Bank news: बँकाचे हे नियम बदलले आत्ताच घ्या बघून; नाहीतर होईल नुकसान !

SBI, HDFC बँक, ICICI बँक आणि Axis बँक या देशातील मोठ्या बँकांनी अलीकडेच क्रेडिट कार्डचे नियम बदलले आहेत. या नियमांमधील बदलाचा थेट परिणाम या बँकांच्या वापरकर्त्यांवर होणार आहे. तुम्हीही या बँकांचे क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला हे नियम माहित असले पाहिजेत.

ICICI Bank आयसीआयसीआय बँकेने लाउंज ऍक्सेस बेनिफिट केले कमी

आयसीआयसीआय बँकेने त्यांच्या 21 मुख्य क्रेडिट कार्डांवर एअरपोर्ट लाउंज प्रवेश आणि रिवॉर्ड पॉइंट्सचे नियम बदलले आहेत. यासोबतच रिवोर्ड्स नियमातही सुधारणा करण्यात आली आहे. बँकेने म्हटले आहे की 1 एप्रिल 2024 पासून, एका कॅलेंडर तिमाहीत 35,000 रुपये खर्च केल्यानंतरच लाउंज प्रवेश सुविधा उपलब्ध होईल.

Axis Bank ऍक्सिस बँकेने क्रेडिट कार्डच्या नियमांत केले मोठे बदल 

ऍक्सिस बँकेने आपल्या क्रेडिट कार्डधारकांसाठी काही महत्त्वाचे बदल केले आहेत. बँकेने ऍक्सिस बँक मॅग्नस क्रेडिट कार्डचे फायदे, वार्षिक शुल्क आणि सामील होण्याचे शुल्क सुधारित केले आहे. याव्यतिरिक्त, बँकेने ऍक्सिस बँक रिझर्व्ह क्रेडिट कार्डच्या अटी आणि शर्तींमध्ये देखील सुधारणा केली आहे.

HDFC Bank एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डमध्ये नवीन नियम

एचडीएफसी बँकेने Regalia आणि Millenia क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. आता एचडीएफसी बँक रेगेलिया क्रेडिट कार्डवर किमान 1 लाख रुपये खर्च केल्यानंतरच लाउंज प्रवेश सुविधा उपलब्ध होईल. एका तिमाहीत, तुम्हाला फक्त 2 वेळा लॉन्च ऍक्सेसचा लाभ घेता येणार आहे.

तसेच,एचडीएफसी बँक मिलेनिया क्रेडिट कार्डसाठी, 1 लाख रुपये तिमाही खर्च केल्यानंतरच क्रेडिट कार्ड सुविधेचा लाभ घेता येईल. या कार्डद्वारे, तुम्ही एका तिमाहीत एकदाच लॉन्चचा आनंद घेऊ शकता.

SBI Bank एसबीआई क्रेडिट कार्डमध्ये नवीन नियम

एसबीआई कार्डने Paytm SBI क्रेडिट कार्डचे नियम बदलले आहेत. १ जानेवारीपासून या क्रेडिट कार्डचा वापर करून भाडे भरल्यास कॅशबॅक मिळणार नाही. यापूर्वी, 1 नोव्हेंबर रोजी SBI कार्डद्वारे EasyDiner वर ऑनलाइन खरेदीसाठी रिवॉर्ड पॉइंट 10X वरून 5X पर्यंत कमी करण्यात आले होते.

Leave a Comment