fish production: शेततळे योजना इतके रुपये अनुदान; मत्स्य उत्पादनतून  पैसाच पैसा !

शासकीय योजनेचा लाभ घेऊन स्वतःच्या नावीन्यपूर्ण संकल्पनेतून पारंपरिक शेतीचा कायापालट करू शकतो हे सिद्ध केले आहे

चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यातील चेक हत्तीबोडी येथील युवा शेतकऱ्याने! विशेष म्हणजे शासकीय शेततळे योजनेतून मिळालेल्या शेततळ्यातस्व:खर्चाने मत्स्यबीज सोडून मत्स्य उत्पादन, त्याची विक्री, या शेततळ्यातून शेतीला सिंचन आणि शेततळ्याच्याच बांधावर फळबाग लागवड असा उपक्रम या तरुणाने राबवला आहे.

पोंभुर्णा तालुक्यातील डोंगरहळदी (तुकूम) येथील रहिवासी असलेल्या प्रवीण बुधाजी सोमनकर या तरुणाची चेक हत्तीबोडी येथे साडेसात एकर शेती आहे.

पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या प्रवीणला केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) भरतीने हुलकावणी दिली.

 त्यानंतर तो थेट शेतीकडे वळला. कृषी विभागाच्या ‘मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत २५ बाय २० बाय ३ मीटर शेततळ्यासाठी २०१७ मध्ये त्याला ५० हजार रुपयांचे अनुदान मिळाले.

यातून शेततळे पूर्ण करून त्यात प्रवीणने स्व:खर्चाने मत्स्यबीज सोडण्याचा निर्णय घेतला. यात ग्रासकर्प, सिरपन, रोहू, कटला या माशांच्या प्रजातींचा समावेश आहे.

दरवर्षी जुलैमध्ये शेततळ्यात मत्स्यबीज सोडले जाते. अर्धा ते पाऊण किलोचे मासे झाले की, प्रवीण त्याची विक्री करतो.

शेततळे आणि मत्स्यव्यवसाय एवढ्यावर न थांबता प्रवीणने महात्मा गांधी महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतून शेततळ्याच्या बांधावर आणि शेतात फळबाग लागवड केली आहे.

त्यासाठी त्याला कृषी विभागाकडून अनुदान प्राप्त झाले असून आजघडीला त्याच्या शेतात आंब्याची दशहरी, लंगडा, हापूस, केशर या प्रजातींची ६० झाडे, पेरू, सीताफळ आणि फणसाची प्रत्येकी १० झाडे आहेत.

येथे क्लिक करून वाचा

नव्या शेततळ्यांसाठी ४६ कोटींचा निधी

एवढेच नाही तर शेततळ्याच्या एका बाजूला त्याने निलगिरीसुद्धा लावली आहे. कृषी विभागाने शेतात सिंचनाकरिता प्रवीणला महाडीबीटी योजनेंतर्गत पाणबुडी मोटर आणि पाईप २० हजार रुपयांच्या अनुदानावर उपलब्ध करून दिले आहे.

शेततळे आणि बोअरच्या माध्यमातून शेतात सिंचन होत असल्यामुळे धानासोबतच भाजीपाला आदी पिके तो घेत आहे.

गतवर्षी प्रवीणला २ लाखांचे उत्पन्न झाले. फळबाग उत्पनातून प्रत्यक्ष आंबे निघाल्यावर त्याचे उत्पन्न नक्कीच दुप्पट होईल, असेही प्रवीण सोमनकर याने सांगितले.

पारंपरिक शेतीला फाटा देऊन शेततळे, मत्स्य उत्पादन, फळबाग लागवड आणि सिंचनातून खऱ्या अर्थाने प्रवीणने समृद्धी साधली असून तो ‘धानातून धनाकडे’ वळल्याचे चित्र आहे.

शेततळे

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे अर्ज करा .

Continue Reading More Recent News

ladki bahin yojana

लाडकी बहीण योजनेत दिवाळीला मोठं गिफ्ट! थेट खात्यात जमा होतील 5500 रुपये, फक्त…

मुंबई, 15 ऑक्टोबर 2024, (विशेष प्रतिनिधी) लाडकी बहीण योजनेचा परिचय महाराष्ट्र सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरु केलेली ‘लाडकी बहीण योजना’ आता …

Read more

ladki bahin yojana

लाडकी बहीण योजनेत धमाका! फ्री मोबाईल मिळणार?

14 ऑक्टोबर 2024 | मराठी न्यूज डेस्क चार हफ्त्यांचे पैसे जमा, पुढील हफ्त्यांची प्रतीक्षा राज्यात सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेच्या …

Read more

indian automobile

Indian automobile:भारतामधील ह्या गाड्या होणार बंद!

indian automobile2024 :भारतामधील ह्या गाड्या होणार बंद! आजकाल प्रत्येकाकडेच  बाईक कार असतात. भारतीय बाजारात विविध कंपन्यांच्या गाड्या बाजारात विकल्या जातात …

Read more

LPG Gas Subsidy

अशी सुरु करा गॅस सबसिडी; पर सिलेंडर खात्यावर 300 रुपये जमा होतील ! LPG Gas Subsidy 

By Finance News DeskDate: September 6, 2024 LPG Gas Subsidy: जर तुमच्याकडे एलपीजी गॅस कनेक्शन असेल आणि तुम्ही प्रधानमंत्री उज्ज्वला …

Read more

Leave a Comment