abha card 2024:आभा कार्ड काढा दोन मिनिटात होईल मोठा फायदा !

abha card म्हणजे आरोग्य विभागाच्या नव्या पर्वाची सुरुवात एक केंद्र सरकारकडून करण्यात आली, याची नुकतीच घोषणा मोदी गव्हर्मेंट ने केली आहे, या योजनेअंतर्गत भारतातील प्रत्येक नागरिकाला एक आभा कार्ड देण्यात येणार आहे , ती व्यक्ती भारतात कुठेही राहत असू दे त्या व्यक्तीला हे abha card मिळणार आहे.

तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “आभा हेल्थ कार्ड म्हणजे नागरिकांच्या आरोग्याची कुंडलीच “ असे विधान करून “प्रत्येक व्यक्तीने हे आभा कार्ड बनवून घ्यावे ” आवाहन केले आहे ,यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक गतिशील होईल असे म्हटले.

  • आभा हेल्थ कार्ड म्हणजे नेमकं काय  ?
  • आभा हेल्थ कार्ड ऑनलाइन कसे काढायचे ?
  • आभा हेल्थ कार्ड चे फायदे काय ?

“आभा म्हणजे आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट नंबर ” हे एक डिजिटल कार्ड असणार आहे की या कार्डमध्ये तुमच्या आरोग्याशी संबंधित सर्व माहिती साठवली जाणार आहे.

यात कोणती माहिती असणार आहे

  • आजार कोणता !
  • कुठल्या दवाखान्यात उपचार !
  • त्यावेळी डॉक्टरांनी कोणती औषध उपचार वापरली किंवा दिली!
  • त्यावेळेस धारकाने आरोग्याची संबंधित कुठल्या शासकीय योजनेचा लाभ घेतलाय !

abha card चे स्वरूप

हे आभा कर्ड आधार कार्ड सारखेच डिजीटल कार्ड असणार आहे.

यावर एक 14 अंकी नंबर असणार आहे तो विशिष्ट ओळख क्रमांक म्हणून ओळखला जाईल या नंबरचा वापर करून डॉक्टर त्या रुग्णाची सर्व हिस्टरी पाहू शकतील.

  • रुग्णाच्या पत्ता
  • रुग्णाची जन्मतारीख
  • मोबाईल नंबर

आभा कार्डचा फायदा abha card benefits

 जर एखाद्या डॉक्टरकडे आपण तपासनी केली आणि त्या डॉक्टरचा गुण नाही आला म्हणजे त्या डॉक्टर पाशी आपल्या रोगाचा इलाज नाही झाला म्हणून आपण दुसऱ्या डॉक्टरकडे जाऊ तेव्हा पूर्वीची कागदपत्रे किंवा फाईल घेऊन जाण्याची गरज राहणार नाही कारण ते दुसरे डॉक्टर तुमचा युनिक आयडी नंबर टाकून सर्व हिस्टरी पाहू शकते

याचा असा फायदा होईल की फाईल गहाळ झाली तरी पूर्वी कोणत्या टेस्ट केल्या त्या टेस्ट डबल करण्याची गरज पडणार नाही, तसेच डॉक्टरांना पूर्वी कुठली औषधे उपचार घेतले , हे सर्व माहिती करून येईल त्यामुळे रुग्णाच्या पैशांची बचत होईल.

माहितीची गुप्तता

तुम्ही तुमचे abha health card सुरक्षितेच्या कारणाने जेव्हा वाटेल तेव्हा डिलीट किंवा डीऍक्टिव्हेट किंवा त्यामधील माहिती डिलीट करू शकणार आहात त्यामुळे याचा कुठेही गैरवापर होणार नाही

आभा कार्ड कसे बनवायचे abha card login

1)ऑफलाइन पद्धतीने

स्वतः सरकारी खाजगी किंवा प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्र जाऊन आभा हेल्थ कार्ड काढू शकतात.

2)ऑनलाइन पद्धतीने

तुम्ही तुमच्या घरी बसून हे ऑनलाईन पद्धतीनेही काढू शकता .

