Yashogatha: केवळ ३० गुंठे शेतात; लाखाचे उत्पन्न!

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुका हा डोंगराळ; परंतु निसर्गरम्य तालुका म्हणून ओळखला जातो. येथील बहुतांश शेतकरी अल्पभूधारक आहेत.

कृषी विभाग व आत्मा विभागाच्या सहकार्याने या भागात विविध योजना राबवून शेतीचा आणि शेतकऱ्यांचा विकास होत आहे. पन्हाळा तालुक्यातील हरपवडे येथे भाऊसाहेब फुंडकर यांनी शेतात फळबाग लागवड योजनेचा लाभ घेऊन काजू व आंबा लागवड केली.

२०१८-१९ मध्ये त्यांनी केवळ २० गुंठ्यात वेंगुर्ला ७ काजू लागवड, तर आणखी २० गुंठ्यात देवगड हापूस आंबा लागवड केली. काजू लागवड करणे, मशागत, रोपे खरेदी, ठिबक सिंचन यासाठी त्यांना २५ हजार रुपयांचा खर्च आला, तर आंबा रोपांची खरेदी, लागवड, मशागत, भरणी या कामांसाठी ३० हजार रुपये खर्च आला.

यात त्यांना साधारण ३५ ते ४० टक्के लाभ कृषी विभागाकडून मिळाला. याबरोबरच कृषी विभागाच्या महाराष्ट्र राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेतून पॉवर ट्रेलरसाठी ८५ हजार रुपयांचे अनुदान मिळाले. त्यामुळे शेतीशी संबंधित बरीचशी कामे सोपी झाली.

श्री. फुंडकर यांना केवळ तीन ते चार वर्षात काजू बियांचे भरघोस उत्पादन होऊ लागले आहे.

सध्या पहिलेच पीक असल्यामुळे सुरुवातीलाच एका रोपापासून प्रतिवर्षी पाच ते सात किलो काजू बियांचे उत्पादन होत आहे.

या वर्षी एका रोपापासून २ हजार ५०० ते ३ हजार रुपयांचे म्हणजेच २० गुंठ्यात साधारण ५० रोपांपासून ३५ हजारांचे उत्पन्न मिळाले.

याशिवाय १० गुंठे शेतात त्यांनी भाजीपाला लागवड केली. वांगी व कोबी मुख्य पिकांमध्ये फ्लॉवर, हिरवी मिरची, गाजर, मुळा, भेंडी यासह झेंडू, पोकळा, कोथिंबीर, राजगिरा, मेथी अशा झिगजॅग पद्धतीने आंतरपीक भाजीपाला लागवड केली.

यातून १० गुंठ्यात सहा महिन्यात ७० हजार रुपयांचा फायदा झाला. या शेतीत केलेल्या ठिबक सिंचनासाठीही प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून ५५ टक्के अनुदान मिळाले. यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बदलण्यास मदत झाली.

कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवण्यात येत असून याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यायला हवा, असे आवाहन त्यांनी अन्य शेतकऱ्यांना केले आहे.

गावातील गायरान जमिन म्हणजे कोणती जमीन? गायरान जमीन कोणत्या कामासाठी राखीव असते?

शेतकऱ्यांसाठी संजीवनी

कृषी विभागाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत शेडनेट हाऊस उभारणी प्रकल्प वैयक्तिक लाभाचा घटक आहे. हा प्रकल्प शेतीला बळकटीकरण देत असून शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरत असल्याची भावना कमल निंबाजी माळी (कळमसरा, ता. पाचोरा, जि. जळगाव) यांनी व्यक्त केली आहे.

मोजे कळमसरा हे पाचोरा-जामनेर रस्त्यावरून साधारणतः ५ ते ६ किमी आत असलेले गाव आहे. मौजे कळमसरा गावाचे जवळपास २५५१.५९ हेक्टर भौगोलिक क्षेत्र असून, या क्षेत्रापैकी १९७७.३२ हेक्टर निव्वळ पेरणी क्षेत्र आहे.

त्यात १९७१.३२ हेक्टर क्षेत्र हे बागायती क्षेत्र आहे. कमल निंबाजी माळी यांच्या कुटुंबाने पारंपरिक शेतीमधून काहीतरी नवीन करावे, या उद्देशाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत शेडनेट हाऊस उभारणीबाबत माहिती प्राप्त करून घेतली.

लगेच ०.४० आर क्षेत्रावर शेडनेट उभारणीकरिता ऑनलाइन अर्ज दाखल केला. पूर्वसंमती प्राप्त झाल्यावर लगेच त्यांनी शेडनेट हाऊसची उभारणी सुरू केली. माळी यांचे चिरंजीव आनंदा माळी यांनी हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटर, तळेगाव दाभाडे येथे शेडनेट उभारणी व लागवड व्यवस्थापन या विषयाची पूर्ण माहिती घेऊन पीक घेण्यास सुरुवात केली.

या शेडनेट हाऊस उभारणीसाठी त्यांना एकूण रुपये २१ लाख १३ हजार इतका खर्च आला. त्यापैकी श्रीमती माळी यांना प्रकल्पाकडून आधार लिंक खात्यावर डिबीटी ऑनलाइन प्रणालीद्वारे रुपये १८ लाख १९ हजार ४८१ इतके अनुदान प्राप्त होणार आहे.

या कुटुंबाने शेततळ्याच्या बाजूला १ हेक्टर ५५ आर क्षेत्रफळात बाग लागवड केली. मोसंबी या पिकाची जुलै २०२१ मध्ये ४५० रोपांची लागवड केली असून माहे नोव्हेंबर २०२२ अखेर म्हणजेच साधारणतः दीड वर्षात पिकाची वाढ ५ फुटांपर्यंत झाल्याचे दिसून येत आहे.

जोपर्यंत मोसंबी पिकाचे उत्पादन येण्यास सुरुवात होते तोपावेतो शेतीचे अर्थकारण सुरू राहण्याच्या अनुषंगाने माळी कुटुंबाने पपईच्या रोपांची लागवड केली असून माहे डिसेंबर २०२२ च्या पहिल्या आठवड्यापासून उत्पादन निघण्यास सुरुवात झाली आहे

पहिल्या तोडीनंतर दर १५ दिवसांनी पपईचे उत्पादन मिळाले. साधारणतः पपईचे एक झाड हे १ क्विंटलपर्यंतचे उत्पादन देते. सद्य:स्थितीला प्रतिकिलो १० ते १५ रुपये दर मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

विहीर बांधण्यासाठी साठी ४ लाख रुपये अनुदान

Leave a Comment