Automobile:कमी पैशात,सगळ्यात सेफ्टी कार

automobile प्रत्येकाचे एक स्वप्न असते ते म्हणजे स्वतःची अशी आपली कार असावी. कार खरेदी करताना प्रत्येकजण वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करून कार खरेदी करतात कोणी गाडीचे फीचर्स बघतात तर कोणी गाडीचे मायलेज बघत तर कोणी सेफ्टी फीचर्स. कार खरेदी करताना सेफ्टी फीचर्स खूप महत्त्वाचे असतात. आजकाल लोक वाहनांमध्ये अधिकाधिक सेफ्टी फीचर्सची मागणी करत आहेत. त्यामुळे वाहन उत्पादक कंपन्यांनीही वाहनांच्या सुरक्षिततेबाबत अधिक दक्षता घेण्यास सुरुवात केली आहे. कारच्या स्टाईल आणि पॉवरसोबतच आता कारच्या सेफ्टी फीचर्सवरही विशेष लक्ष दिले जात आहे. नवीन तंत्रज्ञानासोबतच नवीन सुरक्षा फीचर्सही कारमध्ये देण्यात येत आहेत. तुम्हाला मजबूत सुरक्षा वैशिष्ट्ये देणारी कार तुम्ही देखील शोधत आहात? त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी एक-दोन नव्हे तर 5 उत्तम पर्याय घेऊन आलो आहोत. या वाहनांमध्ये तुम्हाला सहा एअरबॅग मिळतील हे लक्षात घेण्यासारखे आहे. चला पाहूया या कोणत्या गाड्या आहेत…

Tata Nexon

भारतातील सर्वात लोकप्रिय कॉम्पॅक्ट SUV वाहनांपैकी Tata Nexon ही एक आहे ज्याला अलीकडेच ग्लोबल NCAP क्रॅश चाचणीमध्ये 5-स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे. तुम्ही टाटा नेक्सॉन रु. 8.15 लाख ते रु. 15.60 लाख (एक्स-शोरूम) दरम्यान खरेदी करू शकता. टाटा नेक्सॉन कॉम्पॅक्ट एसयूव्हीचे सर्व प्रकार सहा एअरबॅगसह उपलब्ध असतील.

Hyundai Exeter

ह्युंदाई कंपनीच्या Hyundai Exeter ला नुकताच ‘इंडियन कार ऑफ द इयर 2024’ पुरस्कार मिळाला कारण ही मायक्रो SUV सर्व योग्य बॉक्सेसवर टिक करते. Hyundai Exeter त्याच्या सर्व प्रकारांमध्ये सहा एअरबॅग ऑफर करते. या कारची किंमत 6.13 लाख ते 10.28 लाख रुपये आहे.

Kia Sonet

किया कंपनीने अलीकडेच Kia Sonet फेसलिफ्ट भारतात लॉन्च केली आहे, ज्याची किंमत 7.99 लाख रुपयांपासून सुरू होते आणि कारच्या सर्व प्रकारांमध्ये सहा एअरबॅग उपलब्ध आहेत.

Kia Seltos

किया सेलटॉस ची भारतातील किंमत 10.70 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 20.30 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) जाते. Kia India ने देखील अलीकडेच घोषणा केली आहे की ती सुरक्षा वैशिष्ट्ये वाढवण्यावर काम करत आहे आणि सर्व कार मॉडेल्स आणि प्रकारांमध्ये सहा एअरबॅग ऑफर करत आहे.

Hyundai Venue

ह्युंदाई कंपनीची Hyundai Venue ही कॉम्पॅक्ट SUV विभागातील एक लोकप्रिय SUV आहे, ज्याच्या टॉप-एंड मॉडेलच्या किमती 7.94 लाख रुपयांपासून सुरू होतात आणि 13.48 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) आहेत.

Leave a Comment