CM Fellowship Yojana: मुख्यमंत्री फेलोशिप दर महीना 75000 हजार; शासनासोबत काम करून कमावण्याची संधी !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र शासन तरुणांना राज्याच्या प्रगतीसाठी तसेच आपले कल्पक विचार राज्याच्या विकासाला अधिक पोषक ठरवून तरुणांना CM Fellowship Yojana 2023 अंतर्गत शासनासोबत काम करण्याची संधी देत आहे.

महाराष्ट्राला अजून अधिक प्रगतीपथावर आणण्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वांना ही संधी देत आहे  भारत देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो, त्यामुळे तरुणांना जी आकलन क्षमता  असते  व नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची जिद्द असते त्यामुळे शासकीय कामांमध्ये अधिक वाढणार आहे.

तरुणांनी या कार्यक्रमाच्या अनुभव घेतल्यानंतर तरुणांना तुमचे दृष्टी अधिक व्यापक होणार आहे तसेच शासन अधिक जवळून पाहता येणार आहे.

how to apply CM Fellowship Program 2024

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी काय पात्रता लागते ?

उमेदवार कुठल्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे व त्या पदवी मध्ये त्याला कमीत कमी 60 टक्के गुण असणे अनिवार्य आहे

मुख्यमंत्री फेलोशिप CM Fellowship Yojana 2024 कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सदरील उमेदवाराचे वय कमीत कमी  21 व जास्तीत जास्त 26 वर्षे असावे लागते.

उमेदवारास मराठी भाषा लिहिता वाचता बोलता येणे आणि वाले असेल तसेच त्याला इंग्रजी व हिंदीचे ज्ञान असणे आवश्यक आहे

कॅम्पुटर व इंटरनेटचा वापर करता येणे गरजेचे आहे.

पात्र व्यक्तीस कमीत कमी एक वर्षाचा कुठल्याही प्रकारच्या नोकरीचा किंवा प्रशिक्षण किंवा उद्योगाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्री फेलोशिप CM Fellowship Yojana चे स्वरूप काय असेल ?

शासनाच्या विविध विभागात नियुक्ती केली जाईल.

निवड झालेल्या उमेदवारांना बारा महिने शासनासोबत काम करण्याची संधी दिली जाईल ही संधी फक्त बारा महिने असणार आहे कायमस्वरूपी असणार नाही.

ज्या कार्यालयात नेमणूक होईल तेथील अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली हॅलो काम करते व त्यांना मदत करते.

प्रत्यक्ष काम करण्याबरोबरच आय आयटी मुंबई व आय आय एम नागपूर यांना मंकी संस्थेने जो किलो साठी अभ्यासक्रम तयार केला आहे तो पूर्ण करण्याची प्रत्येकावर बंधन नाही.

नेमून दिलेल्या विभागात सदरील उमेदवार फेलो म्हणून काम करावे लागेल.

प्रत्यक्ष फिल्म वरील काम व वरील संस्थेने तयार केलेला अभ्यासक्रम जे फेलो पूर्ण करते अशांना CM Fellowship Yojana 2023 पूर्ण झाले म्हणून एक प्रमाणपत्र भेटेल.

मुख्यमंत्री फेलोशिप CM Fellowship Yojana साठी उमेदवार निवडीची प्रक्रिया काय आहे ?

मुख्यमंत्री फेलोशिप महाराष्ट्र CM Fellowship Yojana उमेदवार निवड ही दोन भागात केली जाते.

भाग एक

ऑनलाइन परीक्षा

ज्या उमेदवारांनी वेळेत अर्ज दाखल केलेले आहेत त्यांची ऑनलाइन परीक्षा ठेवली जाते व ऑनलाईन परीक्षेतून कोणाच्या आधारे पुढील प्रक्रियेसाठी निवड केली जाते.

ही ऑनलाईन परीक्षा विविध पर्याय असलेले ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची असते.

ही परीक्षा इंग्रजी माध्यमातून असते तसेच जिथे गरज वाटेल तेथे इंग्रजी प्रश्नांचे व उत्तराचे मराठीत भाषण तर दिलेले असते.

ही ऑनलाईन परीक्षा एकूण शंभर गुणांच्या असून यातील प्रत्येक प्रश्नाचे 1 गुण असतो व यासाठी एक तास वेळ दिला जातो.

या ऑनलाईन परीक्षेसाठी सामान्य ज्ञान 50 तर्कशास्त्र 10 इंग्रजी भाषा 10 मराठी भाषा 5 माहिती तंत्रज्ञान 10 आणि ऑप्टीटट्यूड  वर 15 प्रश्न विचारले जातात.

भाग 2

ऑनलाइन परीक्षेत दिलेल्या उमेदवारापैकी मेरिट लिस्ट नुसार 210 उमेदवारांची पुढील परीक्षेसाठी निवड केली जाईल.

निवडलेल्या उमेदवारांना तीन वेगळ्या विषयावर निबंध लिहीण्यासाठी विषय दिले जातील त्या विषयावर निबंध लिहून ते दिलेल्या ईमेलवर पाठवणे बंधनकारक राहील.

निबंध लिहीण्यासाठी भाषेचे बंधन नसेल ते मराठी हिंदी किंवा इंग्रजी भाषेत लिहू शकता.

