ATM Card:एटीएम वर मिळतोय मोफत ५ लाखाचा विमा; तुम्ही पण घेऊ शकतो लाभ!कस ते पहा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Atm card वापरताय पण त्याचे फायदेच नाही माहिती तर जाणून घ्या.

एटीएम कार्ड..आपण बघतो आजकाल सर्रास लोक atm कार्डचा वापर करतात. बाहेर गेल्यानंतर कॅश कोणाकडे बघायला मिळणे म्हणजे जणू काही आश्चर्यच. आपण प्रत्येक जण खरेदी करण्यासाठी तसेच रोजच्या व्यवहारात लागणार्‍या वस्तुंच्या खरेदीसाठी एटीएम कार्डचा वापर करतो. atm कार्ड मुळे कॅशचा वापर दिवसेंदिवस कमी होत चाललाय.

हातावर मोजता येतील इतकेच लोक अशे असतील जे एटीएम कार्ड वापरत नसतील. Atm कार्डचे अनेक फायदे आणि फ्री ऑफर देखील आहेत परंतु या गोष्टीबद्दल अनेकांना माहितीच नसते त्याचे कारण म्हणजे काहीवेळा बॅंकाच आपल्या ग्राहकांना ह्या बद्दल माहिती देत नाहीत तर ह्या बद्दल आपण जाणून घेऊया एटीएम कार्डचे फायदे आणि फ्री ऑफर काय आहेत आणि कशाप्रकारे याचा वापर होतो.

जर ATM कार्ड वापरणाऱ्या ग्राहकाचा अपघातात बळी गेला आणि एका हाताने किंवा एका पायाने अपंग झाला तर त्याला ५० हजार रुपयांचे विमा संरक्षण मिळते. त्याचप्रमाणे दोन्ही हात किंवा दोन्ही पाय गमावल्यास १ लाख रुपयांचा विमा त्यांना मिळू शकतो.

विमा प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे कोणती?

ATM CARD सोबत उपलब्ध असलेल्या विम्याचा दावा करण्यासाठी कार्डधारकाच्या नॉमिनीला (insurance nominee) ज्या बँकेचे एटीएम कार्ड आहे त्या बँकेकडे अर्ज करावा लागतो. बँकेत एफआयआरची प्रत, हॉस्पिटलमधील उपचाराचे प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे सादर केल्यावर विमा दावा प्राप्त होतो तसेच मृत्यू झाल्यास एटीएम कार्डधारकाच्या नॉमिनीने मृत्यूचा दाखला, एफआयआरची प्रत, आश्रितांचे प्रमाणपत्र, मृत व्यक्तीच्या प्रमाणपत्राची मूळ प्रत इत्यादी सादर करावे लागतात.

कोणत्या ATM CARD वर किती रुपयांपर्यंत विमा मिळतो?

तुमचे जर का एखाद्या राष्ट्रीयकृत किंवा खाजगी बँकेत खाते असेल आणि त्या बँकेचे ATM CARD तुम्ही कमीत कमी 45 दिवस वापरले असेल तर एटीएम कार्डसोबत मिळणाऱ्या विम्यावर तुम्ही दावा करू शकता. बँक आपल्या ग्राहकांना अनेक प्रकारची एटीएम इश्यू करते तसेच एटीएम कार्डच्या कॅटेगरीनुसार त्यासोबत मिळणाऱ्या विम्याची रक्कम ठरलेली असते.

तुम्ही क्लासिक कार्ड (Classic Card) वापरत असाल तर त्यावर 1 लाख रुपये , प्लॅटेनम कार्ड (Platinum Card) वर 2 लाख रुपये, सामान्य मास्टर कार्ड ( Master Card) वर 50 हजार तर प्लॅटेनम मास्टर कार्ड (Platinum Master Card) वर 5 लाख आणि वीजा कार्डवर (Visa Card) 1.5 ते 2 लाख रुपयांचे इंशुरन्स कव्हरेज (Insurance Coverage) मिळते त्याचप्रमाणे प्रधानमंत्री जन-धन योजनेच्या अंतर्गत ग्राहकांना मिळालेल्या रुपे कार्डवर (RuPay Card Insurance) 1 ते 2 लाखांचे विमा कवच मिळते.

2 thoughts on “ATM Card:एटीएम वर मिळतोय मोफत ५ लाखाचा विमा; तुम्ही पण घेऊ शकतो लाभ!कस ते पहा.”

Leave a Comment