Shasan Aplya Dari Yojana: शासन आपल्या दारी;घरी बसून मिळवा सर्व योजना चा लाभ !

शिंदे फडणवीस सरकारने सामान्य जनतेचे विविध शासकीय कामात होणाऱ्या हाल पाहून किंवा त्यांना अधिक त्रास होऊ नये यासाठी शासन आपल्या दारी हे अभियान सुरुवात केले आहे.

शासन आपल्या दारी के अभियान सामान्य जनतेसाठी खूप लाभदायक आहे असे शासनाने दावा केला आहे.

आता सामान्य जनतेला कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी शासकीय कार्यालयात न येता शासनच त्यांच्या दारापर्यंत जाणार आहे.

या अभियानांतर्गत शासन गावोगावी जाऊन प्रत्येक घरोघरी जाऊन विविध शासकीय योजनांची माहिती सांगणार आहे व त्यासाठी लागणारे कागदपत्रे इत्यादी ची माहिती देणार आहे.

शासनाच्या कुठल्याही योजनेला ज्या कोणत्याही व्यक्तीला अर्ज करायचा आहे ते अर्ज करून लगेचच त्यांना ती योजना पात्र असतील तर मंजूर करून दिली जाणार आहे.

त्यामध्ये महाराष्ट्रातल्या सर्व योजना समावेश असणार आहे.

या अभियानांतर्गत कुठल्या विभागाच्या योजना राबवल्या जाणार आहे ?

शासन आपल्या दारी या अभियाना अंतर्गत औद्योगिक कौशल्य विकास,मत्स्य व्यवसाय विकास, सारथी, आवास, कल्याणकारी योजना, आदिवासी विकास, कृषी नुकसान भरपाई, दिव्यांग सबलीकरण,, रोजगार शिक्षण आरोग्य इत्यादी घटकाचा समावेश केला जाणार आहे.

या योजनेअंतर्गत किती लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे ?

महाराष्ट्र शासनाच्या दाव्यानुसार या योजनेत प्रत्येक जिल्ह्यात 75 हजार लाभार्थ्यांना एकाच ठिकाणी लाभ देण्यात येणार आहे.

शासनाने नेमून दिलेल्या दरामध्येच 200 पेक्षा जास्त योजनांचा लाभ जनतेला कमीत कमी कागदपत्रे दाखल करून घेता येणार आहे.

योजनेची शुभारंभ कोठून झाला ?

शासन आपल्या दारी योजनेचा शुभारंभ शनिवार दिनांक 13 मे 2023 रोजी दौलत नगर जिल्हा सातारा येथून झाला आहे .

शासन आपल्या दारी अभियाना अंतर्गत कुठल्या योजना राबवल्या जाणार आहेत

“शासन आपला दारी“ या अभियानामार्फत पुढील सर्व योजना राबवल्या जाणार आहेत.

1 . मासेमारी साधनांच्या खरेदीवर अर्थसहाय्य योजना

पात्र लाभार्थी – मासेमारी करणारे व्यवसायिक

या योजनेअंतर्गत काय लाभ भेटणार आहे ?

जे लोक मासेमारी व्यवसाय समुद्रामध्ये करतात त्यांच्यासाठी जाळीची आवश्यकता असते जाळी शिवाय मासेमारी करण्यासाठी अशक्य असते.

परंतु समुद्रात मासेमारी करण्यासाठी लागणारे जाळे हे खूप महाग असतात हे झाडळे  खरेदी करण्यासाठी शासनातर्फे विशेष अनुदान दिले जाणार आहे.

आता जाळीची सोय झाली परंतु मासेमारी करण्यासाठी समुद्रात जाण्यासाठी नावे ची आवश्यकता असते तर त्यासाठी ही शासनाने अनुदान देण्याचे घोषित केले आहे

या योजनेअंतर्गत बिगर यांत्रिकी बोटीना  म्हणजे लाकडी किंवा फायबरच्या ज्या नौका असतात त्या खरेदीसाठी शासन अनुदान देणार आहे.

या योजनेसाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे

 • आधार कार्ड.         
 • जी बोट किंवा जाळी खरेदी करायची आहे त्याचे कोटेशन.
 • बँक पासबुक झेरॉक्स.
 • नोंदणी कृत मच्छिमार म्हणून नोंदणी असलेले सर्टिफिकेट.
 • उत्पन्नाचा दाखला.
योजेनची पडताळणी करण्यासाठी शासनाच्या खाली दिलेल्या अधिकृत  वेबसाइटवर  जावून खात्री करू शकता https://fisheries.maharashtra.gov.in/assist-purchase-fishery-requisite

2.मासेमारी संकट निवारण निधी योजना

पात्र लाभार्थी – मच्छीमार चे वारसदार

या योजनेअंतर्गत काय लाभ भेटणार आहे ?

जय मच्छीमाराचे मासेमारी करत असताना अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदाराला एक लाख रुपये अनुदान भेटणार आहे.

या योजनेसाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे

 • नोंदणीकृत मच्छीमार म्हणून नोंदनी असलेले सर्टिफिकेट.
 • ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे त्याच्या वारसदाराचे आधार कार्ड व बँक पासबुक.
 • पोस्टमार्टम रिपोर्ट.
 • पोलीस एफ आय आर FIR.
 • सदरील ग्रामपंचायतीचे मृत झालेल्या व्यक्तीचा वारसदार म्हणून वारस प्रमाणपत्र.
 • सदरील संस्थेची शिफारस पत्र.
योजेनची पडताळणी करण्यासाठी शासनाच्या खाली दिलेल्या अधिकृत  वेबसाइटवर  जावून खात्री करू शकता https://fisheries.maharashtra.gov.in/natural-calamities-marine

3.संजय गांधी निराधार अनुदान योजना

पात्र लाभार्थी  – निराधार व्यक्ती

या योजनेअंतर्गत काय लाभ भेटणार आहे ?

अनेक व्यक्ती असे असतात की त्यांना कुठलेही वारसदार नसतात अशा निराधार व्यक्तींना आर्थिक साह्य देण्याचे काम शासन करते.

शासनाच्या भाषेत निराधार व्यक्ती म्हणजे कुठलाही आधार नाही.

निराधार शेतमजूर महिला,अपंग व्यक्ती, विधवा महिला ,अनाथ मुले, देवदासी, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या विधवा पत्नी,दुर्धर आजार असलेल्या पीडित व्यक्ती.

या योजनेसाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे

 • रहिवासी प्रमाणपत्र.
 • आधार कार्ड.
 • फोटो रेशन कार्ड.
 • शाळा सोडल्याचा दाखला.
 • तहसीलचा उत्पन्नाचा दाखला.
 • बँक पासबुक.
 • अपंग असेल तर जिल्हा रुग्णालयाचे अपंग प्रमाणपत्र.

4.श्रावणबाळ राज्य निवृत्तीवेतन योजना

पात्र लाभार्थी – निराधार व्यक्ती

या योजनेअंतर्गत काय लाभ भेटणार आहे ?

राज्यातील अशा व्यक्ती ज्यांना कुठलाही आधार नाही किंवा त्यांना वारसदार नाही अशा निराधार व्यक्ती.

ज्यांचे आर्थिक उत्पन्न खूपच कमी आहे अशा दारिद्रय रेषेखालील परंतु 65 वर्षे पूर्ण झालेल्या पात्र व्यक्ती.

या योजनेसाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे

 • आधार कार्ड रेशन कार्ड.
 • अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो.
 • ग्रामपंचायत रहिवासी प्रमाणपत्र.
 • जन्माचा दाखला.
 • उत्पन्नाचा दाखला.
 • बँक पासबुक.

5. PMFME प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना (केंद्र पुरस्कृत)

पात्र लाभार्थी – शेतकरी

या योजनेअंतर्गत काय लाभ भेटणार आहे ?

