नमस्कार शेतकरी मित्रहो, आपल्याला माहित आहे कि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाने उजाड दिलेली होती व सगळीकडे दुष्काळ जाण्या परिस्थिती आहे.
Panjab Dakh : शेतकरी बांधवासाठी तातडीचा संदेश
हाताशी जोमाने आलेली पिके उन्हाने करपत आहेत, त्यामुळे लवकरात लवकर पाऊस पडण्याची गरज आहे.
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी ऑगस्ट महिन्याच्या शेवटी दिलेल्या हवामान अंदाज मध्ये त्यांनी सांगितल्या प्रमाणे आज दिनांक १ सप्टेंबर ला राज्यात विविध भागात पाऊस पडत आहे.
पंजाबराव डख यांनी दिनांक १ सप्टेंबर रोजी नवीन हवामान अंदाज दिला आहे व यात सर्व शेतकरी बांधवाना संदेश दिला आहे तो खालील प्रमाणे आहे.
पंजाबराव डख यांचा दिनांक १ सप्टेंबर २०२३ रोजी दिलेला हवामान अंदाज.
मागच्या अंदाज मध्ये असे सांगितले होते कि राज्यामध्ये दक्षिण व पश्चिम महाराष्ट्रामध्ये २ तारखेपासून पावसाला सुरवात होईल त्याप्रमाणे सुरवात झालेली आहे.
सर्व शेतकरी बांधवासाठी आनंदाची बातमी
संपूर्ण राज्या मध्ये रविवार म्हणजे ३ सप्टेंबर पासून बऱ्याच भागामध्ये पावसाळा सुरवात होणार आहे.
त्यानंतर ४,५,६,७,८,९,१० सप्टेंबर रोजी पाऊस सगळीकडं पडणार आहे व सर्व पिकांना जीवदान भेटणार आहे.
जरी दुष्काळ पडणार आहे असे बोलले जात असले तरी पण पुढची दोन महिने सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात भरपूर पाऊस पडण्याची शक्यता आहे.
अजून महत्वाचे एक सर्व शेतकरी बांधवानी लक्षात घ्याचा आहे कि ३ ते २५ सप्टेंबर दरम्यान बंगालच्या उपसागरात एका मोगोमाग एक असे अनेक चक्रीवादळ तयार होणार आहेत.
या चक्रीवादळाचा पाऊस महाराष्ट्राला पडणार आहे हे आपण ध्यानात घ्यायचं आहे.
राज्यामध्ये १ तारखेला तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे पण २ सप्टेंबर व रविवार म्हणजे ३ सप्टेंबर पासून सगळीकडे पाऊस पडून पिकांना जीवनदान मिळणार आहे.
हा रविवार पासून पडणारा पाऊस पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र, कोकण पट्टी, मुंबई, पुणे उत्तर महाराष्ट्र या सगळ्या भागात १० तारखेपर्यंत पाऊस पडणार आहे.
आपणाला माहित आहे बऱ्याच ठिकाणी पिके सुकलेले आहेत पण सुकलेल्या पिकांसाठी हा पाऊस जीवदान ठरणार आहे, हे शेतकरी बांधवानी लाक्षात घ्यायचा आहे.
परत एकदा असे सांगतो कि राज्यात ३ सप्टेंबर पासून २५ सप्टेंबर पर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस पडणार आहे.
पुढे पंजाबराव डंख यांनी असे सांगितले आहे कि जर वातावरणात अचानक काही बदल झालं तर नवीन अंदाज देण्यात येईल.
तसेच सर्व शेतकरी बांधवानी खालील गोष्ट लक्ष्यात घ्यायची आहे.
नोट – पंजाबराव डख यांनी दिलेला हा पावसाचा हवामान अंदाज आहे व यात वारेमध्ये मध्ये बदल झाला तर पावसाचे पडण्याचे ठिकाण, पावसाची वेळ व पावसाची दिशा बदलत जाते.
महत्वाची टिप – वर दिलेला हा पावसाचा हवामान अंदाज ज्यांना पटत नाही किंवा आवडत नाहीत त्यांनी सदर हवामान अंदाजकडे दुर्लक्ष करून सोडून द्यावा.
हा हवामान अंदाज अभ्यासक पंजाब डख यांनी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या शेतकरी बांधवासाठी दिलेला आहे.
जे शेतकरी बांधव पंजाबराव डख याना ओळखतात व त्याच्यावर विश्वास आहे त्यांनी हा अंदाज लक्षत घ्यावा.
तर शेतकरी बांधवानो असा वरील हवामान अंदाज पंजाबराव डख यांनी दिला आहे.
पंजाबराव डख हवामान अंदाज साठी खालील ग्रुप जॉईन करा
आम्ही फक्त तुमचा अंदाज बघतो इतरांचा मनसुबा आम्ही ओळखून आहोत.
तुमचा अंदाज एखाद वेळेस चुकला तरी विश्वास फक्त तुमच्यावर च आहे.