मोटोरोलाने गेल्या महिन्यात चीनमध्ये Moto G34 5G स्मार्टफोन लॉन्च केला होता. आता अशी बातमी आहे की हा स्मार्टफोन आता भारतात देखील उपलब्ध होऊ शकते. प्रख्यात Tipster Mukul Sharma यांनी Moto G34 5G ची भारतीय लॉन्च तारीख लीक केली होती.
या स्मार्टफोनमध्ये 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह भारतात लॉन्च करण्यात येणार आहे. हा फोन स्टार ब्लॅक आणि सी ब्लू कलरमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.
Tipster Mukul Sharma ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर खुलासा केला आहे की आगामी मोटो स्मार्टफोन प्रीमियम वेगन लेदर रिअर पॅनेलसह सादर केला जाईल.
हा फोन भारतात 9 जानेवारी रोजी लॉन्च होईल आणि स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसरसह, या प्राईज रेंजमधील सर्वात वेगवान 5G स्मार्टफोन असेल. चीनमध्ये Moto G34 5G च्या 8GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 999 रुपये (अंदाजे रुपये 11,950) आहे. हा फोन स्टार ब्लॅक आणि सी ब्लू या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे
चीनमध्ये लॉन्च केलेल्या Moto G34 5G फोनमध्ये 120Hz च्या रिफ्रेश रेटसह HD+ रिझोल्यूशनसह 6.5-इंचाचा OLED डिस्प्ले आहे. फोन डॉल्बी अॅटमॉस-ट्यून ड्युअल स्टीरिओ स्पीकरसह येतो आणि स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसरवर काम करतो. फोन 8GB LPDDR4X रॅम आणि 8GB व्हर्च्युअल रॅमला सपोर्ट करतो.
यात 128GB च्या UFS 2.2 स्टोरेजचा समावेश आहे जो मायक्रोएसडी कार्ड स्लॉटद्वारे कधीही वाढवता येतो. फोनमध्ये 5,000mAh बॅटरी आहे जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Moto G34 5G मध्ये 50-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आणि मागील बाजूस 2-मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये 16 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. हा स्मार्टफोन MyUI 6.0 वर आधारित Android 14 वर चालतो. फोनमध्ये साइड-फेसिंग फिंगरप्रिंट सेन्सर आहे. फोनची लांबी 162.7 मिमी, रुंदी 74.6 मिमी, जाडी 7.99 मिमी आणि वजन 179 ग्रॅम आहे.