२५ लाख रुपये अनुदान गाई पालनास सरकारची नवीन योजना माहिती

महाराष्ट्र राज्य 4 मार्च 2015 रोजी महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम 1995 कायदा लागू केला यामध्ये सर्व गोवंशय प्राण्यावर हत्या करण्यास बंदी घालण्यात आले आहे.

गोहत्या बंदी घालण्यात आल्यामुळे निर्माण झालेल्या समस्या सोडवण्यासाठी गोशाळांना चालना देण्याचे ठरवले आहे त्यामुळेच इतके भरघोस अनुदान देण्यात येणार आहे.

यात गोशाळांना 15 लाख ते 25  लाख इतके अनुदान मिळणार आहे.

गोशाळांना बंदी घातल्यामुळे राज्यामध्ये शेती कामासाठी किंवा रेतन करण्यासाठी उपयुक्त नसलेले  बैल किंवा वळू आणि भाकड गाई  यांचा प्रश्न निर्माण झाला त्यामुळे यावर उपाय म्हणून महाराष्ट्र शासनाने 2017-18 पासून गोवर्धन गोवंश सेवा केंद्र ही योजना लागू केली .

योजना मुंबई व मुंबई शहर वगळून राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये लागू करण्यात आली आहे.

ही योजना 2017 18 मध्ये लागू करण्यात आली असली तरी यावर्षी या योजनेत काही सुधारणा करून अनुदानात वाढ केलेली आहे व गोशाळांना भरघोस अनुदान देण्यात येणार आहे.

किती गोशाळची निवड या गोशाला अनुदान योजने महाराष्ट्र साठी केली जाणार आहे ?

चालू आर्थिक वर्षासाठी राज्यातील 34 जिल्ह्यामधील 324 तालुक्यात प्रत्येकी एक गोशाळा याप्रमाणे अनुदानासाठी निवड करण्यात येणार आहे निवड केलेल्या घोषणांना तेथील प्राण्यांच्या संख्यानुसार अनुदान दिले जाणार आहे.

गोशाळा नोंदणी कशी करावी ? Goshala nondani maharashtra

सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या जिल्हा पासून संवर्धन विभागाच्या वेबसाईटवर जावे लागेल आणि तिथे सदरील अनुदानाच्या अनुषंगाने गौशाला रजिस्ट्रेशन फॉर्म महाराष्ट्र गोशाळा नोंदणी प्राणली सर्च करून योजनेसाठी अर्ज करू शकता नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक यूजर पासवर्ड मिळेल त्याचा वापर करून तुम्ही आपले खाते तयार करावे व सदरील युजर आयडी चा वापर करून कागदपत्रे अपलोड करावी.

गोशाळा अनुदान योजना महाराष्ट्र 2023 साठी अर्ज कसा करवा ?

गोशाळा अनुदानासाठी अर्ज कोठे करावा?

गोशाळा अनुदान घेण्यासाठी सदरील गोशाळांनी ज्या सरकारने निर्माण केलेले नियम  पात्र आहेत अशा सर्व गोशाळा त्यांच्या जिल्ह्यातील जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्याकडे अर्ज करू शकतात.

गोशाळा अनुदान कसे मिळेल ?

सरकारी नियमानुसार पात्र ठरलेल्या घोषणांना एकूण अनुदानापैकी 60 टक्के अनुदान हे पहिला टप्प्यात तर राहिलेले 40 टक्के अनुदान हे दुसऱ्या टप्प्यात वाटप होणार आहे.

गोशाळा अनुदान निवडीसाठी चे नियम ?

सदरील गोशाळा ही धर्मदाय आयुक्त कडे नोंदणी करत असावे.

गोशाळा पाळणाचा कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव असावा.

सदरील गोशाळाकडे असलेल्या पशुधन साठी लागणारा चारा स्वतःच्या मालकीचा किंवा तीस वर्षासाठी भाडे करार करून किमान पाच एकर जमीन घेतलेली असावी.

गोशाळाचे मागील पाच वर्षाचे ऑडिट झालेले असावे.

गोशाळेच्या नावाने राष्ट्रीयकृत बँकेत खाते असावे.

गोशाळा एकूण किती अनुदानदिले जाते ?

