Krushi Yojana 2024:कृषी योजना 2024;राज्यातील शेतकरी वर्गाला आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी !

Krushi Yojana 2024:राज्यातील बहुतांश लोकांचे जीवन शेतीशी निगडित असून शेती व शेतीपूरक व्यवसाय हे रोजगार व उपजीविकेचे महत्त्वाचे साधन आहे. राज्यातील शेतकरी स्वावलंबी व्हावा, यासाठी शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून शेतीचे उत्पादन वाढवून शेतकन्यांचा आर्थिक विकास साध्य करण्यासाठी विविध कृषी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येत असलेल्या काही महत्त्वाच्या योजनांची थोडक्यात माहिती

            राज्यातील शेतकरी वर्गाला आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी राज्य शासन शेतकरी हाच विकासाचा केंद्रबिंदू मानून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या योजना राबवत आहे.

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे

शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे शेततळे खोदकामासाठी येणारा खर्च करणे शक्य होत नाही. यामुळे शासनाने २९ जून. २०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेचा विस्तार करून या योजनेत वैयक्तिक शेततळे या बाबीचा समावेश केलेला आहे.

पात्रता निकष

अर्जदार शेतकऱ्यांकडे स्वतःच्या नावावर किमान ०.६० हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक, तर कोकण विभागासाठी क्षेत्राची अट ०.२० हेक्टर इतकी आहे. क्षेत्र धारणेस कमाल मर्यादा नाही. अर्जदार शेतकऱ्याची जमीन शेततळे खोदण्यास तांत्रिकदृष्ट्या योग्य असणे आवश्यक राहील. अर्जदार शेतकऱ्यांनी यापूर्वी मागेल त्याला शेततळे, सामूहिक शेततळे अथवा भात खाचरातील बोडी किंवा इतर कुठल्याही शासकीय योजनेतून शेततळे या घटकाकरिता शासनाच्या अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.

अर्ज करण्याची कार्यपद्धती

महाडीबीटी पोर्टलचे  https://mahadbt.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज सादर करावा.

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग 2024

सध्या कार्यरत असलेल्या आणि नवीन उद्योगांना लाभादायी असणारी अशी ही योजना आहे. बँक कर्जाशी निगडित अर्थसाहाय्य संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन,पारंपरिक आणि स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देणारी ही योजना आहे. एकाच लाभार्थीस योजनेंतर्गत एकापेक्षा जास्त घटकांचा लाभ अनुज्ञेय

सामाईक पायाभूत सुविधा / मूल्य साखळी

गट लाभार्थी यांना पात्र प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के अनुदान (३ कोटी रुपयांपर्यंत) वैयक्तिक लाभार्थी भांडवली गुंतवणुकीकरिता पात्र प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के अनुदान (१० लाख रुपयांपर्यंत). तामाण्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाते. स्वयंसाहाय्यता गटातील सदस्यांना बीजभांडवल रुपये ४० हजार

अधिक माहितीसाठी

नजिकचे कृषी विभागाचे कार्यालय / जिल्हा संसाधन व्यक्ती अथवा, www.pmfme.mofpi.gov.in  अथवा https://krishi.maharashtra.gov.in/  या संकेतस्थळाला भेट द्यावी.

ठिबक व तुषार सिंचन संचासाठी देय अनुदान 2024

या योजनेंतर्गत सर्व पिकांसाठी अनुदान उपलब्ध. शेतकऱ्यांच्या आधार लिंक बैंक खात्यात अनुदान थेट जमा होते. लाभाची मर्यादा ५ हेक्टरपर्यंत अल्प व अत्यल्प भूधारक आणि बहू भूधारक अशा वर्गवारीत राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रति थेंब अधिक पीक’, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना / डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अंतर्गत हे अनुदान दिले जाते.

अधिक माहितीसाठी नजीकचे कृषी विभागाचे कार्यालय.

कृषी यांत्रिकीकरण योजना 2024

सर्व खातेदार शेतकरी, शेतकरी गट, अन्न प्रक्रिया उत्पादक संस्था, सहकारी संस्था हे या योजनेसाठी अर्ज करू शकतात. यासाठी सातबारा आणि आठ-अ. आधारकार्ड छायांकित प्रत, आधार संलग्न बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत आवश्यक आहे.

या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना ट्रॅक्टर पॉवर टिलर, स्वयंचलित यंत्र व अवजारे, ट्रॅक्टर व पॉवर टिलरचलित यंत्र व अवजारे, पीक संरक्षण साधने, मनुष्य व बैलचलित अवजारे, प्रक्रिया युनिटस, भाडे तत्वावर कृषी यंत्र व अवजारे सेवा पुरवठा केंद्रांची उभारणी आदीबाबी समाविष्ट आहेत.

