Weather Report Video: कधी येणार पाऊस ? पंजाब डख स्पष्टच बोलले !
नमस्कार शेतकरी मित्रानो, आपल्या माहित आहे यावर्षीच्या हंगामात महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये पेरणी झाली आहे.
परंतु ऑगस्ट च्या पहिल्या आठवड्यापासून महाराष्ट्रामध्ये सर्व दूर पावसाने उघड दिली आहे.
हाताशी आलेली पिके जाऊ नये म्हणून शेतकरी बांधव पावसाची चातक पक्ष सारखी वाट बघत आहे.
अशावेळी शेतकरी बांधवाना पाऊस येणार तर कधी हा प्रश्न पडला आहे ?
आणि पाऊस कधी येणार ह्या प्रश्नच उत्तर कोणालाही देता येत नसला तरी पाऊस कधी येणार याबाबत अंदाज मात्र दिला जाऊ शकतो आणि या अंदाजवरच शेतकरी बांधवाना विश्वास ठेवावा लागत आहे.
तर मग असा अंदाज देत ते सरकारची वेधशाळा व इतर खाजगी हवामान अभ्यासक.
मग आता विषय आला हवामान अभ्यासक यांचा तर सगळ्यात जास्त हवामान अंदाज देणारे व जास्त हवामान अंदाज खरे ठरलेले पंजाबराव डख हे सगळ्यात जास्त अचूक अंदाजासाठी प्रसिद्ध आहेत.
पण या वर्षी सर्व हवामान अंदाज अभ्यासक यांच्या अंदाजला पण पाऊस हुलकावणी देत आहे, सर्व हवामान अंदाज अभ्यासक यांनी सांगितलेले सर्वच्या सर्व पावसाचे अंदाज शंभर टक्के खरे ठरत नाहीत.
अशावेळी शेतकरी बांधव हवालदिल होत आहेत, कारण पाऊस येत नाहीय त्यामुळे ब्र्हमनिरास होत आहे.
हवामान अभ्यासक पंजाब राव डख यांनी मागच्या अंदाज मध्ये सांगितले होते कि महाराष्ट्रामध्ये सर्वत्र १८ तारखेपासून पाऊस पडेल पण बऱ्याच भागात पाऊस पडला नाही, याचा अर्थ असा नाही कि अंदाज खोटा ठरला कारण त्यांनी सांगितलेल्या अंदाजाप्रमाणे खूप ठिकाणी पाऊस झाला.
ज्या ठिकाणी पाऊस झाला त्यांना वाटत अंदाज बरोबर आला पण जिथे कमी प्रमाणात पाऊस झाला त्यांना वाटत अंदाज चुकला मग त्या भागातील शेतकरी जेंव्हा टीका करत आहेत तेंव्हा त्यांनी हे लक्षात घायचा आहे कि हा अंदाज असतो.
आणि पावसाचं अंदाज चुकला हणून सर्वत्र टीका होत असताना शेतकरी बांधवानी हे लक्षात घ्यायचं आहे कि पंजाबराव त्यांच्या अंदाजमध्ये शेवटी नेहमी सांगत असतात कि वारे बदलले कि पावसाची ठिकाण, वेळ व दिशा बदलते आणि शेवटी हा अंदाज आहे.
नवीन हवामान अंदाज पंजाबराव डख यांचा व हवामान विभागाचा
तर नवीन हवामान अंदाज मध्ये असे सांगितले आहे उद्यापासून म्हणजे दिनांक २५ ते ३० ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रामध्ये हलक्या ते मध्यम सारी पडणार आहेत.
प्रामुख्याने हा पाऊस विदर्भ व कोकण भागामध्ये असणार आहे असे सांगितले आहे.
तसेच मराठवाडा व खान्देश मध्ये हि हलक्या ते माध्यम पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
शेवटी हा अंदाज आहे तर आपण शेतकरी बांधव फक्त विश्वास ठेवू शकतो व देवाला प्रार्थना करू शकतो कि लवकर चांगला पाऊस पडावा आलेली पिके अजून जोमात यावी.
सर्व शेतकरी बांधवानी हा अंदाज आपल्या गावातील व्हाट्सअप ग्रुप वर शेयर करायचा आहे व खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून टेलिग्राम चॅनेल जॉईन करायचे आहे.
व अशाच शेतीच्या संदर्भात महत्वाच्या माहितीसाठी बाजूला असलेल्या व्हाट्सअप बटण वर क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे.