land purchase loan:जमीन खरेदीला शंभर टक्के अनुदान,लवकर घ्या लाभ!

नमस्कार मित्रांनो शेत जमिनीच्या खरेदी साठी १००% अनुदान. महाराष्ट्र राज्य सरकार हे नवनवीन योजना राबवत असतात.  त्यामधील ही एक खूप यशस्वी आणि मोठी योजना आहे या योजनेअंतर्गत आपल्याला जमीन खरेदी करण्यासाठी शंभर टक्के अनुदान दिले जाते.

 यामध्ये दोन एकर बागायती आणि चार एकर जिरायती जमीन खरेदी करण्यासाठी हे अनुदान दिले जाते.  चला तर मग जाणून घेऊया या योजनेसाठी कोण कोण लाभार्थी आहेत.

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण आणि स्वाभिमान योजना ही महाराष्ट्र सरकारने भूमिहीन अनुचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यासाठी सुरू केलेली योजना आहे.

 कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण आणि स्वाभिमान योजनेअंतर्गत जमीन खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.  या योजनेअंतर्गत एस सी (SC )म्हणजेच अनुचित जाती आणि (ST )अनुचित जमाती या शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त दोन एकर ते चार एकर जमिनी खरेदी किंमतीवर शंभर टक्के अनुदान दिले जाते.

या योजनेअंतर्गत जिराईत जमीन खरेदी करण्यासाठी प्रति एकर चार लाख रुपये म्हणजेच चार एकर चे सोळा लाख रुपये पर्यंत अनुदान दिले जाते.  आणि बागायत जमीन खरेदी करण्यासाठी प्रति एकर आठ लाख रुपये निधी दिला जातो.  एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त चार एकर जिर आहेत आणि दोन एकर बागायत जमीन खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते.

ही योजना अनुचित जाती आणि अनुचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी  स्वतःच्या मालकीची स्वतःचा हक्काची जमीन आणि त्यांचे स्वाभिमान सुधारण्यासाठी एक उत्तम योजना म्हणून सुरू केलेली आहे, हे अनुदान अनुचित जाती आणि अनुचित जमातीच्या भूमिहीन शेतकऱ्यांना दिली जाते ही महाराष्ट्र राज्य शासनाची योजना खूप यशस्वी झाली आहे.

 या योजनेअंतर्गत हजारो शेतकऱ्यांना जमीन खरेदी करण्यासाठी मदत मिळाली आहे.  जर तुम्ही अनुचित जाती व अनुसूचित जमातीचे शेतकरी असाल तर या योजनेचा लाभ घेऊ शकता या योजनेला मध्ये अर्ज करण्यासाठी जर तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही अर्ज करू शकता.

शेतात मोगऱ्याचा सुगंध ,महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत लाभ , प्रति १० गुंठ्यास २६,७४० रुपये इतके अनुदान

या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पात्रता आपण जाणून घेऊया.

या योजनेअंतर्गत अर्ज भरण्यासाठी मुळामध्ये शेतकरी एससी(SC) किंवा एसटी(ST) असला पाहिजे म्हणजेच अर्जदार हा अनुचित जाती व अनुचित जमाती मधील असला पाहिजे.

अर्जदार भूमिहीन असले पाहिजेत.

अर्जदाराकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.

अर्जदाराचे बँक अकाउंट असणे आवश्यक आहे.

अर्जदाराचे वय हे 18 ते 60 च्या दरम्यान असले पाहिजे.

अर्जदार ज्या गावचे रहिवासी आहेत त्याच गावांमधील जमीन ही विकत घेऊ शकतात म्हणजेच ज्या जमिनीसाठी आपण अर्ज करत आहोत त्याच गावातील तुम्ही रहिवासी असले पाहिजेत.

मित्रांनो आपण एकत्रित पाहिलं तर ही योजना खूप प्रभावी पद्धतीने राबवली जात आहे. या योजनेसाठी इच्छुक असलेले लाभार्थ्यांची संख्या खूप जास्त आहे.

अनुचित जाती आणि अनुसूचित जमाती मधील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही कागदपत्रे आवश्यक आहेत तर अर्जदारांनी ही कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे चला तर मग जाणून घेऊया अर्जासोबत जोडणारी कागदपत्रे

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे

अर्जदाराच्या जातीचा दाखला

अर्जदाराचा उत्पन्नाचा दाखला

भूमिहीन शेतमजूर असल्याचे तलाठ्याचे प्रमाणपत्र

 दारिद्र्य रेषेखालचे राशन कार्ड (इसवी सन 2002 नंतरचे)

रहिवासी प्रमाणपत्र (किती वर्षाचे रहिवासी आहे याचा उल्लेख असलेले ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र)

 रेशन कार्ड ची सत्यप्रत

इतर कुठेही जमीन नसल्याचे प्रतिज्ञापत्र

ई-पीक पाहणीचे फायदे;नाहीतर होईल नुकसान

Leave a Comment