E Pik Pahani last date: ई पीक पाहणी; शेवटचे काही दिवस!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

E Pik Pahani last date: ई पीक पाहणी; शेवटचे काही दिवस!

नोंदणी करण्यासाठी खालील गोष्टी अवश्य पहा .

१. अद्यावत गा. नं. ७/१२ आणि ८ अ ची प्रत.

२. जमीन मालक आपली नोंदणी करतील.

३. सामायिक मालकीच्या जमिनीसाठी, ज्याचे नाव गां.न.नं. ७/१२ मध्ये

सामूहिक आहेत, ते स्वतंत्रपणे आपली आपली नोंदणी करू शकतील.

नोंदणी केलीनंतर जावेळी शेतामध्ये पीक पाहणी करत असाल मोबाइल मध्ये

lokasan खालील प्रमाणे करावे.

अ. lokesan ह्या आयकॉन वर क्लिक करून लोकेशनच Method ही “फोन फक्त” (Phone only ) ह्या प्रमाणे सेट कराववी .

ब. त्या मध्ये असलेले ऑप्शन Emergency Location Service हे  off करावे  .

किंवा

क. अक्षांश रेखांश अचूक जुळवणीसाठी आपला मोबाईल airoplan option वरटाकावा . पीक पहाणी करून  झालि की सर्व माहिती सर्वर वर अपलोड होणेसाठी पुनः नेट सुरू कराववे व नंतर माहिती अपलोड करावी.

ई पीक पाहणी हेल्पलाईन क्र ०२०२५७१२७१२

ॲप वापरण्यासाठी आवश्यक साधन

अद्यावत प्रणाली : अँड्रॉईड 4.4(KitKat) किंवा त्यावरील

इंटरनेट : 3G, 4G किंवा वायफाय wifi

मेमरी :कमीतकमी 2GB रॅम

कीबोर्ड :गुगल इंडीक कीबोर्ड (मराठी टायपिंगसाठी)

ई पीक पाहणी कशी करावी

सर्वात आधी आपल्या मोबाईल मध्ये google Play store ओपन करावे त्यामध्ये E Peek pahani हे अँप सर्च करावे व ते डाउनलोड करावे

अँप डाउनलोड पूर्ण झाल्यानंतर त्यामध्ये आपला महसूल विभाग निवडायचा आहे

 त्यानंतर तेथे तुम्हाला  मोबाईल नंबर टाकण्याचे ऑप्शन येईल तेथे आपला मोबाईल नंबर वरून पुढे जायचे आहे

त्यानंतर पुढे तुमचा विभाग जिल्हा तालुका गाव हे सर्व निवडायचे आहे आणि पुढे ओके करायचे आहे

आता तुम्हाला पुढे तुमचे पहिले नाव मधले नाव आडनाव खाते क्रमांक गट क्रमांक यापैकी एखादी माहिती भरून सर्च बटनावर क्लिक करायचे आहे व खातेदाराचे निवड करायचे आहे

आता पुढे आलेले तुमचे खाते निवडून पुढे ओके करायचे

आता पुढे तुम्हाला पीक पेरणी ची माहिती भरायची आहे

त्यानंतर आपल्या पिकाची निवड करायची

त्यानंतर तुम्हाला पिकासाठी सिंचन साधन कुठले आहे हे निवडायचे आहे

यानंतर तुम्हाला तिथे तुमच्या पिकाचा फोटो अपलोड करा म्हणून एक ऑप्शन येईल त्याद्वारे आपल्या पिकांचा फोटो अपलोड करायचा आहे

व लगेचच पिकाचे अक्षांश ठिकाण सहित पिकाचे छायाचित्र अपलोड करायचे आहे

आणि तुम्हाला तुमचे पीक पाणी झाले म्हणून ओके येईल तिथे ओके करायचे आहे

Leave a Comment