Panjab Dakh Video: पंजाबराव डख म्हणतात; आजपासून राज्यात या भागात पडणार पाऊस !
नमस्कार शेतकरी मित्रहो, आपल्याला माहित आहे राज्यात ऑगस्ट महिन्यात पावसाने बहुतांश भागात उघड दिली आहे, त्यामुळे जोमदार आलेल्या पिकांना आता पावसाची गरज आहे.
अगोदरच गोगल गायचा प्रादुर्भाव तसेच इतर गोष्टीवर मात करत शेतकरी बांधवानी आपली पिके काष्ठाने जोमदार आणली आहेत.
बरेच शेतकरी पावसाची वाट बघून आता स्पिकलर ने पाणी द्यायला सुरवात केली आहे. पण शेतकरी बांधवाना आता पाऊस कधी येणार याची प्रतिक्षा आहे.
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी ऑगस्ट साठी चा दिलेला पहिला हवामान अंदाज मध्ये असे सांगितलेले होते कि ऑगस्ट च्या पहिल्या पंधरवड्यात पाऊस उघड देणार आहे.
त्यामुळे शेतकरी बांधवानी आता करावयाची शेतीचे कामे जसे कि खुरपणी, कोळपणी, फवारणी करून घ्यावी जेणेकरून पुढच्या पंधरवड्यात पाऊस सुरु झाल्यास हि कामे करता येणार नाहीत.
पंजाबराव डख यांनी दिलेला हा हवामान अंदाज तंतोतंत खराही ठरला खरंच ऑगस्ट च्या पहिल्या पंधरवड्यात पावसाने उजाड दिली.
शेतकरी पुत्र शेतकरी मित्र हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी नवीन हवामान अंदाज दिलेला आहे. त्यांनी पावसाबद्दल काय माहिती दिली आहे ते आपण पाहू.
पंजाबराव डख हवामान अंदाज
आता पंजाबराव डख यांनी दिलेल्या नवीन हवामान अंदाज मध्ये असे सांगितले आहे कि आता महाराष्ट्रामध्ये सर्वत्र उद्यापासून म्हणजे १८ ऑगस्ट पासून पावसाला परत सुरवात होणार आहे.
तसेच काल पासून म्हणजे १६ ऑगस्ट पासून महाराष्ट्र मध्ये काही भागात पावसाला सुरवात झालेली आहे.
दिनांक १६ ऑगस्ट, १७ ऑगस्ट, १८ ऑगस्ट रोजी पुर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ व मराठवाडा या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस सुरु होणार आहे.
दिनांक १७,१८,१९,२०,२१, २२ ऑगस्ट ला हा सुरु झालेला पाऊस मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, पूर्व विदर्भ, कोकण पट्टी, तसेच खान्देश या सर्व भागात पसरेल व तिकडे हि पावसाला सुरवात होईल.
महाराष्ट्रामध्ये संपूर्ण राज्यात दिनांक १८,१९,२०,२१ ऑगस्ट या तारखेला सर्व भागात पाऊस होईल.
तसेच त्यानंतर या महिन्यात शेवटच्या आठवड्यात म्हणजे ऑगस्ट च्या शेवटच्या आठवड्यात दिनांक २६,२७,२८,२९,३० महाराष्ट्रामध्ये पाऊस परत जोरदार हजेरी लावणार आहे.
शेवटी पंजाबराव डख असे सांगतात कि शेवटी हा हवामान अंदाज आहे वारे मध्ये बदल झाला कि पावसाची वेळ, दिशा, ठिकाण यामध्ये बदल होतो.
शेतकरी मित्रानो हा हवामान अंदाज आपल्या सर्व शेतकरी बांधवाना पाठवा – पंजाबराव डख
आजच्या काळात फायदेशीर शेती करायची असेल तर हवामानाचा अंदाज घेऊन शेतीतील कामाचे नियोजन करायला हवे.
म्हणून सर्व शेतकरी बांधवानी हा महत्वाचा शेतीविषयक पावसाचं अहवामन अंदाज लक्षात घ्यायचा आहे व तसे कामाचे नियोजन करावयाचे आहे.