viral video:शेतकऱ्याचे भन्नाट जुगाड,बनवले भंगारातून कोळपे कोळपणी होतीय डबल नक्की बघा !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

viral video शेतकऱ्याचे भन्नाट जुगाड,बनवले भंगारातून कोळपे कोळपणी होतीय डबल नक्की बघा !

नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्वांचे पिके आता चांगले डोलू लागले आहेत जणू कष्टांना आता फळ आले आहे. पावसाची वाट बघून पावसाचे योग्य नियोजन करून त्याप्रमाणे पेरणी शेतकरी बांधवांनी केले आहे आणि आता पीक हे चांगले जोमात आले आहे  

त्यामुळे आता प्रमुख काम करावे लागते ते शेतीच्या मशागतीची यामध्ये प्रामुख्याने फवारणी,खुरपणी,कोळपणी इत्यादी. कामाची लगबग चालू चालू झाली आहे.

काळ बदलत गेला तसा शेतीमध्ये बैलांचा वापर कमी होऊ लागला व त्याची जागा ट्रॅक्टर ने घेतली यामध्ये बैलाने केली जाणारे सर्व कामे कमी होऊन शेतीची सर्व कामे ट्रॅक्टरने केली जाऊ लागली आहेत कारण वाढत्या पशुखाद्याचा खर्च इत्यादी अनेक कारणामुळे शेतकऱ्यांना बैल जोड सांभाळणे अवघड झाले आहे त्यातून जमिनीचे क्षेत्र कमी झाले आहे म्हणजे वडिलांच्या जमिनीची वाटणी होऊन मुलांना कमी होत आहे त्यामुळे बैल सांभाळणे शेतकऱ्यांना आजकाल परवडत नाही.

शेतकऱ्यांनी आता ट्रॅक्टरचा वापर सुरू केला आहे त्यामुळे मोठे ट्रॅक्टर छोटे ट्रॅक्टर वापरले जातात परंतु ते खरेदी करणे प्रत्येक शेतकऱ्याला शक्य नसते शेतीची कोळपणी करण्यासाठी भाड्याने ट्रॅक्टर आणावे लागते त्यासाठी एकरी 1500 ते 2000 रुपये खर्च येतो.

शेतकऱ्यांना पीक आल्यानंतर मशागती साठी काही काळच भेटतो एकदा पिकामध्ये तन वाढले की खुरपणी करून सर्व शेतकरी कोळपणी करतात खुरपणी कोळपणी केली तर तन कंट्रोलमध्ये राहते,शेतात तन वाढत नाही कोळपणी नाही केली तर तन वाढवून ते पिकाला मारून टाकते मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

त्यामुळे सर्व शेतकऱ्यांची खुरपणी कोळपणी साठी लगबग चालू असते खुरपणी आपण घरच्या घरी किंवा कामगारांनी करू शकतो परंतु कोळपणी करण्यासाठी ट्रॅक्टर मालकावर अवलंबून राहावे लागते म्हणजे ट्रॅक्टर वेळेत नाही भेटले तर कोळपणी करणे अवगड जाते  आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांना स्वतःच्या मालकीचे ट्रॅक्टर घेणे महाग किंवा खर्चिक असते आणि कोळपे नाही झाले तर हातचे आलेले पीक हातातून निघून जाते शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते.

शेतकऱ्याचा जुगाड ट्रॅक्टरमध्ये केले बदल जे मोठ्या कंपन्यांनाही जमले नाहीत!

आपला भारतामध्ये  टॅलेंटला कमी नाही असेच एक देशी जुगाड कोळपणीवर रामबाण उपाय एका शेतकऱ्याने शोधून काढलेला आहे वेळेत ट्रॅक्टर भेटणे अवगड शेतीचे होणारे नुकसान पाहता त्याने घरच्या घरी जुगाड वापरून कोळपणी यंत्र बनवले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान होण्यापासून वाचता येणार आहे व हे यंत्र टाकाऊ वस्तु पासून बनवण्यात आलेले आहे त्यामुळे प्रत्येक शेतकरी कमी खर्चामध्ये असे यंत्र बनवून शेतातील कामे अतिगतीने करू शकतात.

यामुळे ट्रॅक्टरने कोळपणी करण्यासाठी येणारा खर्च वाचून आपली वेळ व पैस्याची बचत होते.

हे यंत्र टाकाऊतून टिकाऊ असल्याने कमी खर्चामध्ये बनते.

यासाठी भंगार मधील काही गज अँगल इत्यादीचा वापर करून तसेच जुना खराब झालेला इंजिनच्या फवारायचे इंजन वेगळे करून ते या यंत्रासाठी वापरण्यात आले आहे हे इंजन आपल्याला कोळपणीच्या वेळेस या यंत्राला जोडून आणि फवारणीच्या वेळेस त्या फवाऱ्याला जोडून डबल काम होणार आहे.

म्हणजे वेळेची बचत होणारच आहे आणि शेतीचे काम अधिक गतीने होणार आहे.

सध्या सोशल मीडियावर या कोळपणी यंत्राचा व्हिडिओ खूपच व्हायरल होत आहे तो आम्ही खाली लिंक मध्ये दिलेला आहे ज्या शेतकऱ्यांने हे यंत्र बनवणे आहे ते भन्नाट यंत्र बनवलेले आहे

कोणत्या भागातील शेतकऱ्यांनी हे यंत्र बनवलं आहे याची अजून माहिती मिळाली नाही परंतु जर आपल्याला हे यंत्र कोण बनवले आहे त्या शेतकऱ्याचे नाव जिल्हा गाव माहित असेल तर आपण ते कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता.

या कोळपणी यंत्रणामुळे शेतकऱ्यांना खूपच फायदा होणार आहे त्याच्या कार्याचे खरोखरच कौतुक

आपण vairal  video मधील यंत्र पहिले असता असे दिसून येईल की याला जुन्या चाकांचा वापर तसेच भंगार मध्ये जुने अँगल याचा वापर करून यंत्र बनवले आहे, व त्यावर एका फवारा पंपाचे इंधन बसवले आहे, त्या इंजिनच्या माध्यमातून हे यंत्र पुढे पुढे जाते आहे 

एक माणूस या यंत्राद्वारे कोळपणी  करू शकतो त्यामुळे या यंत्राचा वापर करून कोळपणीला गती येत आहे व शेतकऱ्याचे रान एकदम सुंदर असे दिसून येत आहे शेतात कोठेही तन दिसत नाही

आपणही अशा प्रकारचे यंत्र बनवून शेतातील कोळपणी वेळेत करू शकता हे यंत्र एकदा बनवले की दरवर्षी आपणास वापरता येणार आहे तसेच कोळपणीची कामे झाली की त्यावर बसवलेले फवाराचे इंजन काढून परत फवाऱ्याला बसवून फवारणी करता येणार आहे या यंत्रासाठी अंदाजे खर्च पाच ते सहा हजार रुपये खर्चा आला आहे अशी माहिती मिळत आहे

जर तुम्हाला ही माहिती आवडली तर हा लेख सर्व whatsApp group वर नक्की पाठवा.

कोळपे यंत्राचा जुगाड

viral video

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment