Top cars in india: सर्वाधिक विक्री होणारी कार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

वर्षाच्या अखेरीस भारतीय कार बाजारात अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. मारुती स्विफ्ट, ब्रेझा यांसारख्या उत्तम गाड्यांना मागे टाकून यावर्षी टाटा नेक्सॉन भारतीय ग्राहकांची पहिली पसंती बनली आहे. 2023 मध्ये, Tata Nexon ने सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत आपले स्थान निर्माण केले आहे. या कारची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन बद्दल माहिती जाणून घेऊ.

Tata Nexon SUV ही गेल्या डिसेंबरमध्ये सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. ही कार मारुतीची सर्वाधिक विक्री होणारी सेडान डिझायर तसेच Tata Punch, Ertiga, Maruti Brezza, Maruti Swift, Mahindra Scorpio, Maruti Baleno, Hyundai Venue आणि Maruti Eeco सारख्या उत्कृष्ट कारना मागे टाकले आहे.

Tata Nexon गेल्या महिन्यात म्हणजे डिसेंबर 2023 मध्ये 15,284 ग्राहकांनी खरेदी केली होती. तर डिसेंबर 2022 मध्ये नेक्सॉनच्या 12,053 युनिट्सची विक्री झाली. अशा प्रकारे, या सब-4 मीटर कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या विक्रीत वर्षानुवर्षे 27 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच नेक्सॉनच्या मासिक विक्रीत थोडीशी घट झाली आहे. ही कार नोव्हेंबर 2023 मध्ये 15,311 लोकांनी खरेदी केली होती.

Tata Nexon देशातील सर्वाधिक विक्री

देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या एसयूव्हींपैकी Tata Nexon एक आहे. त्याची सध्याची एक्स-शोरूम किंमत 8.10 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 15.50 लाख रुपयांपर्यंत जाते. Nexon पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे आणि त्याचे मायलेज 24.08 kmpl पर्यंत आहे.

 यादीत Maruti Suzuki दुसऱ्या स्थानावर

गेल्या महिन्यात डिसेंबरमध्ये मारुती सुझुकीची सर्वाधिक विक्री होणारी सेडान कार डिझायर दुसऱ्या स्थानावर आली होती. या महिन्यात 14012 ग्राहकांनी मारुती सुझुकी डिझायरची निवड केली. डिसेंबर २०२२ च्या तुलनेत, डिसेंबर २०२३ मध्ये डिझायरच्या विक्रीत १७ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर डिसेंबर 2022 मध्ये, 11,997 ग्राहकांनी डिझायर खरेदी केली.

Tata Punch तिसऱ्या क्रमांकावर

Tata Punch गेल्या महिन्यापासून तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि त्याला 13,784 ग्राहकांनी पसंती दिली आहे. डिसेंबर 2022 च्या तुलनेत टाटा पंचच्या विक्रीत 30 टक्के वाढ झाली आहे. मात्र, या महिन्यात विक्रीत काहीशी घट झाली आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये, 14,383 लोकांनी पंच खरेदी केली होती.

Leave a Comment