Bajarbhav:काय आहेत या पाच उत्पादनांचे बाजार समिती मध्ये भाव, जाणून घ्या!

काय आहेत या पाच उत्पादनांचे बाजार समिती मध्ये भाव, जाणून घ्या

१) आले बाजार भाव
गेल्या काही दिवसांपासून बाजारामध्ये काही उत्पादनांच्या किंमती मध्ये वाढ झालेली दिसून येते तर काही उत्पादनांच्या किंमतींमध्ये घसरण झालेली दिसून येते. त्यामध्येच काही दिवसांपासून बाजारपेठांमध्ये आल्याचे भाव जैसे थे आहेत. सध्या बाजारात आल्याला प्रतिक्विंटल सरासरी १० ते ११ हजार भाव मिळत आहे. येणाऱ्या सणांच्या काळात आल्याची मागणी वाढून आल्याचे भाव वाढू शकतात असा अंदाज व्यापारांनी वर्तवला आहे.

२) हिरवी मिरची बाजार भाव
त्याचप्रमाणे बाजारातील हिरव्या मिरचीचे भाव गेल्या काही दिवसापासून टिकून आहेत. बाजारातील हिरव्या मिरचीची आवक येत्या पुढील काळात मर्यादित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या बाजारात हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. हिरव्या मिरचीचा आवक सरासरीपेक्षा कमी असला तरी बाजारात हिरव्या मिरचीला मागणी आहे.

३) कापूस बाजार भाव
देशामध्ये तयार होणाऱ्या कापसाच्या भावामध्ये काही प्रमाणात चढ उतार पाहायला मिळतात त्यातच आता देशातील कापसाचे वायदे ५०० रुपयांनी कमी होऊन ६० हजार ९०० रुपयांवर आले होते. चालू हंगामात कापसाचे भाव टिकून राहू शकतात असा अंदाज कापूस अभ्यासकांनी दर्शविला आहे. तसेच बाजार समितीमधील कापसाचे भाव सध्या ७ हजार ते ७ हजार ७०० इतके चालू आहेत.

४) हळद बाजार भाव
देशातील महत्वाच्या हळद उत्पादक राज्यांमधील म्हणजेच महाराष्ट्र्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू या राज्यांमधील हळद उत्पादक लागवड यंदा २० ते २५ टक्क्यांनी कमी झाली आहे. त्याचप्रमाणे अपुऱ्या पडणाऱ्या पावसाचा फटका हळद उत्पादनाला बसणार आहे. पावसाअभावी या पुढे देखील हळदीला पाण्याची कमतरता भासून हळदीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. गेल्या मागील काही महिन्यांपासून हळदीच्या निर्यातीची मागणी कमी झाल्याने हळदीचे दर कमी प्रमाणात कमी झाल्याचे दिसून येते. त्यातच हळदीचे वायदे १९ हजारांवर पोचले होते त्यातच ते आता १४ हजारांवर आले आहेत. परंतु बाजार समित्यांमधील हळदीचे भाव हे १२ हजार ते १४ हजारांच्या दरम्यान आहेत. पहिल्या तिमाहीत हळदीची निर्यात तब्बल १६ टक्क्यांनी वाढली होती सध्या निर्यात कमी झाली असली तरी येणाऱ्या सणांसाठी देशांतर्गत हळदीची निर्यात वाढली आहे.

५) सोयाबीन बाजार भाव
आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असलेल्या सोयाबीन आणि सोयपेंडच्या भावात नरमाई आली होती. परंतु बाजार समित्यांमध्ये सोयाबीन उत्पादनाला सरासरी ४ हजार ४०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला होता. देशामध्ये असणाऱ्या सोयाबीन प्रक्रिया उद्योगांनी ५ हजार १५० रुपयांचे भाव काढले होते. या सगळ्याचा अभ्यास करता सोयाबीनच्या दारात पुढील काही दिवस चढ उतार असू शकतात असा अंदाज सोयाबीन विक्रेत्यांनी दर्शविला आहे.

Leave a Comment