या योजनेसाठीची अनुदान मर्यादा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्प अत्यल्प भूधारक शेतकरी व महिला यांच्यासाठी अनुदान मर्यादा ट्रॅक्टरसाठी १.२५ लाख, पॉवर टिलरसाठी ७५ हजार आणि इतर अवजारे यांच्यासाठी ५० टक्के किंवा मंजूर कमाल अनुदान यापैकी कमी असेल ते.

इतर लाभार्थी यांच्यासाठी ट्रॅक्टर ९ लाख, पॉवर टिलर ६० हजार आणि इतर अवजारे यांच्यासाठी ४० टक्के किंवा मंजूर कमाल अनुदान मर्यादा यापैकी कमी असेल ते.

अधिक माहितीसाठी: नजीकचे कृषी विभागाचे कार्यालय

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना 2024 फळबाग लागवड

या योजनेंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, दारिद्रयरेषेखालील इतर कुटुंबे, स्त्री कुटुंबप्रमुख असलेली कुटुंबे, दिव्यांग व्यक्ती कुटुंबप्रमुख असलेली कुटुंब, जमीन सुधारणाचे लाभार्थी, प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण योजनेखालील लाभार्थी आणि वनहक्क कायद्यानुसार पात्र लाभार्थी यांना प्राधान्यक्रमानुसार वैयक्तिक लाभार्थ्यांच्या शेतावर शेताच्या बांधावर आणि पडीक जमिनीवर फळझाड आणि फूलपीक लागवड करणे.

यासाठी कमीत कमी ०.०५ हेक्टर ते जास्तीत जास्त २ हेक्टर प्रतिलाभार्थी क्षेत्र मर्यादा आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी

जॉब कार्ड, जमिनीचा ७/१२ आणि ८-अ उतारा, आधार कार्ड, आधार कार्ड संलग्न बँक खात्याचा तपशील आवश्यक आहे..

अधिक माहितीसाठी: ग्रामपंचायत कार्यालय, कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, तालुका कृषी अधिकारी.

पीक स्पर्धा 2024

शेतकऱ्यांसाठी खरीप आणि रब्बी अशा दोन हंगामात ही पीकस्पर्धा घेतली जाते. खरीप हंगामासाठी मूग व उडीद पिकांसाठी ३१ जुलै, तर इतर पिकांसाठी ३१ ऑगस्ट हा अर्ज दाखल करण्याचा दिनांक आहे, तर रब्बी हंगामासाठी ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येतात.

खरीप हंगामासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल या पिकांचा यात समावेश आहे, तर रब्बी हंगामासाठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई आणि जवस या पिकांचा समावेश आहे.

सर्वसाधारण आणि आदिवासी गटात तालुका. जिल्हा आणि राज्य पातळीवरील अशी बक्षिसे दिली जातात. तालुका पातळीवर ५ हजार, ३ हजार आणि २ हजार याप्रमाणे अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय बक्षिसे दिली जातात. जिल्हा पातळीवर अनुक्रमे १० हजार, ७ हजार आणि ५ हजार, तर राज्य पातळीवर अनुक्रमे ५० हजार ४० हजार आणि ३० हजार अशी बक्षिसे दिली जातात.

अधिक माहितीसाठी: नजीकचे कृषी कार्यालय.

हे ही वाचा :कृषी पुरस्कार 2023:कृषी पुरस्कारासाठी करा  अर्ज ; पुरस्कारच्या रकमेत वाढ !

Continue Reading More Recent News

ladki bahin yojana

लाडकी बहीण योजनेत दिवाळीला मोठं गिफ्ट! थेट खात्यात जमा होतील 5500 रुपये, फक्त…

मुंबई, 15 ऑक्टोबर 2024, (विशेष प्रतिनिधी) लाडकी बहीण योजनेचा परिचय महाराष्ट्र सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरु केलेली ‘लाडकी बहीण योजना’ आता …

Read more

ladki bahin yojana

लाडकी बहीण योजनेत धमाका! फ्री मोबाईल मिळणार?

14 ऑक्टोबर 2024 | मराठी न्यूज डेस्क चार हफ्त्यांचे पैसे जमा, पुढील हफ्त्यांची प्रतीक्षा राज्यात सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेच्या …

Read more

indian automobile

Indian automobile:भारतामधील ह्या गाड्या होणार बंद!

indian automobile2024 :भारतामधील ह्या गाड्या होणार बंद! आजकाल प्रत्येकाकडेच  बाईक कार असतात. भारतीय बाजारात विविध कंपन्यांच्या गाड्या बाजारात विकल्या जातात …

Read more

LPG Gas Subsidy

अशी सुरु करा गॅस सबसिडी; पर सिलेंडर खात्यावर 300 रुपये जमा होतील ! LPG Gas Subsidy 

By Finance News DeskDate: September 6, 2024 LPG Gas Subsidy: जर तुमच्याकडे एलपीजी गॅस कनेक्शन असेल आणि तुम्ही प्रधानमंत्री उज्ज्वला …

Read more

1 thought on “Krushi Yojana 2024:कृषी योजना 2024;राज्यातील शेतकरी वर्गाला आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी !”

Leave a Comment