50 ते 100 प्राणी15 लाख अनुदान  
101 ते 200 प्राणी20 लाख अनुदान  
201 पेक्षा जास्त प्राणी25 लाख रुपये अनुदान

अनुदान कशासाठी असेल ?

 • पशुधनासाठी नवीन  शेडचे बांधकाम करणे किंवा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी.
 • पाण्याची सोय नसेल त्याकरता विहीर बांधणे किंवा बोरवेल घेणे यासाठी असेल.
 • चारा कट करण्यासाठी कुट्टी मशीन किंवा विविध यंत्र खरेदी करण्यासाठी असेल.
 • उन्हाळ्यात चार टंचाई येऊ नये म्हणून मुरघास प्रकल्प निर्मिती करण्यासाठी.
 • जनावरा पासून निर्माण झालेले शेण खत यांचा वापर करून विविध गांडूळ खत प्रकल्प निर्माण करण्यासाठी.
 • विविध चारा लागवडीसाठी किंवा नवीन चाऱ्याच्या जाती खरेदी करण्यासाठी.
 • विज जोडणे किंवा कृषी पंप खरेदी किंवा गोशाळा मध्ये विदूतिकरण करणे यासाठी हे अनुदान.
 • तसेच गोशाळेतील विविध आजारी प्राण्यांचे देखभालीसाठी वैद्यकीय सुविधा घेण्यासाठी ही अनुदान.

महाराष्ट्र शासना प्रमाणे उत्तर प्रदेश शासनाने युपी गोशाला योजना लागू केलेली आहे

हे ही वाचा : डेअरी फार्म व्यवसाय संपूर्ण माहिती

गाईंच्या निवार्‍याला काय म्हणतात ?

गाईच्या निवाऱ्याला गोशाळा म्हणतात.

भारतात एकूण किती गोशाळा आहेत ?

2019 च्या पशु गणानुसार भारतात एकूण पाच हजाराहून अधिक गोशाळा आहेत.

गोशाळा कशी सुरू करावी ?

गोशाळा सुरू करण्यासाठी सुरुवातीला आपल्याकडे उपलब्ध जागा तपासून पहावे तसेच आपण गोशाळा सुरू करण्यासाठी कितीसक्षम आहोत हे तपासून घ्यावे त्यानंतर सदरील आपल्या जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या वेबसाईटवर जाऊन आपल्या गोशाळाची नोंदणी करावी,त्यानंतर आपल्या गोशाळेची धर्मादाय आयुक्त कडे नोंदणी करावी.

गोशाळा सुरू करण्यासाठी आपल्याकडे उपलब्ध पुरेशी जागा चारा व पाण्याची व्यवस्था असणे गरजेचे आहे.

गोशाळा म्हणजे काय ?

गोशाळेचा शब्दसा अर्थ काढायचा झाला तर गोशाळा म्हणजे गाईसाठींचा निवारा ज्या ठिकाणी काही वासरे बैल वळू यासाठी निवारा असतो त्याला गोशाळा म्हणतात यात मुख्यतः भाकड गाई अकार्यक्षम वळू अपंग वासरे वयोवृद्ध बैल यांना आसरा दिला जातो व त्यांचे संगोपन केले जाते.

FAQs

गोशाळा उघडण्यासाठी किती पैसे लागतील ?

साधारणता एक वीस ते पंचवीस पशूची गोशाळा उघडायचे असेल तर 10 लाख रुपये खर्च येतो परंतु शासनाच्या गोशाळा अनुदान उचलून हे तुम्हीही गोशाळा सुरू करू शकता.

भारतातील सर्वात मोठी गोशाळा कोणती आहे ?

भारतातील सर्वात मोठी गोशाला गोपाल गोवर्धन गोशाळा ही आहे ही 200 एकर जागेत  स्थापन झाली आहे यामध्ये 18 हजाराहून अधिक गुरांची संख्या आहे ही गोशाळा राजस्थान मधील सांचोर जिल्ह्यात पथमेडा गावात आहे.

4 thoughts on “२५ लाख रुपये अनुदान गाई पालनास सरकारची नवीन योजना माहिती”

  • धन्यवाद माहिती आवडली असेल तर आपल्या whatsap ग्रुप वर नक्की शेयर करा

   Reply
  • धन्यवाद माहिती आवडली असेल तर आपल्या whatsap ग्रुप वर नक्की शेयर करा

   Reply

Leave a Comment