Dal Mill Business:डाळ मिल व्यवसायातून आर्थिक उत्पन्न; प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेतून १० लाखाचे कर्ज ३ लाख ८५ हजारांचे अनुदान!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शेतकरी कुटुंबातील रूपाली सत्यवान जाधव या कर्नवडी ता. खंडाळा जि. सातारा येथील अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्या दुर्गम डोंगराळ भागात आपली शेती करत होत्या. त्यांना कृषी विभागाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची माहिती मिळाली.

त्यांनी कृषी विभागाकडे डाळ मिल व्यवसायासाठी १० लाख कर्जाचा प्रस्ताव सादर केला व तो मंजूरही झाला. श्रीमती जाधव यांनी डाळ मिल उद्योग नैसर्गिक पद्धतीने सुरू केला असून त्यांच्या डाळीला मोठी मागणी आहे. त्यांची आर्थिक उत्पन्न चांगल्या पद्धतीने मिळत असून त्या यशस्वी उद्योजिका आहेत.

श्रीमती जाधव यांना डाळ मिलसाठी कृषी विभागाच्या यांत्रिकीकरण योजनेतून ९७ हजार २०० रुपयांचे अनुदान तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या व्याज परतावा योजनेचाही लाभ मिळाला आहे.

हे कामाचा आहे वाचा   Yashogatha: केवळ ३० गुंठे शेतात; लाखाचे उत्पन्न!

आत्ता प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेतून १० लाखाचे कर्ज मिळाले आहे. या घेतलेल्या कर्जावर ३ लाख ८५ हजारांचे अनुदान मिळाले आहे. त्याचबरोबर उद्योग उभारणीसाठी पती सत्यवान व मुलगा पृथ्वीराज यांचेही सहकार्य लाभले.

प्रथम प्रोसेसिंगसाठी सुरू केलेल्या व्यवसाय मार्केटिंगकडे वळू लागला. फक्त तेल व पाणी वापरून केलेल्या केमिकल विरहित डाळींना सातारा व पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

उद्योग उभारणीसाठी उमेद अभियानाचीही मोलाची साथ मिळाली. त्यांनी दिलेल्या आत्मविश्वासामुळे महिला असूनही उद्योजिका म्हणून जिल्ह्यात चांगली ओळख निर्माण करण्यात यश मिळाले आहे.

डाळीसाठी लागणारा कच्चा माल (कडधान्ये) लातूर, लोणंद, शिरवळ येथून घेतला जातो. तसेच तेलासाठी शेंगा, करडई फलटण जि. सातारा व बारामती जि. पुणे येथून घेतला जातो. उत्पादित केलेल्या शेंगदाणा, करडई, सूर्यफूल तेलाला चांगली मागणी वाढत आहेत.

हे  तर नक्की वाचा  या पिकाला फारसे पाणी लागत नाही;   एकरी पाच ते सहा टन,    एकरी 3 ते 4 लाखाचे उत्पन्न !

शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याबरोबर कृषी विभागाच्या मदतीने आज मी यशस्वी उद्योजिका झाली आहे. जिल्ह्यात हजारो महिला बचतगट आहेत.

या बचतगटांनी लोणचे, पापड इतर छोट्या व्यवसायातून बाहेर पडले पाहिजे. बाजारपेठेच्या मागणीनुसार कृषी उत्पादित केलेल्या मालावर प्रक्रिया करून एक यशस्वी उद्योजिका व्हावे, असेही श्रीमती जाधव आत्मविश्वासाने सांगतात.

1 thought on “Dal Mill Business:डाळ मिल व्यवसायातून आर्थिक उत्पन्न; प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेतून १० लाखाचे कर्ज ३ लाख ८५ हजारांचे अनुदान!”

Leave a Comment