आभा कार्ड कसे काढायचे how to abha card registration

Step1: सर्वप्रथम तुम्हाला आपल्या मोबाईल मध्ये गुगल वर जाऊन ndhm.gov.in असे सर्च करायचे आहे

तुमच्या स्क्रीनवर आयुष्यमान  भारत डिजिटल मिशनची वेबसाईट ओपन होईल

Step2: या वेबसाईटवरील create ABHA Number या रकान्यावर क्लिक करायचे आहे

यानंतर तुम्हाला एक Using Aadhaar आणि Using Driving Licence चे पर्याय दिसतील त्यापैकी एका पर्यायावर क्लिक करून आभा कार्ड काढू शकता .

Step 3: युजिंग आधार Using Aadhaar

या पर्यायावर क्लिक केल्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डची लिंक असणे गरजेचे आहे.

त्यानंतर खाली असलेल्या Next या पर्यायावर क्लिक करायचा आहे ,जश ही क्लिक करा त्यापुढे एक कॉलम  दिसेल त्यामध्ये आधार नंबर लिहिलेले असेल त्यावर आधार कार्ड नंबर भरयाच आहे .

त्यानंतर खाली । agree या बटनवर क्लिक करायचा आहे .

त्याखाली एक गणित दिले असेल त्याचं उत्तर लिहायचं आहे आणि Next वर क्लिक करायचा आहे .

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना शेतकऱ्यांना मिळणार 12,000 रुपये

Step 4: त्यानंतर लगेच तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो ओटीपी टाकून नेक्स्ट या बटन वर क्लिक करायचा आहे.

त्यानंतर तुमचे आधार कार्ड वरील माहिती जसे की नाव ,लिंग ,जन्मतारीख ,आणि पत्ता हे दिसून येईल

तसेच आधार वरील Aadhar Authentication Successful  झाल्याचे ही नोटिफिकेशन येईल

Step 5: नंतर पुन्हा एकदा नेक्स्ट या बटन वर क्लिक करायचे आहे.

नवीन पेज ओपन होईल त्यावर आधार से लिंक असलेला मोबाईल नंबर टाकून नेक्स्ट या बटन वर क्लिक करायचा आहे.

Step 6: नेक्स्ट पेजवर तुम्हाला ईमेल वेरिफिकेशन असे ऑप्शन येईल हा ईमेल जोडणे कंपल्सरी नाही ते ऑप्शनल आहे तर तो email जोडायचा असेल तर तिथे तुम्ही ईमेल आयडी टाकू शकता किंवा skip for now वर क्लिक करू शकता.

आणि लगेचच नेक्स्ट पेजवर तुम्हाला आभा नंबर तयार झालेला दिसेल .आणि आबा नंबर तुमच्यासमोर नमूद केलेला दिसेल.

E pik pahani:ई-पीक पाहणीचे फायदे;नाहीतर होईल नुकसान

Step 7: त्यानंतर तुम्हाला Link ABHA Address या रकाण्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे,

क्लिक केल्यानंतर तुम्ही या आधी आभा अँड्रेस तयार केला आहे का असा प्रश्न दिसेल तर तुम्हाला तिथे No अश्या ऑप्शनवर टिक करून Login to your ABHA number यावर क्लिक करायचे आहे ,

यानंतर पुढे तुम्हाला  तुमची माहिती दाखवली  जाईल काळजीपुर्वक वाचून घ्यायची आहे आणि तुमचा आभा ॲड्रेस तयार करायचा आहे ,

त्याखाली तुम्हाला विचार करण्यात तुम्हाला लक्षात राहील असं नाव जन्मतारीख किंवा प्रिय व्यक्तीचे नाव टाकून आबा ॲड्रेस तयार करायचा आहे.

Step 8: create and link बटनवर क्लिक करायचा आहे,

त्यानंतर तुम्हाला काँग्रॅच्युलेशन तुमचा आभा नंबर आभा पत्त्याशी लिंक झाला आहे असा मेसेज येईल,

इथे तुमचे आभा आधार कार्ड तयार झालेले आहे.

आभा हेल्थ कार्ड कसे डाउनलोड करायचे तरी कसे ?

तुम्हाला गुगल सर्च मध्ये जाऊन, healthid.abdm.gov.in  असे टाकून सर्च करायचे आहे आणि तुमच्यासमोर आयुष्यमान भारत वेबसाईट ओपन होईल ,

आता तुम्हाला उजव्या बाजूला लॉगिन असे दिसेल या लॉगिन वर क्लिक करायचे आहे,

दोन ऑप्शन दिसतील एक मोबाईल नंबर टाकून आणि दुसरे आभा नंबर टाकून या दोन्हीपैकी एका पर्यायचा वापर करायचा आहे .

