PANJABDAKH: धरणे कधी भरणार ? पंजाबराव डख म्हणतात!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PANJABDAKH: धरणे कधी भरणार ? पंजाबराव डख म्हणतात!राज्यातील बळीराजा सुखावणार,

राज्यात पुढील काही दिवसात पावसाचा इशारा

राज्यात मागील बरेच दिवस पावसाची उघडझाप होत असल्याने राज्यात ढगाळ वातावरण तसेच उन्हाचा चटका बसत आहे त्यामुळे उकाड्यातही वाढ झाल्याचे दिसून येते. अश्या परिस्तिथी मध्ये राज्यातील बळीराजा चिंतेत होता त्यातच आता हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
राज्यातील चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डाख यांनी राज्यात पुढील काही दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा उशिरा तयार झाल्याने पावसाला उशीर झाला आहे.
PANJABDAKH धरणे कधी भरणार ? पंजाबराव डख म्हणतात!बरेच दिवसानंतर पावसाची हजेरी लागणार असल्याने राज्यातील शेतकरी आनंदात आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार राज्यातील बहुतांश ठिकाणी तुरळक सरी बरसणार असल्याचा अंदाज आहे. तर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
ऑगस्ट महिना पाऊस नसल्याने राज्यातील शेतकरी चिंतेत होता परंतु आता हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार पाऊस हजेरी लावत असल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाच वातावरण आहे.
मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील मांजरा धरणातून त्या परिसरातील भागांना पाण्याची आवक होते त्या मांजरा धरणाच्या परिसरात पावसाची हजेरी लागणार आहे, तसेच बीड, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव या भागात देखील पावसाचा अंदाज वर्तवट्यात आला आहे.
विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, त्याचप्रमाणे संपूर्ण विदर्भात पावसाचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दर्शविला आहे. तसेच सोलापूर व पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
कोकण किनारपट्टीवर देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच मुंबईसह मध्य महाराष्ट्रातही पुणे,नाशिक या ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दर्शविला आहे.

1 thought on “PANJABDAKH: धरणे कधी भरणार ? पंजाबराव डख म्हणतात!”

Leave a Comment