Emergency alert: severe
This is a test alert from Department of Telecommunication, Government of India.20-07-2023.10:20 AM
तुमचे ही मोबाईलवर सकाळी 10:20 सुमारास आला का ,जर आला असेल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे.
आज सकाळी दहा वाजून वीस मिनिटाला देशातील अनेका च्या मोबाईल अचानकपणे इमर्जन्सी बीप वाजू लागली यात ले अनेक जण तर घाबरून गेले.
पण घाबरण्याचे काहीच कारण नाही मित्रांनो काळजी करू नका ही एक फक्त चाचणी होती.
तर तो मेसेज काय होतात ते आपण आधी पाहू
ज्या लोकांची मोबाईलची भाषा इंग्लिश होती त्यांच्या मोबाईल मध्ये खालील प्रमाणे मेसेज दिसून आला
This is a test alert from Department of Telecommunication, Government of India.20-07-2023.10:20 AM
लोकांचे मोबाईलची भाषा मराठी होती त्यांच्या मोबाईल मध्ये खालील प्रमाणे मेसेज दिसून आला
Emergency alert: severe
हा भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडून एक चाचणी इशारा आहे. 20-07-2023.10:20 AM
हा मेसेज कुणाकडून आला ?
भारत सरकारचे जे टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंट आहे त्यांच्या मार्फत हा मेसेज आला होता म्हणजे झाली टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंट ने हा अलर्ट जारी केला होता.
हा अलर्ट कोणत्या कारणाने जारी केला होता ?
जेव्हा देशावर कुठले संकट येईल किंवा आणीबाणी येईल त्यावेळी देशातील सर्व नागरिकांना एकाच वेळी मेसेज पोहोचण्यासाठी किंवा सर्व नागरिकांना अलर्ट करण्यासाठी हा मेसेज केला होता.
जेणेकरून भविष्यात कुठली संकट आले तर सर्व नागरिकांना वेळेत अलर्ट मिळेल
आज सकाळी 10:20 मिनिटांनी इंग्रजीमध्ये हा मेसेज आणि त्यांच्या मोबाईलवर दिसला त्यानंतर 10:31 मिनिटांनी हाच मेसेज मराठीमध्ये देखील पुन्हा दिसून आला हा अलर्ट चा मेसेज फक्त एक चाचणी होते त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये असे सरकारने सांगितले आहे
भारत देश सोडून दुसऱ्या कुठल्या देशात असे चाचणी घेण्यात आली होती ?
भारत देश सोडूनही मागील एप्रिल महिन्यात ब्रिटन मध्येही अशाच प्रकारची चाचणी घेण्यात आले होते त्यांनीही त्यांच्या देशातील नागरिकांचे मोबाईलवर अलर्ट मेसेज पाठवला होता तो मेसेज असा होता “कीप काल्म अँड कॅरी “
भविष्यातही आपल्या मोबाईलवर असा मेसेज येऊ शकत त्यामुळे नागरिकांनी काळजी करायची नाही किंवा घाबरून जायचं नाही उलट तो मेसेज वाचून काही इमर्जन्सी आहे हे समजून घेऊन त्याप्रमाणे आपले वर्तन करायचे आहे
Epik pahani:ई-पीक पाहणीचे फायदे;नाहीतर होईल नुकसान !
आपला मोबाईल मध्ये असे वायरलेस मेसेज बंद करण्याची सुविधा देखील असते परंतु जर हे सेटिंग आपण केले तर आपल्याला कुठलाही इमर्जन्सी अलर्ट मिळणार नाही त्यामुळे कोणीही हा इमर्जन्सी वायरलेस मेसेज बंद हे करायचे नाही.