sarathi scholarship 2024:सारथी शिष्यवृत्ती योजना;मिळणार 40 lakh!

sarathi scholarship2024:सारथी शिष्यवृत्ती योजना;मिळणार 40 lakh!

नमस्कार मित्रांनो राज्य सरकारचा महत्त्वाचा मोठा निर्णय.

महाराष्ट्र राज्य शासन हे नवनवीन योजना राबवत असतात, त्यातील काही योजना शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, नोकरीसाठी, व्यवसायासाठी असतात परंतु आज राज्य सरकार विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी योजना राबवत आहे.  या योजनेअंतर्गत दरवर्षी विद्यार्थ्यांना चाळीस लाख रुपये पर्यंत लाभ मिळणार चला तर मग जाणून घेऊया या योजना अंतर्गत कोणत्या विद्यार्थ्यांना लाभ मिळू शकतो. यासोबतच हा लाभ घेण्यासाठी आपल्याला काय कागदपत्रे लागतील किंवा अटी काय असतील हे जाणून घेऊया.

महाराष्ट्र राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा आशा जातीच्या सर्व विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे पुढील शिक्षण घेण्यासाठी दुसऱ्या देशांमध्ये नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश घेता येत नाही यामुळे विद्यार्थ्यांची पात्रता असून देखील घरच्या च्या आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थी आपले भविष्य उच्च शिक्षणापासून वंचित राहत आहे.

 तर या योजनेअंतर्गत मराठा, कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा या जातीतील मुला,मुलींसाठी परराष्ट्रातील  विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी सयाजीराव गायकवाड सारथी योजना हि गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशात  शिक्षण शिष्यवृत्ती  देत आहे , म्हणजेच सारथी स्कॉलरशिप योजना सुरू करण्यात आली आहे.

सारथी योजना ही योजना चार जुलै 2023 पासून राज्य सरकारने सुरू करण्यात मंजुरी दिली आहे. तसेच शासन आदेश 20 जुलै 2023 पासून लागू करण्यात आला आहे.

सारथी  शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना काही लाभ दिले जाण्यात येणार आहेत ते लाभ कोणते हे खालील प्रमाणे जाणून घेऊया.

परदेशातील शैक्षणिक विद्यापीठाची संपूर्ण शिक्षण फी.

अभ्यासक्रमासाठी परदेशात जाण्यासाठी विमान मधील इकॉनोमिक क्लास चे तिकीट (जाण्याचे आणि परतीच्या प्रवासाचे)

निर्वाह भत्ता

वैयक्तिक आरोग्य विमा

पदविका साठी एका विद्यार्थ्यामागे दरवर्षी 30 लाखाची  मर्यादा

पीएचडी शिक्षण घेण्यासाठी प्रति विद्यार्थी प्रतिवर्षी 40 लाखाच्या मर्यादेत परदेशी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

सारथी योजना गुणवंत मुली मुलांसाठी परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना

महाराष्ट्र राज्यातील सर्व गुणवंत विद्यार्थी पदवीधारक किंवा पीएचडी अभ्यासक्रमासाठी क्यू एस वर्ल्ड रांकिंग (QS  world ranking ) मध्ये 200 च्या आत नंबर म्हणजेच रँकिंग असलेल्या शैक्षणिक संस्था गुणवंत अनुसार प्रवेश घेतील. या योजनेअंतर्गत गुणवंत आणि मराठा, कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा अशा पर्वातील एकत्रितपणे 75 विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी परदेशी शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येण्याची मान्यता दिली आहे.  या योजनेअंतर्गत दरवर्षी 75 विद्यार्थ्यांना लाभ मिळू शकतो.

या योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांना अर्ज हा सारथी संस्थेकडून ऑनलाईन स्वरूपात करणे आवश्यक आहे.

या शिष्यवृत्तीची  विभागणी कशा स्वरूपात केली जाईल हे आपण खालील प्रमाणे जाणून घेऊया

क्र अभ्यासक्रमाचे नाव  एम एस/ एम टेक  पीएचडी

१ अभियांत्रिकी         वीस पाच

 २ वास्तु कला शास्त्र      चार दोन

३ व्यवस्थापन         दोन एक

४  विज्ञान        ‌. ‌‌ ‌दहा पाच

५ वाणिज्य.            चार पाच

६ कला         चार-पाच

७विधी अभ्यासक्रम   चार एक

८औषध निर्माण शास्त्र    दोन एक

   एकूण 75 विद्यार्थी

अर्जासाठी आवश्यक शैक्षणिक अटी

परदेशातील एम एस, एम टेक पदवी अभ्यासिकासाठी प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी भारतातील मान्य प्राप्त विद्यापीठामधून कमीत कमी 75 टक्के गुण घेऊन पदवी उत्तीर्ण झालेली असली पाहिजे.

एचडी चा अभ्यासक्रम करण्यासाठी विद्यार्थ्यांनी भारतातील मान्य प्राप्त विद्यापीठातील कमीत कमी 75 गुणसहित पदवी धारण केली पाहिजे

मुख्यमंत्री फेलोशिपदर महीना 75000 हजार; शासनासोबत काम करून कमावण्याची संधी !

वय मर्यादा

एम एस एम टेक अभ्यासक्रमासाठी लाभार्थ्याची वयाची कमीत कमी 35 वर्ष अशी अट आहे

पीएचडी अभ्यासक्रमासाठी लाभार्थ्याच्या वयाची कमान चाळीस वर्षे वयोमर्यादा असावी

सर्वसाधारण अटी व शर्ती

अर्जदार हा मराठा, कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा राज्यातील रहिवासी व भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे

अर्जदार हा परदेशातील क्यू एस वर्ल्ड रँकिंग(QS  world ranking ) मध्ये 200 च्या अंतर्गत रँकिंग असलेल्या विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळालेला असावा.

परदेशातील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेत असताना विद्यार्थ्यांनी पूर्ण वेळ विद्यार्थी म्हणून प्रवेशित असावा.

अशाप्रकारे सारथी योजनेचा लाभ घेतला जाऊ शकतो या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना खूप मोठी संधी प्राप्त होत आहे आपल्या भविष्याकडे एक पाऊल पुढे टाकण्याचे त्यामुळे विद्यार्थ्यांनी अटीमध्ये बसल्यानंतर अर्ज करा.

शासन आपल्या दारी; घरी बसून मिळवा सर्व योजना चा लाभ !	

Leave a Comment