Weather Alert: मागील दोन दिवसात राज्यात विविध ठिकाणी थोडा थोडा पाऊस झालेला आहे.
Rain Forecast हवामान विभागातर्फे हि पुदी दोन दिवसात पावसाची शक्यता वर्तवली आहे, निशिचतच हि शेतकरी बांधवासाठी आनंद देऊन सुखावणारी बातमी आहे.
तसेच हवामान विभागातर्फे पाऊस परत एकदा राज्यात सक्रिय होईल असे सांगितले जात आहे.
हवामान विभागाच्या पुणे विभागीय कार्यालय तर्फे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सप्टेंबर महिन्यात ६ व ७ सप्टेंबर रोजी पावसाच्या सरी कोसळतील असे सांगण्यात आले आहे.
तसेच पुढची काही दिवस वातावरणामध्ये थंडगार गारवा हि जाणवेल असेही सांगण्यात आले आहे.
नागपूर , पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यामध्ये मध्यम पण समाधानकारक पाऊस पडेल असे हवामान विभागाच्या पुणे वेधशाळेतर्फे सांगण्यात आलेले आहे.
येलो अलर्ट कोण कोणत्या भागासाठी आहे ?
येत्या शनिवार पर्यंत म्हणजे ९ सप्टेंबर पर्यंत मराठवाडा, कोकणपट्टी, पश्चिम महाराष्ट्र या भागात येलो अलर्ट आहे.
म्हणजे वरील भागामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता सांगितली आहे.
ऑरेंज अलर्ट कोणत्या भागात आहे ?
तर पूर्व विदर्भ तसेच पश्चिम विदर्भ या भागामध्ये ऑरेंज अलर्ट आहे.
ऑरेंज अलर्ट म्हणजे या भागामध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे.
वरील परिस्थिती तथा पावसाचा पुणे हवामान विभागातर्फे दिलेला हवामान अंदाज पाहता सर्व नागरिकांनी तसेच शेतकरी बांधवानी शेतीच्या कामाचे नियोजन याप्रमाणे करावे.
विदर्भसाठी ऑरेंज तर उर्वरित भाग म्हणजे मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्राला येलो अलर्ट आहे.
वरील हवामान अंदाज देण्याचे कारण म्हणजे बंगालच्या उपसागरात उच्च दाबाचा पट्टा तयार झाला आहे, त्यामुळे परत मान्सून सक्रिय होऊन राज्यात पाऊस पडणार आहे.
तसेच ९ तारखे पर्यंत राज्यात विविध भागात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.
सर्व शेतकरी बांधवानी वरील हवामान विभागाचा अंदाज लक्ष्यात घायचा आहे.