Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana 2024: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना 2024 संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana 2024 महाराष्ट्रात 9 डिसेंबर 2019 पासून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना चालू होती परंतु या योजनेत अनेक त्रुटी दिसून आल्या यात विम्याचे प्रकरणे वेळेत निकाली  निघत नव्हते तसेच अनावश्यक त्रुटी विमा मिळवण्यात अडचणी आणत होत्या या सर्व गोष्टी लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने यात आता सुधारणा केल्या आहेत जेणेकरून इथून पुढे शेतकऱ्यांना कुठल्याही अडचणींना सामना करावा लागणार नाही तर महाराष्ट्र शासनाने आता हीच योजना एका नव्या स्वरूपात आणली आहे तिचे नाव आहे “गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना2024” असे आहे.

योजनेचे नावगोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना
 राज्यमहाराष्ट्र
विभागकृषी विभाग
योजनेची सुरुवात 9 डिसेंबर 2019
योजनेत सुधारणा19 एप्रिल 2023
कोणी सुरू केली  महाराष्ट्र शासन 
लाभार्थीशेतकरी 
उद्दिष्टशेतकऱ्यांना विमा प्रदान करणे
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन
Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana

आता या योजनेअंतर्गत शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास आता शेतकऱ्याला 2 लाखापर्यंत मदत मिळणार आहे.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजनेचे निकष पात्रता

ज्यांच्या नावावर शेत जमीन आहे असे सर्व शेतकरी योजना साठी पात्र आहेत.

यांच्या नावावर शेत जमीन नाही नाही परंतु ती व्यक्ती शेतकरी कुटुंबातील आहे म्हणजे त्या कुटुंबद्दल कोणीतरी एका सदस्याच्या नावावर शेती नाही तर अशा कुटुंबातील इतर सदस्य पैकी एक सदस्य या योजनेसाठी पात्र आहेत.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार व्यक्ती यांचे वय 10 ते 75 असावे.

या योजनेसाठी पुढील 12 प्रकारचे अपघात ग्राह्य धरले जातील

  • रस्ता किंवा रेल्वे अपघात.
  • पाण्यात बुडून झालेला मृत्यू.
  • शेतातील जंतुनाशके वापरताना किंवा अन्य कारणामुळे विषबाधा झाली असेल .
  • विजेचा धक्का लागून मृत्यू झाला असेल किंवा अपघातात.
  • वीज पडून झालेला मृत्यू किंवा अपघात.
  • त्या व्यक्तीचा खून झाला असेल तर ती व्यक्ती.
  • उंचावर पडून झालेला अपघात मृत्यू.
  • साप किंवा विंचू चावल्यामुळे झालेला मृत्यू.
  • नक्षलवाद्याकडून जर हत्या झाली असेल.
  • जनावरांच्या खाल्ल्यामुळे किंवा चावल्यामुळे झालेला अपघात किंवा मृत्यू.
  • बाळंतपणात झालेला मृत्यू .
  • दंगल उसळून झालेला मृत्यू.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजनेत मिळणारी आर्थिक मदत

अपघात कारणआर्थिक मदत
अपघाती मृत्यू2 लाख
अपघातामुळे सदरील शेतकऱ्याचे दोन डोळे दोन हात हात किंवा दोन पाय निकामी झाले असल्यास2 लाख
अपघातामुळे एक डोळा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास2 लाख
अपघातामुळे एक डोळा किंवा एका किंवा एक पाय निकामी1 लाख
Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana

पुढील गोष्टीमुळे अपघात किंवा मृत्यू आल्यास या योजनेसाठी पात्र ठरणार नाही.

  • नैसर्गिक मृत्यू.
  • योजना सुरू होण्यापूर्वी जर अपंगत्व असेल तर तो पात्र ठरणार नाही.
  • आत्महत्या केलेला प्रयत्न किंवा स्वतःला इतर इतर गोष्टीने जखमी करण्याचा केलेला प्रयत्न.
  • कुठलातरी गुन्हा करत असताना कायद्याचे उल्लंघन करत करताना झालेला अपघात किंवा मृत्यू.
  • कायद्याने बंदी असलेले अमली पदार्थाच्या कार्यवाही करताना झालेला अपघात किंवा मृत्यू.
  • भ्रमिष्टपणा .
  • शरीरांतर्गत रक्तस्त्राव.
  • मोटर शर्यतीत झालेला अपघात किंवा मृत्यू.
  • युद्धामध्ये झालेला अपघात किंवा मृत्यू.
  • सैन्यातील नोकरी मध्ये झालेला अपघात किंवा मृत्यू.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना दावा अर्ज कोठे करायचा व कसा करायचा

या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्याकडे अर्ज करायचा आहे.

अर्ज शेतकऱ्याच्या अपघातानंतर किंवा मृत्यूनंतर 30 दिवसाच्या आत करायचा आहे.

अधिक माहिती साठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना दावा अर्ज gopinath munde shetkari apghat vima yojana form pdf येथे पहा

अर्ज कसा करायचा.

  • स्वतःबद्दलची माहिती लिहायची.
  • मयताचं नाव लिहायचं.
  • त्यांच्या सोबत तुमचं काय नातं आहे ते नातं.
  • मृत्त व्यक्तीच्या मृत्यूचे कारण. 
  • मृत्त व्यक्तीच्या मृत्यूची तारीख.
  • सदरील अपघातात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला की कुठल्या अपंगात वाले आहे याचाही उल्लेख करायचा.
  • तसेच त्या अर्जात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना लाभ मिळावा असे स्पष्ट लिहायचे आहे.

