HERO:होरोच्या या बाईकची ग्राहकांना भुरळ कमी पेट्रोल मध्ये धावते जास्त किलोमीटर..

भारतीय मोटरसायकल कंपन्यांचा भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात दबदबा आहे. अनेक कंपन्या भारतातून मोटारसायकली जगभरात निर्यात करतात. यामुळे भारतीय उत्पादकांसाठी देशाबाहेरही मोठी बाजारपेठ निर्माण झाली आहे. जर मोटारसायकल निर्यातीबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या महिन्यात भारतीय मोटार कंपनी Hero MotoCorp ने मोटरसायकल निर्यातीत 74.52 टक्के वाढ नोंदवली. कंपनीने गेल्या महिन्यात १२,६५८ मोटारसायकलींची निर्यात केली. जानेवारी 2023 मध्ये कंपनीने केवळ 7,253 युनिट्सची निर्यात केली.

Hero HF Deluxe

हिरोच्या निर्यात झालेल्या मोटारसायकलींपैकी हिरो एचएफ डिलक्सला सर्वाधिक मागणी आहे. जानेवारी 2023 मध्ये त्याची मागणी विकल्या गेलेल्या 2,448 युनिट्सवरून जानेवारी 2024 मध्ये जवळजवळ 90 टक्क्यांनी वाढून 4,638 युनिट्सवर पोहोचली. सध्या Hero HF Deluxe हि कंपनीची सर्वाधिक निर्यात होणारी मोटरसायकल आहे. निर्यातीत या बाइकचा वाटा 36.64 टक्के आहे.

जानेवारी २०२४ मध्ये म्हणजेच गेल्या महिन्यात हिरो हंकची निर्यात ११६.१३ टक्क्यांनी वाढून ३ हजार ५५१ युनिट्सवर पोहोचली. त्याच वेळी, स्प्लेंडरची निर्यात 13.64 टक्क्यांनी घसरून 1,672 युनिट्सवर आली. हिरो ग्लॅमरची विक्री 140.18 टक्क्यांनी वाढून 1,614 युनिट झाली. तर XPulse 200 ची विक्री 55.72 टक्क्यांनी वाढून 735 युनिट झाली आहे. जानेवारी 2024 च्या निर्यात यादीमध्ये Maestro 260 युनिट्स, प्लेजर 96 युनिट्स, पॅशन 90 युनिट्स आणि करिझ्मा 2 युनिट्सचा समावेश आहे.

Maverick 440

अलीकडे, Hero MotoCorp ने त्यांची सर्वात शक्तिशाली बाईक Maverick 440 लाँच केली. ही बाईक Harley Davidson X440 वर आधारित आहे. या बाईकच्या इंजिनमध्ये थोडेसे बदल करण्यात आले आहेत, ज्यामुळे त्याची शक्ती आणि वैशिष्ट्ये वाढवण्यात आली आहेत. त्याचे इंजिन 440cc क्षमतेचे आहे. हे सिंगल-सिलेंडर इंजिन 27hp चा आउटपुट देते. त्याचा टॉर्क 36Nm आहे. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 1.99 लाख रुपये इतकी आहे. Hero MotoCorp ने 15 एप्रिल 2024 पासून या बाइकची डिलिव्हरी सुरू करण्याची घोषणा केली आहे.

कमी पैशात स्मार्टफोन घ्यायचा विचार करताय? तर विकत घ्या ह्या कंपनीचे स्मार्टफोन

Leave a Comment