Manache varkari 2023: विठ्ठलाची पूजे साठी मानाचे वारकरी; कोण ठरवतं आणि कस!

पंढरपूरचा विठोबा म्हणजे रूंपूर्ण महाराष्ट्राचा लाडक दैवत.आषाढी एकादशी म्हणजे भक्ताचा आणि त्याच्या विठ्ठलाचा लाडका सण आज आषाढीनिमित्त पांडूरंगाची पुजा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडली आणि या पूजेचे मानाचे वारकरी ठरले अहमदनगर जिल्ह्यातील भाऊसाहेब काळे दाम्पत्याला .

आषाढी एकादशी येण्याच्या महिन्याभरातील संपूर्ण महाराष्ट्रात भक्तीमय वातावरण चालू होतेत संपूर्ण वातावरण भक्तीमय पावसात चिंब भिजून जाते.

शेवटी आषाढी एकादशीचा दिवस येतो म्हणजे भक्ताचे जणू पर्वणीच.

संपूर्ण वातावरणात विठ्ठल विठ्ठल  नाम घोषाने दनदनून जाते .

दर वर्षी पंढरपुरात संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर अख्या देशातून भाविक भक्त गोळा होता.

आणि त्याच दिवशी राज्याचे मुख्यमंत्री विठ्ठलाची पूजा करतात त्याचे वेळी  त्यांच्यासोबत एका वारकरी दांपत्याला सोबत पूजा करण्याचा मान मिळतो.

यावर्षी विठ्ठलाची पूजा केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबत पूजा करण्याचा मान मिळाला अहमदनगर जिल्ह्यातील भाऊसाहेब काळे दाम्पत्याला.

आपण पाहतो की दरवर्षी मुख्यमंत्र्यांसोबत एका शेतकरी दांपत्याला पूजेचा मान मिळतो त्यावेळेस आपल्या मनात हा प्रश्न येतो की यांना हा मान मिळतो कसा किंवा कोण देतं यासाठी कोठे नाव नोंदवावी लागते का किंवा यांची निवड कशी होते यासाठी आपली निवड होईल का किंवा आपल्याला हा मान मिळेल का हो हा मान तुम्हालाही म्हणू शकतो कसा ते आपण पाहू!

मानाचा वारकरी ठरवण्याचा अधिकार पूर्णपणे मंदिर समिती ला आहे .

शासकीय पूजेचा प्रकार हा ही समिती स्थापन झाल्यानंतर सुरुवात झाली सन 1973 साली सुरुवात झाली म्हणजे 693 पासून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा केली जाते व त्यासोबत एका शेतकरी दांपत्याला याचा मान मिळतो आतापर्यंत भरपूर शेतकरी दाम्पत्याला हे भाग्य लाभले आहे.

मानाचे वारकरी ठरवतं कोण आणि कस ?

हे वारकरी निवडण्याचा संपूर्ण अधिकार मंदिर समितीला देण्यात आलेला आहे.

मानाचे वारकरी कसे निवडले जातात ?

मानाचे वारकरी कशे निवडले जातात तर जेव्हा विठ्ठलाची पूजा ही पहाटे पार पडते हे पूजा करण्यासाठी मुख्यमंत्री मंदिरात उपस्थित राहतात.

जेव्हा मुख्यमंत्री मंदिरात येतात तेव्हा मंदिराचे दरवाजे बंद केले जातात, आणि विठ्ठलाच्या पूजेची तयारी चालू होते याच वेळेस नेमकं सभामंडपात किंवा दर्शन रांगेत पुढे उभे असलेल्या दांपत्याला हा मान दिला जातो.

म्हणजे दर्शनाच्या रांगेत जे दांपते सर्वात समोर असेल त्यांना हा मान मिळतो मंदिर समितीचे अधिकारी त्यांना बोलावून हा मान देतात व मुख्यमंत्र्यांसोबत विठ्ठलाची पूजा करण्याचा त्यांना मान मिळतो.

मुख्यमंत्र्यांसोबत दांपत्याला मान देण्याची प्रथा अलीकडच्या काही वर्षापासून सुरुवात झालेली आहे.

हे पूजा संपल्यानंतर मंदिर समितीतर्फे त्या दांपत्याचा यथोचित सत्कार केला जातो मुख्यमंत्रीच्या हस्ते हे सत्कार केला जातो.

ज्या दाम्पत्याची या पूजेसाठी निवड झालेली आहे अशा दांपत्याला एसटी महामंडळातर्फे वर्षभर एसटीचा मोफत पास दिला जातो

आषाढी एकादशी मुहूर्त

यावर्षी आषाढ महिन्यातील देवशयनी आषाढी एकादशी दी. 29 जून 2023 रोजी पहाटे 3:18 मिनिटानी सुरू झाली आणि 30 जून रोजी दुपारी 2:42 वाजता समाप्त होत आहे. नक्षत्र स्वाती,योग सिद्ध. महाराष्ट्रात साळगावकर पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे आषाढी एकादशी गुरुवार २९ जून २०२३ रोजी साजरी होत आहे.

पंढरपूर नगरी आषाढी एकादशी सोहळ्यासाठी सज्ज

यावर्षीपंढरपुरात आषाढी एकादशी निमित्त भाविकांचा लोढा अधिक येण्याची शक्यता असल्यामुळे जय्यततयारी करण्यात आली आहे जागोजागी स्वच्छता केली जात आहे, तसेच ठीक ठिकाणी तात्पुरता स्वरूपाचे स्वच्छतागृहे उभारण्यात आलेले आहेत.

काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः या स्वच्छता ग्रहाचे पाहणी केली आहे तसेच भाविकांच्या रांगा लागू नये म्हणून व्यवस्थित सोय केलेली आहे तसेच पंढरपुरातील मठ यासाठी सज्ज झाली आहे वारकऱ्यांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी मदत सेवा केंद्र उभारण्यात आले आहेत.

आजूबाजूचे सर्व मठ मंदिर भक्तनिवास गर्दीने भरून गेलेली आहे तसेच मंदिर समिती तर्फे भक्तांना प्रसाद म्हणून खिचडीचे वाटप करण्यात येत आहे.

Leave a Comment