Panjab Dakh: तातडीचा मेसेज;आठ दिवसात शेतीचे कामे संपून घ्या कारण !
शेतकरी मित्र हो आपल्याला माहित आहे कि हवामान अभ्यासक पंजाबराव डख नेहमी शेतकरी हितासाठी हवामानाचा अंदाज देत असतात.
त्यामध्ये पावसा संदर्भात महत्वाची माहिती शेतकरी बांधवाना मिळते व त्यानुसार म्हणजे हवामानाचा अंदाज घेऊन शेतकरी बांधव शेतातील कामाचे नियोजन करत असतात. त्यामुळे शेतकरी बांधवासाठी हवामान अंदाज खूप महत्वाचा ठरतो.
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांच्या दिनांक ३ ऑगस्ट रोजीच्या नवीन अंदाजनुसार वातावरणात खालील बदल अपेक्षित आहेत.
यामध्ये राज्यात कोणत्या भागात पाऊस राहणार आहे व कोणत्या भागात पाऊस उघड देणार आहे ते सांगितले आहे तसेच या वर्षीच पावसाळा अजून किती महिने असेल यासंदर्भात पण महत्वाची माहिती दिली आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवानी हवामान अंदाज वाचून झाल्यास तो पुढे तुमच्याकडील सर्व व्हाट्सअप ग्रुपवर पाठवायचा आहे.
पंजाबराव डख हवामान अंदाज
सर्व शेतकरी बांधवासाठी महत्वाचा संदेश असा आहे कि ह्या आठ दिवसात शेतीचे मशागतीचे काम, फवारणी, कोळपणी, खुरपणी करून घायची आहे कारण
पंजाबराव डख असे सांगतात कि या महीन्यात सुरवातीच्या काळात महाराष्ट्रात सर्वदूर पावसाचे वातावरण नाही म्हणजे सगळीकडे तुरळक प्रमाणात पाऊस असणार आहे.
दिनांक ३ व ४ ऑगस्ट दरम्यान विदर्भतील काही भागात रिमझिम पाऊस म्हणजे थोडासा चिक चिक पाऊस असेल.
तसेच दिनांक ५ ऑगस्ट पासून राज्यात थोडा पावसाचं जोर ओसरायला सुरवात होईल.
आणि त्यानंतर ९ ते १० दिवसांनी म्हणजे दिनांक १३ ते महिना अखेर म्हणजे ३० ऑगस्ट पर्यंत पाऊस संपूर्ण राज्यात आणखी सक्रिय होईल.
पण अजून एक महत्वाची माहिती लक्षात घ्यायची आहे कि राज्यात काही भागात स्थानिक वातावरण म्हणजे त्या भागापुरते पूरक वातावरण तयार होऊन तिथे १४ तारखेपर्यंत अर्धा ते १ तासा इतका पाऊस होऊ शकतो.
राज्यात मराठवाडा व विदर्भ भागातीळ तुरळक ठिकाणी रिमझिम पाऊस पडेल पण तो पाऊस संपूर्ण राज्यभर नसणार आहे.
👇🔽👇पंजाब डंख हवामान अंदाज whatsApp group जॉइन करन्या साठी येथे टच करा👇🔽👇
कारण विदर्भ भागातून कमीदाबाचा एक पट्टा जात आहे त्यामुळे तो पाऊस विदर्भाला ला लागून असलेला एरिया म्हणजे मध्यप्रदेश भागात व तसेच पुढे उत्तरप्रदेश भागात जास्त पाऊस पडणार आहे.
हा पट्टा महाराष्ट्रातील विदर्भ व मध्यप्रदेशच्या सीमेवरून जाणार असल्या कारणाने विदर्भ भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. राज्यात सर्व ठिकाणी सध्या पाऊस नाही आहे.
सर्व शेतकरी बांधवासाठी महत्वाचा संदेश असा आहे कि ह्या आठ दिवसात शेतीचे मशागतीचे काम, फवारणी, कोळपणी, खुरपणी करून घायची आहे.
शेतकरी बांधवानी लक्षात घ्यायचं आहे कि शेवटी हा हवामान अंदाज आहे, वारे मध्ये बदल झाला कि ठिकाण, वेळ, दिशा बदलते हे आपणास माहित असावे.
सर्व शेतकरी बांधवानी हा अंदाज लक्षात घायचा आहे व पुढे सर्व शेतकरी बांधवाना तुमच्याकडील व्हाट्सअप ग्रुपवर पाठ्वाचे आहे जेणेकरून सर्वच फायदा होईल.