Maharshtra News: धरणे अद्याप भरली नाहीत;राज्यात दुष्काळ जाहीर!
Agriculture News: राज्यात या वर्षी काही भागात पाऊस झालं आहे परंतू जास्तीत जास्त भागात म्हणावा तसा पाऊस झालेला नाही यामुळे खरिपाची पिके होरपळत आहेत.
तसेच राज्यात सरासरी पेखा खूप कमी पाऊस झाल्यामुळे राज्यातील धरणे अद्याप भरलेली नाहीत.
तर काही भागात अद्याप पाऊस झालेलाच नाही आहे. बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांच्या हातचे पीक निघून गेलेलं आहे तसेच पेरणी व खताचा तसेच मजुरी चा खर्च पण वाया गेला आहे.
त्यामुळे सध्याची हि परिस्थिती पाहता महाराष्ट्राची या वर्षी दुष्काळाकडे वाटचाल दिसत आहे, त्यामुळे राज्यशासनाने त्वरित दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना पीक विमाजाहीर करावा अशी मागणी विविध शेतकरी नेत्याकडून तसेच शेतकरी कडून होत आहे .
शेततळे योजना इतके रुपये अनुदान; मत्स्य उत्पादनतून पैसाच पैसा !
या वर्षी पावसाळा सुरु झाल्यांनतर जून ते जुलै या महिन्यामध्ये दरवर्षीप्रमाणे अपेक्षित असलेला पाऊस त्या प्रमाणमध्ये पाऊस झाला आणि अतिशय कमी पाऊस झाला व त्यात ऑगस्ट महिन्यामध्ये तर पावसाने उघड दिली आहे त्यामुळे एकूणच पाऊस खूपच कमी झाला आहे.
यावर्षी चा पाऊस हा सरासरी पाऊस हा ८० टक्के पेक्षाहून हि कमी पडलेला आहे त्यामुळे यावर्षी पाण्याची परिस्थिती भीषण असेल असे सध्य परिस्थितीवरून वाटत आहे.
व शेतकऱ्याचे हातचे पीक निघून जात आहे व काही ठिकाणी तर गेले पण आहे. ह्या सादर परिस्थितीकडे पाहून त्या त्या भागातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळायला हवा.
तसेच पुढील परिस्थिती पाहता उपलब्ध पाण्याचे नियोजन, पशूंना चारा याचे हि नियोजन आवश्यक आहे.
तरी सद्य परिस्थिती पाहता राज्य सरकार ने यावरती निर्णय घेने आवश्यक आहे.