mogra sheti:शेतात मोगरा शेती सुगंध;प्रति १० गुंठ्यास २६,७४० रुपये इतके अनुदान!

शेतात मोगऱ्याचा सुगंध ,महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत लाभ , प्रति १० गुंठ्यास २६,७४० रुपये इतके अनुदान

शासनाच्या योजनांचा लाभ देऊन शेतकऱ्यांच्या जीवनात सुगंध फुलवण्याचे काम ठाणे जिल्हा कृषी कार्यालयाने केले आहे. भिवंडी तालुक्यातील वापे या आदिवासीबहुल गावात २०२२ मध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात मोगरा लागवड केली गेली आहे.

ठाणे हा नैसर्गिक वरदान लाभलेला जिल्हा असून भात हे मुख्य पीक म्हणून घेतले जाते; परंतु गेल्या ४-५ वर्षांपासून बदललेल्या हवामानामुळे व अवेळी पडणाऱ्या पावसामुळे खरीप हंगामातील भात हे पीकसुद्धा शेतकऱ्याच्या हाताला मिळेनासे झाले होते.

भिवंडी तालुक्यातील कृषी विभागाचे कृषी साहाय्यक विवेक दोंदे यांनी पुढाकार घेऊन वापे गावातील आदिवासी शेतकऱ्यांना एकत्रित करून फुलशेतीचे महत्त्व पटवून दिले आणि वर्षभर येणारे मोगरा हे फुलपीक घेण्याचे आवाहन केले.

त्यांच्या आवाहनाला गावातील २० महिला व पुरुष शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला. त्यांच्या या कामाला कृषी विभागाने रोजगार हमी योजनेची जोड दिली.

गावातील २० शेतकऱ्यांनी पावसाळा सुरू झाल्यानंतर जून महिन्यामध्ये एकूण २० हजार मोगरा रोपांची लागवड केली. साधारणतः प्रत्येक शेतकऱ्याने १० गुंठ्यांत १ हजार मोगरा रोपांची लागवड केली आहे.

या पिकाची पूर्ण वाढ होण्यास एक वर्षाचा कालावधी लागला.

यासाठी कृषी विभागाकडून रोजगार हमी योजनेंतर्गत प्रति १० गुंठ्यास २६,७४० रुपये इतके अनुदान शेतकऱ्यास देण्यात आले. लागवडीस जवळपास वर्ष होत आले असून मोगऱ्याचे उत्पन्न येण्यास सुरुवात झाली आहे.

झाडाची वाढ मर्यादित असल्याने सुरुवातीला गुंठ्यांत १० जवळपास दीड ते दोन किलो फुलकळी मिळण्यास सुरुवात झाली आहे. फुलांची विक्री गावातच होते.

हे ही वाचा कामाचे आहे

आपल्या मोबाईल मध्ये शेती विषय लागणारे सर्व कागदपत्रे सहज

व्यापारी फुले येऊन घेऊन जात असल्याने शेतकऱ्यांच्या प्रवास खर्चात बचत झाली.

नोव्हेंबर ते फेब्रुवारीमध्ये १५०० रुपये किलोप्रमाणे दर मिळत होता. सध्या बाजारात आवक वाढल्याने किमान २०० रुपये प्रति किलोप्रमाणे दर मिळत असून महिन्याकाठी १२ ते १४ हजार रुपये कुटुंबाला मिळत आहेत.

जसजशी झाडांची वाढ होत राहील, तसतसे पुढे १० गुंठ्यात १० ते १२ किलो उत्पन्न सुरू होईल.

या पूर्वी गावातील महिला व पुरुष शेतकरी हे मोलमजुरीसाठी इतरत्र जात होते. मात्र आता फुलशेती सुरू केल्यामुळे शेतकरी वर्षभर आपल्याच शेतात काम करून चांगले उत्पन्न मिळवत असून त्याची दुसरीकडे मोलमजुरी करून होणारे कष्ट कमी झाले आहेत.

मोगरा पिकातील बंगलोरी ही जात वर्षभर फूल देणारी असून आम्ही त्याची निवड करून लागवड केली आहे. साधारणतः एक वर्षानंतर हे पीक उत्पन्न देण्यास सुरुवात करते.

मोगरा हे पीक संजीवनी देऊन जाणारे पीक असून गावातील शेतकऱ्यांची मोलमजुरीत होणारी ससेहोलपट कमी झाली याचे समाधान शेतकऱ्यांनी व्यक्त केले.

Leave a Comment