्यांनी लवकरात लवकर संपून घायची आहे.
हा पाऊस कुठे कुठे असणार आहे ?
पंजाबराव डख असे सांगतात कि १६ ते ३० ऑगस्ट दरम्यान येणारा हा पाऊस महाराष्ट्रात सर्वदूर म्हणजे खालील भागात
मराठवाडा
विदर्भ उत्तर महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्र
कोंकण
खान्देश
अशा सर्व भागात असणार आहे.
तसेच पुढे पंजाबराव डख असे म्हणतात कि तरीपण राज्यात दिनांक १२ ते १५ दरम्यान हि स्थानिक पोषक वातावरण जर तयार झाले तर काही काही भागात तुरळक सरी पडू शकतात व ऊन व पाऊस असा हा पाऊस असेल.
राज्यातील धरणे कधी भरणार ?
पंजाबराव डख यांनी यासंदर्भात पण भाष्य केले आहे ते असे सांगतात कि यावर्षी काही राज्यात दुष्काळ पडणार नाही कारण यावर्षी पाऊस अजून दोन ते अडीच महिने थांबणार आहे,
त्यामुळे राज्यातील सर्व धरणे भरणार आहेत, त्यामुळे शेतकरी बांधवानी या संदर्भात चिंता करण्याची गरज नाही असे हि त्यांनी सांगितले आहे.
शेतकरी बांधवानी हा अंदाज आपल्या सर्व व्हाट्सअप ग्रुपवर शेयर करायचा आहे जेणेकरून सर्वांपर्यंत हा अंदाज पोचेल.