या योजनेसाठी तयार केलेल्या प्रस्तावासोबत जोडावयाची कागदपत्रे

महत्त्वाचे कागदपत्र ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे त्या व्यक्तीचे मृत्यूचे कारण स्पष्ट करणारा कागद उदाहरणार्थ एफ आय आर ,मेडिकल रिपोर्ट , पोस्टमार्टम .

  • सातबारा उतारा.
  • मृत्यूचा दाखला.
  • मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांचा वारस म्हणून तालुक्याकडे गाव नमुना 6 क नुसार वारसाची नोंद घेतलेले पुरावा.
  • सदरील व्यक्तीच्या वयाची खात्री करण्यासाठी त्याच्या आधार कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र.
  • मृत्यूचा प्राथमिक अहवाल पंचनामा किंवा पोलीस पाटलाचा अहवाल.
  • जो वारसदार आहेत त्याचे आधार कार्ड किंवा बँक पासबुक.

सदरील शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला आहे.

अधिक माहिती साठी शासन निर्णय येथे पाहा :-

शासन निर्णय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना २०२३ GR

पुढील कार्यवाही काय असेल

अर्ज केल्यानंतर ही सर्व प्राथमिक माहिती प्राप्त झाल्यामुळे नंतर शासनामार्फत महसूल पोलीस आणि कृषी अधिकाऱ्या यांचं पथक प्रत्यक्षात जिथे घटना घडली तिथे भेट देऊन घटनेची पूर्ण चौकशी करून त्या घटनेविषयी आपला अहवाल संबंधित तहसीलदारांना देईल.

हा अहवाल आठ दिवसाच्या आत तहसीलदार यांना देणे अपेक्षित आहे.

यानंतर तहसीलदार व त्यांच्या अंडर असलेली समिती तीस दिवसाच्या आत शेतकरी कुटुंबाला मदत देण्याबाबत निर्णय जाहीर करेल किंवा घेइल.

तालुका स्तरावरील समिती

तहसीलदारअध्यक्ष
गट विकास अधिकारी(पंचायत समिती)सदस्य
वरिष्ठ पोलीस निरीक्षकसदस्य
जिल्हा आरोग्य अधिकारी यांचा प्रतिनिधीसदस्य
सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचा प्रतिनिधीसदस्य
तालुका कृषी अधिकारीसदस्य सचिव  

जिल्हास्तरीय जिल्हा अपिलिय समिती

जिल्हाधिकारीअध्यक्ष तथा अपिलिय अधिकारी
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीसदस्य
अतिरिक्त पोलीस अधीक्षकसदस्य
जिल्हा शल्य चिकित्सकसदस्य
जिल्हा आरोग्य अधिकारीसदस्य
सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारीसदस्य
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारीसदस्य सचिव

राज्यस्तरीय समिती

अ. मु. स/प्रधान सचिव/ कृषीअध्यक्ष
अ. मु. स/प्रधान सचिव/ महसूलसदस्य
अ. मु. स/प्रधान सचिव/ मदत व पुनर्वसनसदस्य
अ. मु. स/प्रधान सचिव/ नियोजनसदस्य
अ. मु. स/प्रधान सचिव/ गृहसदस्य
अ. मु. स/प्रधान सचिव/ वित्तसदस्य
अ. मु. स/प्रधान सचिव/ आरोग्यसदस्य
आयुक्त (कृषी)सदस्य
सहसचिव/उपसचिव (कृषी)सदस्य सचिव

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना चे उद्दिष्टे

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना 2005-06 यावर्षी लागू झाली ही योजना मुख्य शेतकऱ्यांचे हित करणे यासाठी लागू करण्यात आले,शेती करत असताना शेतकऱ्यांना अनेक अपघातांना सामोरे जावे लागते त्यामध्ये अनेक नैसर्गिक आपत्ती ओळखतात त्यातून अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू होतो किंवा कायमस्वरूपी अपंगत्व येते असे कालावधीत सदरील शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होते व त्याच्या कुटुंबाचा आधार न निघून जातो कर्ता पुरुष असतो त्याच्या जर मृत्यू झाला तर त्या शेतकऱ्यांचा आर्थिक परिस्थिती खूपच खालावते या परिस्थितीत शासनाकडून शेतकऱ्याला थोडीशी मदत म्हणून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना लागू करण्यात आली,जेणेकरून या योजनेमार्फत जर कुठल्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला असेल किंवा अपंगत्वाने असेल तर त्याला शासनाची थोडीशी आर्थिक मदत होईल.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या अटी

तो शेतकरी महाराष्ट्रातला असणे गरजेचे आहे गरजेचे आहे फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे योजनेचे लाभ घेता येईल.

महाराष्ट्राच्या बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ भेटणार नाही.

फक्त शेतकरी आणि शेतकरी कुटुंबातील सदस्याचे योजनेचा लाभ घेऊ शकतात.

यापूर्वी शेतकऱ्यांनी किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्याने शासनाच्या इतर अपघात ग्रस्त योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय दहा ते 75 असणे गरजेचे आहे.

सदरील शेतकऱ्यांना लाभ घेण्यासाठी आधार कार्ड असणे व आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक करणे गरजेचे आहे.

FAQ

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी वयोमर्यादा काय आहे ?

ज्या शेतकऱ्याचे वय किंवा कुटुंबातील सदस्याचे वय 10ते 75 आहे अशा व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येतो.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत किती लाभ दिला जातो ?

या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना जर मृत्यू झाला असेल तर 2 लाख व अपंगत्व आले असेल तर 1 ते 2 लाखाच्या मध्ये लाभ दिला जातो.

गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा योजनेअंतर्गत एका कुटुंबातील किती सदस्यांना लाभ दिला जातो ?

या योजनेअंतर्गत एका कुटुंबातील दोन सदस्यांना दिला जातो.

Leave a Comment