बैलपोळा ऐवजी ट्रॅक्टर पोळा काय आहे या मागची गंमत
आजकाल प्रत्येक गोष्टी मध्ये आधुनिकता आली आहे. प्रत्येक व्यवसाय हा आधुनिकीकरणाकडे वळत चाललाय त्यातच शेती व्यवसाय हा देखील आधुनिकरणाकडे वाढत चाललाय पूर्वी शेतकरी शेतीच्या नांगरणीसाठी तसेच शेतीच्या मशागतीसाठी बैलांचा वापर करत असे परंतु आता आधुनिकीकरण झाल्यामुळे बैलांच्या ऐवजी ट्रॅक्टर चा वापर शेतीची कामे करण्यासाठी केला जातो. ट्रॅक्टरमुळे शेतीची कामे सहजरित्या झाल्याने बैलांचा वापर हळू हळू कमी प्रमाणात होत आहे.
शेतकरी लोक बैलांप्रती असलेली कृतद्न्यता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा साजरा करतात या दिवशी बैलजोडीला साजशृंगार करून अलंकार घालून त्यांची पूजा केली जाते. त्यांना नेवैद्य दाखवून गावातल्या मंदिराजवळ जाऊन मंदिरासमोर आंब्याच्या पानांचे तोरण बांधून त्याखाली बैलजोडी उभी करून त्याची पूजा करत असे त्यानंतर संध्याकाळी तोरण तोडून पोळा फुटायचा अशी विदर्भातील पूर्वापार पासूनची प्रथा आहे कारण बैलपोळा सणाला विशेषतः विदर्भात फार महत्व आहे. त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांकडे बैल नसायचे असे शेतकरी मातीचे बैल बनवून त्यांची पूजा करत असे.
शेतीकामासाठी बैलांचा वापर कमी प्रमाणात होत असल्याने पवनी तालुक्यात बैलपोळा ऐवजी ट्रॅक्टर पोळा काही वर्षा पासून साजरा केला जातो. बैलांची संख्या कमी होवोत चालल्याने पोळ्या मध्ये बैलजोडी घेऊन जाता येत नसल्या कारणाने तिथल्या शेतकऱ्यांनी बैलांना जसे सजविण्यात येते त्याचप्रमाणे ट्रॅक्टर सजवून पोळ्यात ट्रॅक्टर घेऊन जाण्यास सुरवात केली. २०१९ मध्येच पवनी येथील चंडिका मंदिर परिसरात ट्रॅक्टरचा पोळा भरविण्यात आला.
त्यानंतर कोरोना महामारीच्या दरम्यान तो बंद झाला. त्याचप्रमाणे सावरला मार्गावरील गुडेगाव येथे ट्रॅक्टर पोळा सुरु करण्यातआला व त्याची प्रथा अद्यापही चालू आहे.तसेच कन्हाळगाव रस्त्यावरील सेलारी हनुमान मंदिरात पावनीच्या ट्रॅक्टर पोळ्याची नक्कल करण्यासाठी आयोजित करण्यात आला.