weather forecast today: पंजाब डख Panjab Dakh हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध हवामान अभ्यासक आहेत. व ते नेहमी शेतकरी साठी हवामानच व पावसाचा अंदाज देत असतात.
हवामान अभ्यासक पंजाब राव डख Panjab Dakh यांनी मागच्या महिन्यात हवामान अंदाज दिला होता व त्यात असे सांगितले होते कि २० एप्रिल ते ३० एप्रिल दरम्यान अवकाळी पावसाचा अंदाज दिला होता, त्याप्रमाणे हा अंदाज तंतोतंत खरा ठरत राज्यात विविध ठिकाणी या तारखा दरम्यान अवकाळी पाऊस पडला होता. तसेच
सध्या पंजाबराव डख Panjab Dakh यांनी नवीन अंदाज दिला आहे आणि त्यात ताडीचा संदेश दिला आहे, पाहुयात पंजाब राव डंख यांनी काय नवीन हवामान अंदाज दिला आहे.
पंजाब डख Panjab Dakh यांनी राज्यातील सर्व शेतकरी बांधवाना सतर्क राहण्याचा ईशारा दिला आहे कारण राज्यात विविध भागात दिनांक ७ मे ते ११ मे दरम्यान अतिशय जोरात वाऱ्यासह तसेच गारांसह पावसाचा अंदाज दिला आहे. त्यांनी विभागवार काय सतर्कता बाळगायची ते खालील प्रमाणे सांगतले आहे.
महाराष्ट्रात ६ मे पर्यंत हवामान कोरड राहील व ऊन वाढेल
महाराष्ट्रात ६ मे पर्यंत कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. राज्यात 6 मेपर्यंत तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. यानंतर 7 मे ते 11 मे दरम्यान राज्यात पावसाची शक्यता आहे.
या काळात राज्यात काही ठिकाणी वादळी वारे, गडगडाट, विजांचा कडकडाट आणि गारासह मोठा पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव डख Panjab Dakh यांनी वर्तवली आहे.
दिनांक ७ मे ते ११ मे दरम्यान जोरदार अवकाळी पावसाची शक्यता
7 मे ते 11 मे दरम्यान मुसळधार अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 7 ते 11 मे या कालावधीत पूर्व विदर्भात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकरी बांधवानी हळद आणि कांदा काढून 7 मे पूर्वी झाकून ठेवा, कारण त्यानंतर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
7 मे पासून पुढील पाच दिवस मराठवाड्यात मुसळधार अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी कांदा, कापूस, हळद या पिकांची ६ मेपर्यंत काढणी करून योग्य प्रकारे झाकून ठेवावी, जेणेकरून नुकसान टळेल असा इशारा पंजाबराव डख Panjab Dakh यांनी दिला.
हा पाऊस कसा असेल – वादळी वारा, गारा, व विजांचा कडकडाटासह हा पाऊस असेल
वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. या पाच दिवस पश्चिम महाराष्ट्रातही वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, हा पाऊस ऊस पिकासाठी फायदेशीर ठरणार आहे. यासोबतच 7 मेपासून कोकणात पावसाची शक्यता आहे. पंजाबराव डख Panjab Dakh यांनी 7 ते 11 मे दरम्यान उन्हाळ्यात आतापर्यंत झालेल्या पावसापेक्षा जास्त अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज च्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
ऍग्रो न्यूज टिम मध्ये डिजिटल कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. Agriculture, Automobile, Business, Finance, Technology इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान.
पुण्यातील नामांकित संस्थेतून पत्रकारिमध्ये पदवीधर.