SIP म्हणजे काय, लाखाचे १० वर्षात, एक कोटी होतात का!

SIP म्हणजे काय, लाखाचे १० वर्षात, एक कोटी होतात का

SIP Investment: आजकाल प्रत्येक जण आपापल्या भविष्यासाठी काहीतरी तरतुदी करत असतो त्यातच आता अनेक योजना सरकारने तसेच खासगी बॅंकांनी, वित्तीय संस्थांनी चालू केल्या आहेत. आपण बॅंका आणि पोस्ट ऑफिस मध्ये जशी आरडी बनवतो त्याचप्रमाणे म्युच्युअल फंड मध्ये पण अनेक जण इन्व्हेस्ट करतात. बर्‍याच लोकांना म्युच्युअल फंड Mutual fund ह्याबद्दल अजूनही तेवढी माहिती नाहीये.

Mutual fund म्युच्युअल फंड म्हणजे काय?

गुंतवणूकीचाच एक पर्याय म्हणजे म्युच्युअल फंड ह्या मधून गुंतवणूकदार संपत्ती निर्माण करणे, नियमित उत्पन्न मिळवणे, बचत करणे इ. उदिष्टे साध्य करू शकतो.

म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा एक मार्ग म्हणजे पद्धतशीर गुंतवणूक योजना (Systematic Investment Plan एसआयपी)

SIP meaning एसआयपी (SIP) म्हणजे काय? SIP Mhanje Kay

तुम्हाला तुमच्या आवडीच्या म्युच्युअल फंडामध्ये दर महिन्याला निश्चित रक्कम गुंतवणुकीची संधी एसआयपी म्हणजेच पद्धतशीर गुंतवणूक योजना देते.

SIP Benefits आता तुम्ही म्हणाल एसआयपी च का? तर जाणून घेऊ एसआयपी चे फायदे.

 शिस्तबद्ध आणि पद्धतशीर गुंतवणूक योजना

SIP एसआयपी मध्ये गुंतवणूक केल्यानंतर आपण घेतलेल्या योजनेनुसार आपल्या खात्यातून थोडी रक्कम नियमितपणे गुंतवली जाते. ही पद्धत तुम्हाला बचतीची सवय लावते. त्याचप्रमाणे तुम्ही ५०० रुपयांपासून एसआयपी SIP मध्ये इन्व्हेस्ट करू शकता.

SIP जोखीम कमी करते

एसआयपी SIP मध्ये गुंतवणूक केल्याने शेअर बाजाराच्या नुकसानापासून आपण स्वतःला वाचवू शकतो. तसेच एसआयपी तुम्हाला एकाच वेळी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक न केल्यामुळे थोडी रक्कम गुंतवून शेअर बाजाराच्या तोट्यांपासून वाचवते.

SIP गुंतवणुकीसाठी सोपे

एसआयपी SIP मध्ये गुंतवणूक करणे फार सोपे आहे. एकदा तुम्ही तुमचा प्लॅन निवडला की म्युच्युअल फंड तुमच्या खात्यातून ठराविक रक्कम नियमितपणे काढून घेतो व तुम्ही निवडलेल्या प्लॅन मधे ठराविक तारखेला जमा करतो.

SIP वरील गुंतवणुकीत करात सूट मिळते

जेव्हा तुम्ही एसआयपी SIP मध्ये गुंतवणूक करता तेव्हा गुंतवणूक करताना किंवा रक्कम काढताना कोणत्याही प्रकारचा कर मिळत नाही. परंतु करामध्ये सुट देणार्‍या योजनांचा लॉक इन कालावधी असतो जसे की ३ वर्षे त्यांच्यामधे गुंतवणूक करून तुम्ही कर सुट मिळवू शकता.

SIP मध्ये कधीही पैसे काढण्याची सुविधा

एसआयपी योजनेमध्ये लॉक इन कालावधी असतो. लॉक इन कालावधी म्हणजे त्या कालावधी मधे आपण पैसे काढू शकत नाही परंतु बर्‍याच एसआयपी योजनांमध्ये लॉक इन कालावधी नसतो त्यामुळे तुम्ही केव्हाही पैसे काढू शकता.

SIP मध्ये चक्रवाढीचा लाभ मिळतो  

चक्रवाढ म्हणजे व्याजावर व्याज मिळवणे हा देखील आहे. जेव्हा आपण एसआयपी मध्ये गुंतवणूक करतो त्यानंतर आपल्याला गुंतवणुकीच्या रकमेवर जो काही परतावा मिळतो तो पुन्हा त्याच ठिकाणाहून गुंतवला जातो त्यामुळे गुंतवणूक केलेल्या ग्राहकाचा नफा वाढतो व त्याचप्रमाणे नफ्यात ही वाढ होते.

sip calculator अपेक्षित परतावा कसा मोजतात 

sip साठी विविध कंपन्यांनी त्यांचे sip calculator बनवले आहेत खालील https://groww.in/calculators/sip-calculator लिंकवर क्लिक करून तुम्ही हि किती गुंतवणूक केल्यास किती परतावा मिळतो ते पाहू शकता 

SIP FAQ

मी माझी SIP काढली तर ?

तुम्ही काढू शकता SIP Mutual Fund Broker कडून तुम्ही काढू शकता किंवा ET Money सारख्या App वरून तुम्ही स्वतः काढू शकता.

आम्ही SIP किती वेळा थांबवू शकतो?

हो तुम्ही SIP कितीही वेळा थांबू शकता फक्त थांबण्यासाठीची पूर्व सूचना तुम्हाला द्यावी लागते.

SIP कालबाह्य झाल्यावर काय होते?

SIP कालबाह्य होत नसते कारण ती वापरकर्त्याने रद्द करेपर्यंत सुरु राहते.

SIP साठी कोणती तारीख चांगली आहे?

कोणतेही तारीख योग्य असते फक्त काही तज्ज्ञांचे म्हणे असते कि महिन्याच्या शेवटी मार्केट अस्थित असते तर महिन्याच्या सुरवातीला मार्केट चढलेले असते त्यामुळे महिण्याच्या मध्ये म्हणजे १५ तारखेच्या आसपास SIP काढणे योग्य असे म्हणतात परंतु हे सर्व ज्याचे त्याचे धारणा आहे.

आम्ही SIP कधी थांबवायचे?

जेंव्हा तुम्हाला अपेक्षित परतावा मिळाला आहे असे वाटते तेंच तुम्ही तुमची SIP थांबवू शकता

SIP किती काळ चालवावी?

विविध अर्थ तज्ज्ञांच्या मते SIP हि ५ वर्षे व त्याहून अधिक काळ म्हणजे दीर्घ मुदतीसाठी चालवावी.

SIP थांबवण्यासाठी काही दंड आहे का?

SIP थांबवण्यासाठी दंड नाही आहे.

Leave a Comment