Tannashak : तन नाशक फवारणी करायची आहे;नक्की वाचा!

Tannashak : तन नाशक फवारणी करायची आहे;नक्की वाचा!

अवकाळी पावसामुळे बळीराजाचे फार मोठे नुकसान होतं. नुकतीच पेरणीचे दिवस चालू आहेत त्यात पावसाने झड घातली आहे त्यामुळे शेतात सगळीकडे तन नाशक उगवला आहे. आणि शेतकरी मित्राचे मशागतिचे कामे चालू झाली आहे. त्यामुळे आपला बळीराजा दुःखी आहे. तर आपण त्या शेतकरी राजा साठी एक गुड न्यूज घेऊन आलो आहोत. तर आपण एक नवीन औषध घेऊन आलो आहोत ते म्हणजे तन नाशक फवारणीसाठी. कारण तन नाशक नष्ट करण्यासाठी शेतकरी खूप कष्ट करतो. यातनामुळे तीस ते चाळीस टक्के पिकाचे नुकसान होते. खूप जणांची पेरणी आधीची तन नाशक फवारणी राहून गेलेली आहे त्यामुळे सोयाबीन मध्ये भरपूर प्रमाणात पण उगवला आहे. लागवडीपासून आपण 17 ते 21 दिवसांमध्ये आपणही तन नाशक फवारणी करू शकतो आणि हीच चांगली वेळ आहे तन नाशक फवारणी करण्याची व तन नष्ट करण्याची. 

तन नाशक फवारणीसाठी लागणारे औषध खालील प्रमाणे आपण पाहूयात

1.क्रिस्टल कंपनीचे (Amora)

क्रिस्टल कंपनीचे रासायनिक नाव आहे Fomesafen 12% + Quizalofop Ethyl 3%sc

 त्यासाठी लागणारी फवारणीची योग्य वेळ ती म्हणजे लागवडी नंतर 17 ते 21 दिवसांच्या दरम्यान

प्रतेक एकराला 600 ml लागेल.

ह्य तन नाशकामुळे लांब व रुंद पानांच्या तणांचा नायनाट करते.

2. Adama कंपनीचे  (Shaked)

Adama कंपनीचे  रासायनिक नाव आहे Propaquiizafop 2.5 + Imazethapyr 3.75% w/w ME

त्यासाठी लागणारी फवारणीची योग्य वेळ ती म्हणजे लागवडी नंतर 17 ते 21 दिवसांच्या दरम्यान.

प्रतेक एकराला 800 ml लागेल.

ह्य तन नाशकामुळे लांब व रुंद पानांच्या तणांचा नायनाट करते.

3. Odyssey कंपनीचे ( BASF)

Odyssey कंपनी चे रासायनिक नाव आहे Imazamox 35% + Imazethapyr 35% wg

त्यासाठी लागणारी फवारणीची योग्य वेळ ती म्हणजे लागवडी नंतर 17 ते 21 दिवसांच्या दरम्यान

प्रतेक एकराला 40 gm लागेल.

ह्य तन नाशकामुळे लांब व रुंद पानांच्या तणांचा नायनाट करते. उष्ण वातावरण असताना फावरल्यास चांगले परिणाम येतात. वातावरण थंड असताना वापर टाळावा.

फवारणी करत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेच्या आहे. तणनाशक फवारणी करण्याआधी तण 2 ते 4 पानांचे झालेले असावे. फवारणी साठी विहिरीचे किंवा शेततळ्यातील साफ आणि स्वच्छ पाण्याचा वापर करावा. गढूळ पाण्याचा वापर टाळावा. फवारणी साठी बॅटरी पंपाचा वापर करावा.

सुरू झाली नवी योजना;प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र!

Leave a Comment