Gold Rate Today: गणेश चतुर्थी च्या मुहूर्तावर; सोन्याच्या भावात मोठे बदल, पहा आजचे सोन्याचे भाव!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

गणपती बाप्पासाठी सोन्या चांदीच्या वस्तू घ्यायचा विचार करताय, तर जाणून घ्या काय आहेत आजचे सोन्या चांदीचे भाव.
भारतीय सराफ बाजारात यंदा सोन्याच्या भावामध्ये फार मोठी वाढ झालेली दिसली. वर्षाच्या सुरवातीपासूनच सोन्याचे दर हे आभाळाला टेकलेले होते. उद्या पासून सुरु होणाऱ्या गणेश चतुर्थीसाठी लोक हे आपल्या घरातल्या गणपतीसाठी किंवा भाविक हे मोठं मोठ्या मानाच्या गणपतीसाठी छोट्या मोठ्या सोन्या चांदीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी सराफ बाजारात दिसून येतायत.

मुंबईचा प्रसिद्ध गणपती असलेला लालबागचा राजा. गेल्या वर्षी कोव्हीडचे निर्बंध हटवल्याने लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती त्याचप्रमाणे लाखो भाविकांनी सोन्या चांदीच्या वस्तू राजाला अर्पण केल्या. दानपेटीमध्ये १० दिवसात पाच कोटींचे दान जमा झाले होते. त्याचप्रमाणे ६० किलो चांदी आणि ५ किलो सोन्याच्या वस्तू लालबागच्या राजाला भाविकांनी अर्पण केल्या.

तसेच महाराष्ट्रामध्ये असलेल्या अष्टविनायक गणपतींचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक गर्दी करतात. त्याचप्रमाणे पुण्यातील प्रसिद्ध गणपती दगडूशेठ हलवाई तसेच मानाचे गणपती बघण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात तसेच सोन्या चांदीच्या वस्तू देखील अर्पण करतात.

तुम्हीही सणासाठी सोन चांदी घ्यायचा विचार करत असाल तर त्या आधी जाणून घ्या आजचे सोन्या चांदीचे भाव.

Gold Rate Todayआजचे सोन्याचे भाव

२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचे आजचे भाव हे ६००० रुपये इतके आहे तर २४ कॅरेट १० ग्राम सोन्याची किंमत हि ६०,०५० रुपये इतकी आहे. जिएसटी किंमत वगळता.

आजचे चांदीचे भाव

१ ग्राम चांदीचा भाव हा ७४. ५० रुपये तर १० ग्राम चांदीचा भाव हा ७४७ रुपये इतका आहे. तसेच १०० ग्राम चांदीचा भाव हा ७४५० इतका आहे.

हे ही वाचा : पीक विमा संदर्भात अतिशय महत्वाची माहिती

Leave a Comment