जे उमेदवार तीन निबंध सादर करतील अशाच उमेदवारांना पुढील मुलाखतीसाठी बोलवले जाईल.

यासाठी शंभर गुण असतील.

अंतिम निवड

मुलाखत झाल्यानंतर सर्व गुणांची बेरीज करून .मेरिट लिस्ट केली जाईल व त्यात निवड झालेल्या साठ उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होईल.

प्रतीक्षा यादी

निवड निवड झालेल्या साठ उमेदवारा खेरीज 15 उमेदवारांची प्रतीक्षा यादी जाहीर केली जाईल जर निवड झालेल्या उमेदवारांपैकी कोणी जॉइनिंग करण्यास नकार दिला असेल त्यामुळे जी जागा खाली होईल त्याची प्रतीक्षा यादीतील . अनुक्रमे उमेदवारास प्राधान्य देईल दिले जाईल.

मुख्यमंत्री फेलोशिप २०२३ साठी अर्ज करणेसाठी किती फीस भरावी लागेल

मुख्यमंत्री फेलोशिप २०२३ साठी 500 रु फी भरावे लागेल आणि मुख्यमंत्री फेलोशिप २०२4 साठीही ते 500 अशू शकते.

मुख्यमंत्री फेलोशिप साठी निवड झालेल्या उमेदवारास काय सुख सुविधा लाभ मिळतात ?

निवड झालेल्या उमेदवारास दरमहा 70 हजार रुपये व त्यांना प्रवासासाठी येणारा खर्च म्हणून दरमहा 5000 असे एकत्रितपणे 75 हजार रुपये महिना वेतन देण्यात येते.

निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय सेवेतील क्लास वन अधिकाऱ्याच्या बरोबरीचा दर्जा दिला जातो.

निवड झालेल्या उमेदवारांना बारा महिन्यांसाठी शासनाचे ओळखपत्र व ईमेल आयडी दिला जातो.

फिलोसिपच्या काळात अपघात झाला तर त्यासाठी शासनातर्फे अपघाताचा विमा उतरवला जातो व त्याचे संरक्षण देण्यात येते.

आय आय टी मुंबई किंवा आय आय एम नागपूरयांच्यातर्फे राबवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर एक प्रशिक्षण कालावधी पूर्ण होते ते सर्टिफिकेट दिले जाते.

मुख्यमंत्री फेलोशिप साठी निवड झालेल्या उमेदवारांना किती दिवसांची रजा भेटते ?

मुख्यमंत्री फेलोशिप साठी निवड झालेल्या उमेदवारांना एकूण आठ दिवसाची रजा मिळते .

मुख्यमंत्री फेलोशिप योजना महाराष्ट्र Official Website खालील लिंक वर क्लिक करून खात्री करू शकता https://mahades.maharashtra.gov.in/FELLOWSHIP/indexmr.html

मुख्यमंत्री फेलोशिप साठी निवड झालेल्या उमेदवारांना कुठल्या नियमांची अटींची किंवा शर्ततेची पूर्तता करावी लागते ?

ज्या उमेदवारांची निवड होऊन नियुक्ती झालेली आहे अशा उमेदवारांना या काळात कुठलेही खाजगी नोकरी शासकीय नोकरी किंवा इतर प्रोजेक्ट किंवा इतर शैक्षणिक अभ्यासक्रमास भाग घेता येणार नाही किंवा ऍडमिशन घेता येणार नाही.

मुख्यमंत्री फेलोशिप साठी निवड झाल्यास त्याला फक्त एकदाच फेलोशिप मिळते दुसऱ्यांदा त्याला अर्ज करता.

मुख्यमंत्री फेलोशिप साठी निवड झाली आहे म्हणजे त्याला शासकीय नोकरी लागली आहे असे नाही मुख्यमंत्री फेलोशिप कुठल्याही शासकीय नोकरीची गॅरंटी देत नाही.

उमेदवाराची ज्या विभागात नेमणूक होईल तेथील कामाच्या वेळेचे बंधन त्या उमेदवारास लागू असेल त्या नियमानुसारच किंवा वेळेनुसार त्यास काम करावे लागेल.

गरज भासल्यास अधिक वेळ किंवा अधिकचा प्रवास त्या उमेदवाराला करावा लागेल.

निवड झालेल्या उमेदवाराची मेडिकल टेस्ट पोलीस पडताळणी केली जाईल.

उमेदवाराची च्या शहरात नेमणूक झाली आहे त्याच शहरात त्याला राहावे लागेल.

ही राहण्याची व्यवस्था त्यांना स्वतः करायचे आहे शासन कुठलेही व्यवस्था करण्याचे आम्ही देत नाही.

सदरील कार्यकाळात  उमेदवाराला कुठल्याही राजकीय चळवळीत किंवा बंडा किंवा एखाद्या धोरणात भाग घेता येणार नाही.

उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी tweet करून CM Fellowship Yojana विषयी माहिती दिली आहे ते खलील लिंक वर क्लिक करून पाहू शकता 
शासनाच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंट cm fellowship वरूनही याची माहिती दिली आली आहे ती खालील लिंक वर क्लिक करून आपण तपासून पाहून खात्री करू शकता

1 thought on “CM Fellowship Yojana: मुख्यमंत्री फेलोशिप दर महीना 75000 हजार; शासनासोबत काम करून कमावण्याची संधी !”

Leave a Comment