Crop Insurance : पावसामध्ये खंड पडल्यास; पीक विमा मिळतो,पहा सविस्तर माहिती!

पावसामध्ये खंड पडल्यास मिळणार का पीक विमा

भारत देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. आजही देशात अंदाजे ६० टक्के लोक हे शेती व शेती संबंधित असण्याऱ्या व्यवसायावर अवलंबून आहेत. भारतात प्रत्येक राज्यात विविध पद्धतीची पिके घेतली जातात. त्याचप्रमणाने महाराष्ट्रात प्रत्येक राज्यात विविध पद्धतीची पिके घेतली जातात. महाराष्ट्रात गहू,तांदूळ,ज्वारी,बाजरी,ऊस,मका,कापूस इत्यादी पिके सर्वात जास्त प्रमाणात घेतली जातात व ह्याच पिकांना सर्वात जास्त पाऊस लागतो.

पाऊस पडायची सुरवात झाली कि शेतकरी वर्ग पिकांची पेरणी किंवा लावणी करायला सुरवात करतात त्यामुळे जून महिन्याच्या सुरवातीलाच पावसानी उशिरा हजेरी लावल्याने पेरणी साठी उशीर झाला. त्याचप्रमाणे यंदाच्या वर्षी पाऊस सरासरीपेक्षा कमी पडल्यामुळे राज्यातील शेतकरी वर्ग अजूनच चिंतेत आहे.
आलेलं पीक वाचवण्यासाठी शेतकरी वर्ग आभाळाकडे डोळे लावून पावसाची वाट बघत आहेत. अश्या चिंतेच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा आधार आहे. कोणत्या परिस्थितीत शेतकऱ्यांना पीक विमा मिळतो किंवा नुकसान भरपाईची प्रक्रिया कशी असते. ते जाणून घेऊया.

कोणत्या परिस्थितीत शेतकऱ्यांना पीक विमा मिळतो?
पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पीक विमा मिळतो जसे कि नैसर्गिक आपत्ती. अति पाऊस झाल्याने किंवा आलेल्या पावसाच्या पुरामुळे किंवा कमी प्रमाणात पाऊस झाल्याने तसेच पावसामध्ये खंड पडल्याने सुद्धा पीक विमा मिळतो.
राज्याच्या एखाद्या मंडलात कमी पाऊस झाल्याने किंवा २१ दिवसापेक्षा जास्त पावसामध्ये खंड पडल्याने विमा मिळतो. तसेच चालू हंगामातील उत्पादन गेल्या ७ वर्षांमधील उत्पादनाच्या सरासरी ५० टक्के कमी होण्याची शकत्या असल्यास पीक विमा मिळू शकतो.

नुकसान भरपाईची प्रक्रिया कशी असते
पावसामध्ये २१ दिवसापेक्षा अधिक खंड पडत असेल आणि उत्पादनात घट येऊ शकते हि गोष्ट निदर्शनास आल्यास जिल्हाधिकारी अग्रिम भरपाईसाठी अधिसूचना काढू शकतात.
ज्या त्या जिल्ह्यामधील जिल्ह्याधिकारांना मंडळात प्रथमदर्शनी उत्पादनात घट दिसत असल्यास तालुका पीकविमा समितीला नुकसान सर्वेक्षणाच्या सूचना देतात.
तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्यानंतर तालुका पीकविमा समितीने ८ दिवसांमध्ये सर्वेक्षण करणे गरजेचे आहे.
या समितीमध्ये तालुका कृषी अधिकारी, पीकविमा कंपनीचे प्रतिनिधी, विषय जाणकार आणि शेतकरी प्रतिनिधींचा समावेश असतो.
तसेच पंतप्रधान पीकविमा योजनेच्या जिल्हा समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतात तर जिल्हा अधीक्षक,कृषी अधिकारी हे सचिव असतात.

आज सोने-चांदी दरात मोठे बदल सोने झाले !

तालुका समितीला केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना द्यावा लागतो. या अहवालात ज्या मंडलात २१ दिवसांपेक्षा अधिक दिवस पावसाचा खंड पडला आणि त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्याचा अहवाल दिला, तर जिल्हाधिकारी त्या मंडलातील पीकविमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रिम नुकसानभरपाईसाठी अधिसूचना काढतात. अग्रीम भरपाई म्हणजेच त्या मंडलातील शेतकऱ्यांना २५ टक्के रक्कम दिली जाते.

Leave a Comment