भांडवली गुंतवणूक करण्यासाठी एकूण दहा लाखापर्यंत व गुंतवणुकीच्या 35 टक्के पर्यंत अनुदान.

जे शेतकरी गटाने या योजनेचा लाभ घेणार आहेत त्यांच्यासाठी भांडवली गुंतवणूक व पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी एकूण खर्चाच्या 35 टक्के अनुदान.

उत्पादित झालेल्या मालाचे मार्केटिंग आणि ब्रॅण्डिंग करण्यासाठी 50 टक्के अनुदान.

स्वयंसहाय्यता गट असेल तर त्यांच्या सदस्यांना बीज भांडवल म्हणून 40 हजार रुपये प्रति सदस्य व प्रशिक्षणासाठी लाभार्थ्यांना शंभर टक्के अनुदान

इन्क्युबेशन सेंट र उभारणीसाठी शासकीय संस्था असेल तर शंभर टक्के अनुदान खाजगी संस्था असेल तर 50 टक्के अनुदान व अनुसार सूचित जाती जमातीचा व्यक्ती असेल तर 60% अनुदान

या योजनेसाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे

 • सदरील उद्योगाचे नोंदणी.
 • आधार कार्ड ,पॅन कार्ड.
 • प्रकल्प अहवाल व कोटेशन.
 • सदरील उद्योगाचे मागच्या तीन वर्षाचे आय टी आर ITR .
 • कर्ज प्रक्रिया करण्यासाठी लागणारे कागदपत्रे.
योजेनची पडताळणी करण्यासाठी शासनाच्या खाली दिलेल्या अधिकृत  वेबसाइटवर  जावून खात्री करू शकता https://maitri.mahaonline.gov.in/

6.MREGS:कृषी विभाग महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना

पात्र लाभार्थी – शेतकरी

या योजनेअंतर्गत काय लाभ भेटणार आहे ?

या योजनेअंतर्गत 100 टक्के अनुदान मिळणार आहे ते अनुदान दरवर्षी याप्रमाणे तीन वर्षात विभागून भेटणार आहे.

यात फळबाग लागवडीसाठी अनुदान भेटणार आहे त्यामध्ये बांधावरील फळबाग, सलग जमिनीवरील फळबाग,पडीक जमिनीवरील फलबाग इत्यादी पात्र असणार आहेत.

फुलझाडे लागवडीसाठी 100 टक्के अनुदान भेटणार आहे.

यामध्ये निशिगंध,गुलाब, सोनचाफा, मोगरा याचा समावेश आहे.

गांडूळ खत प्रोजेक्ट तयार करण्यासाठी तसेच कंपोस्ट खत युनिट प्रोजेक्ट करण्यासाठी अनुदान.

शेततळे बांधण्यासाठी.

या योजनेसाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे

 • आधार कार्ड.
 • 7/12, 8 अ .
 • जॉब कार्ड.
 • बँक पासबुक.
 • ग्रामपंचायत ठराव.
योजेनची पडताळणी करण्यासाठी शासनाच्या खाली दिलेल्या अधिकृत  वेबसाइटवर  जावून खात्री करू शकता  https://mahaegs.maharashtra.gov.in येथे क्लिक करा 
महाराष्ट्र शासनाचे अधिकृत फेसबुक पेज "शासन आपल्या दारी " यावर जाऊन योजनांची खात्री करण्यासाठी
येथे क्लिक करा

1 thought on “Shasan Aplya Dari Yojana: शासन आपल्या दारी;घरी बसून मिळवा सर्व योजना चा लाभ !”

 1. 1.Crop insurance not distributed by co-operative banks because they donot ट्रान्सफर ammount immediately.2.increase water perculation thanks in each 10 aker or 5 Ekr land.otherwise donot give अनुदान.3.take plane paper affidivate from farmer that which Crop हे is cultivating.तो them give अनुदान otherwise no.sumit online form to taluka agriculture office .4.keep Crop insurance to chily,,termeric,General,coriyader,

  Reply

Leave a Comment