राज्यात दरवर्षी शेती व संलग्न क्षेत्रात अतिउल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना अथवा संस्थेस महाराष्ट्र शासनाच्या वतीने खालील पुरस्कार दिले जातात.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार
( संख्या १)
कृषी क्षेत्रातील कृषी विस्तार, कृषी प्रक्रिया, निर्यात, कृषी उत्पादन, पीक फेरबदल, कृषी उत्पादनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी मध्ये अति उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील कोणत्याही एका शेतकऱ्यास अथवा संस्थेस महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत सन्मानित करण्यात येते.
वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार
(संख्या ०८)
कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विकास व फलोत्पादन, ग्रामीण विकास, ज्यामध्ये बायोगॅसचा वापर शेतकन्यांचा विकास इत्यादी संतनक्षेत्रात अद्वितीय कार्य करणाऱ्यांना राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत दरवर्षी एकूण (०८) शेतकरी अथवा संस्थाना कृषिभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
रुपये ५० हजार रोख रक्कम, स्मृतिचिन्ह सन्मानपत्र व सपत्निक सत्कार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
जिजामाता कृषिभूषण पुरस्कार
(संख्या ०८)
राज्यातील शेतीक्षेत्राची सातत्याने होत असलेली प्रगती व या प्रगतीत, उत्पादन वाढीमध्ये महिलांचाही फार मोठा वाटा आहे व तो सातत्याने वाढत असून. आज आपण पाहतो की सामाजिक,कृषी, शैक्षणिक, आर्थिक व पोलटिकल क्षेत्रात महिला सतत पुढे दिसून येत आहेत. शेतीविकासाच्या दृष्टीने ही अतिशय महत्वाची बाब तसेच शेतीक्षेत्रातील महिलांचा वाढता सहभाग लक्षात घेऊन त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव व्हावा व अशा महिलांच्या कार्यान प्रभावित होऊन इतर महिलांमध्ये जागृती निर्माण होण्याच्या दृष्टी समोर ठेवून महाराष्ट्र सरकार महराष्ट्र कृषी विभाग यांचेकडुन पुरस्कार देणीत येत आहे .
५० हजार रुपये रोख रक्कम, स्मृतिचिन्ह सन्मानपत्र व सपत्निक सत्कार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार
( संख्या ८)
सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून शेतकन्यांना सेंद्रिय निविष्ठा वापरण्यात प्रोत्साहन देऊन शेती करणाऱ्या तसेच उत्पादित सेंद्रिय मालाची विक्रीव्यवस्था करणे, या मुख्य हेतूने राज्यातील जे शेतकरी या संकल्पनेचा अवलंब करत आहेत, अशा शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात येते.
रुपये ५० हजार रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व सपत्निक सत्कार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
उद्यान पंडित पुरस्कार
(संख्या-८)
आपल्या महाराष्ट्रातिल भौगोलिक परिस्थिती, जमिनीची प्रत व हवामाना यात विविधता दिसून येते यामुळे फलोत्पादनास मोठा वाव आहे. भाजीपाला पिके, फळ पिके, फूल पिके, मसाला पिके, औषधी व सुंगधी वनस्पती पिके यांपासून शेतकऱ्यांना मोठ्याप्रमाणात लाभ होत आहे. तसेच राज्यात फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्याना प्रोत्साहन देण्यासाठी या पुरस्कारांने शेतकऱ्याना सन्मानित करण्यात येते.
रुपये २५ हजार रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व सपत्निक सत्कार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार
( संख्या ०८)
जे शेतकरी त्यांच्या कृषी ज्ञानाचा फायदा त्यांच्या परिसरातील इतर शेतकऱ्यांना देतील आणि शेती उत्पादन वाढवण्यास शेतकऱ्यांना मार्गदर्शन किंवा प्रोत्साहित करतील, तसेच इतर व्यक्ती / संस्था ज्या स्वतः शेती करत नाहीत किंवा ज्यांची स्वतःची शेती नाही; परंतु पत्रकारितेद्वारे किंवा इतर अन्य मार्गाने या क्षेत्रात बहुमोल कामगिरी करतात अशा
शेतकरी बांधव ,अन्य व्यक्ति ,इतर संस्थां त्याचप्रमाणे कृषी भागाशी संभदीत घरगुती उद्योग (उदा. कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, मधुमक्षिकापालन, रेशीम उद्योग, गांडुळ शेती इत्यादीमधील) वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या व्यक्ती तसेच खेड्यांमधून परसबाग वृद्धिंगत करणाऱ्या महिला, कृषी विकास मंडळ ज्या गावात सक्रिय आहे, अशा शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात येते.
रुपये ३० हजार रोख रक्कम, स्मृतिचिन्ह सन्मानपत्र व सपत्निक सत्कार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार
( संख्या ९ )
राज्यातील शेतीविषयक उत्पन्न वाढवण्याच्या इष्टीने महत्वाचे व मोलाचे कार्य करणान्या विभागातील सर्व संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधील एका अतिउत्कृष्ट अधिकारी व कर्मचान्यास राज्य शासनाद्वारे सन्मानित करण्यात येते.
वसंतराव नाईक शेतिनिष्ठ शेतकरी पुरस्कार
(संख्या ४०)
शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान, शेतीमध्ये सुधारित शेती अवजारांचा वापर जमिनीच्या प्रतवारी प्रमाणे पिकांची लागवड, जमिनीचे सपाटीकरण, कंदुर पद्धतीने पेरणी, रासायनिक खतांचा सुयोग्य वापर, विहीर / नाला इत्यादीमधील पाणी अडवून शेतीतील नालायडिंग इत्यादीद्वारे तसेच तुषार व ठिबक सिंचन पद्धतीद्वारे पाण्याचा सुयोग्य वापर, पीक संरक्षक औषधांची वेळेवर फवारणी, शेतीपूरक व्यवसाय हलक्या व कोरडवाहू जमिनीत फळझाड, इत्यादीची लागवड करणे, स्वत: च्या कल्पनेने नवनवीन पद्धतीने पीक लागवड, शेतकऱ्यांना शेती मशागतीचा उपयोग करण्यास मार्गदर्शन करणे, राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून आदिवासी गटासह एकूण ४० शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात येते.
रुपये ११ हजार रोख, पारितोषिक, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व सपत्निक सत्कार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
युवा शेतकरी पुरस्कार
(संख्या ०८)
हा पुरस्कार 18 वर्ष पूर्ण व 40 वर्ष आतील पात्र शेतकऱ्यांसाठी हा पुरस्कार देण्यात येतो.
रु. ३० हजार रोख रक्कम, पारितोषिक, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व सपत्निक सत्कार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
कृषी पुरस्काराच्या अधिक माहितीसाठी शासनाच्या खालील अधिकृत वेबसाईटवर जाऊन शासन निर्णय पाहू शकतात https://krishi.maharashtra.gov.in/
Ahe 26. Tur soyabean Kapasi farmer.
Nice and useful information for all farmers,