खाली असलेले आभा  नंबर टाकून जन्मतारीख टाकायचे आहे

नंतर त्या खाली असलेले गणित सोडवून  continue या बटन वर क्लिक करायचे आहे

यानंतर तुमच्या आधार लिंक मोबाइल नंबर वर एक OTP येईल तो ओटीपी येथे टाकून Validate करायचा  आहे आणि continue या बटन वर क्लिक करायचे आहे.

लगेच स्क्रीनवर तुम्हाला तुमचे आभा कार्ड दिसेल

abha card download कसे करायचे

त्याखाली ABHA Card download असे दिसेल यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे आणि तुमचे आभा लगेच डाऊनलोड होईल .

आभा कार्ड एडिट किंवा डिलीट कसे करायचे ?

आभा कार्ड डाऊनलोड केल्यानंतर डाव्या बाजूला असलेल्या ऑप्शन चा वापर करून तुम्ही तुमचे सर्व माहिती एडिट किंवा डिलीट किंवा डी ऍक्टिव्हेट करू शकता .

आभा कार्ड चे तोटे

हेल्थ कार्ड मध्ये असलेल्या माहितीची चोरी होण्याची शक्यता .

हेल्थ कार्ड मध्ये व्यक्तीच्या आरोग्याशी संबंध सर्व माहिती असल्यामुळे ते जर हॅक केले तर त्याचा गैरवापर होऊ शकतो ते रुग्णाच्या जीवावर हे येऊ शकते .

आरोग्य संबंधित सर्व माहिती यात साठवली असल्यामुळे सायबर क्रिमिनल याचा वापर करून डुप्लिकेट डेटा तयार करू शकतात .

आधार कार्ड वरील सर्व माहिती या कार्ड्स लिंक असल्यामुळे आधार डाटा चा गैरवापर होऊ शकतो .

सुरक्षा आणि प्रायव्हसी

आबा हेल्थ कार्ड काढतो त्यावेळेस जो आपण डाटा जमा केला आहे किंवा आपली माहिती भरली आहे ती एका सर्वर वर सेव केले जाते आणि ते सर्व पूर्णतः सुरक्षित असून या सुरक्षित डाटाची जबाबदारी शासनाने घेतलेली आहे तसेच आपन भरलेली माहीती ची गुप्तता जपली जाईल असे शासनाने ग्वाही दिली आहे त्यामुळे आपल्याला सध्यातरी चिंता करण्याची गरज नाही ही माहीती आपल्याला आवडली असल्यास आपल्या प्रियजनांना ही माहीती पाठवा नक्कीच सर्वांना लाभ होईल.

Help Line Number

काही अडचण येत असेल तर खालील नंबर वर संपर्क करू शकता.

Toll-Free Number: 1800114477 | 14477

ABHA क्रमांकाचे फायदे

ABHA क्रमांक हा 14 अंकी क्रमांक आहे जो तुम्हाला भारताच्या डिजिटल हेल्थकेअर इकोसिस्टममधील सहभागी म्हणून ओळखेल. ABHA नंबर तुमच्यासाठी एक मजबूत आणि विश्वासार्ह ओळख प्रस्थापित करेल जी देशभरातील आरोग्य सेवा प्रदात्यांद्वारे स्वीकारली जाईल. PHR (पर्सनल हेल्थ रेकॉर्ड) ऍप्लिकेशन्ससाठी अखंड साइन अप करा जसे की आरोग्य डेटा शेअरिंगसाठी ABDM ABHA ऍप्लिकेशन.

Conclusion                                

आजच्या आर्टिकल मध्ये आपण खूपच युनिक अशी माहिती दिलेली आहे , ABHA Card विषयी सविस्तर माहिती घेतलेले आहे यामध्ये आभा कार्ड कसे काढायचे , त्याचे फायदे तोटे आणि प्रत्येकाला कसे आवश्यक आहे , सविस्तर आढावा घेतला . जर आमच्या लेख विषयी कोणाला काही तक्रार असल्यास किंवा काही सजेशन असल्यास आमच्या मेलवर संपर्क साधू शकता.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना फळबाग लागवड 

3 thoughts on “abha card 2024:आभा कार्ड काढा दोन मिनिटात होईल मोठा फायदा !”

Leave a Comment