Panjab Dakh: मान्सूनचा पाऊस कधी येणार ? महत्त्वाचा हवामान अंदाज; पंजाब डख हवामान अभ्यासक !

नमस्कार मी पंजाब डख हवामान अभ्यासक, मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी .

आज आहे 21 जून 2023 शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय झालं चक्रीवादळ मान्सून लांबला होता पण सर्व शेतकऱ्याला आनंदाची बातमी देतो की राज्यात पाऊस दाखल होत आहे.

पाऊस पूर्व पदावर यायला आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांना हा अंदाज लक्षात घ्यायचा शनिवारपासून राज्यात पावसाला सुरुवात आहे.

सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो चक्रीवादळ झाल्यामुळे काय झालं मान्सून आला होता 8 जूनला चक्रीवादळामुळे बाष्प खेचून घेवून गेल्यामुळे तो  तिकडे गेल्यामुळे पाउस आला नाही.

जोपर्यंत चक्रीवादळ स्थिर होऊ शकत नाही तोपर्यंत  पाऊस येऊ शकत नाही हा चक्रीवादळाचा नियम असतो.

उद्या म्हणजे 22 जूनला ते चक्रीवादळ स्थिर होणार आहे 23 तारखेपासून राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार होणार आहे, म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा

शुक्रवारपासून पूर्वे विदर्भात म्हणजे नागपूरला पावसाची सुरुवात होईल

त्याच्यानंतर तो पाऊस मराठवाडा यवतमाळ जिल्हा तसेच अकोला भागात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडलेला दिसेल.

सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की शनिवारपासून संपूर्ण राज्यात पाऊस पडणार आहे.

राज्यात हा पाऊस 23 जून पासून 2 जुलै पर्यंत संपुर्ण राज्यात विविध  भागात पडणार आहे.

आता सर्व शेतकऱ्यांची पेरणी होणार आहे म्हणून हे आनंदाची बातमी.

26 तारखे पासून पूर्व  विदर्भ, नागपूर, मराठवाडा, यवतमाळ, अकोला अशा बऱ्याच ठिकाणी पाऊस पडलेला दिसेल.

शेतकऱ्यांनो घाबरू नका पाऊस पडणार आहे तुमची पेरणी होणार आहे यावर्षी  खूप पाऊस पडणार आहे, व्यवस्थित चांगला पाऊस पडणार आहे,दुष्काळ पडणार नाही.

मुंबई मुसळधार पाऊस पडणार आहे.

नाशिक विभागात देखील मुसळधार पाऊस पडणार आहे.

राज्यात 8 दिवसात सगळीकडे पाऊस पडणार आहे आणि सगळ्यांच्या पेरणी होणार  आहे .

  • परत सर्व वातावरणात बदल झाला तर लगेच सर्व शेतकऱ्यांना तातडीचा मेसेज दिला जाईल व सर्व शेतकऱ्यांना तातडीचा अंदाज कळवला जाईल.

शेवटी अंदाज आहे. वाऱ्यामध्ये  बदल झाला की वेळ ,ठिकाण, दिशा ,बदलते हे लकश्यात असावे .

👇 हवामान अंदाज व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन 👇
हे वाचा: आपल्या मोबाईल मध्ये शेती विषय लागणारे सर्व कागदपत्रे

Leave a Comment