weather news: राज्यात पुन्हा पावसाची शक्यता; हवामान विभाग ने दर्शवला अंदाज!

राज्यात पुन्हा पावसाची शक्यता हवामान विभागानी दर्शवला अंदाज

weather news: राज्यात पुन्हा पावसाची शक्यता; हवामान विभाग ने दर्शवला अंदाज!

गेल्या ऑगस्ट महिन्यात संपूर्ण राज्यभरात पावसानी पाठ फिरवली होती. त्यातच राज्यातील शेतकऱ्यांसह तसेच सामान्य लोकांचं लक्ष पावसाकडे लागल होत. सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीलाच राज्यभरात पावसानी हजेरी लावल्याचे आपल्याला दिसून येते.
परंतु गेल्या चार पाच दिवसात राज्यात पुन्हा पावसाची उघडझाप झाल्याचे दिसते.आलेलं पीक जगवण्यासाठी हवा तसा पाऊस आजून राज्यात झालेला नाही त्यामुळे राज्यातील शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण बघायला मिळतंय पाऊस नसल्याने धरणातील पाणी पातळी कमी होत चालल्याने चिंता अजूनच वाढत चालली आहे.
त्यातच आता हवामान खात्यांनी येत्या काही दिवसात पावसाचा इशारा दिला आहे. राज्यातील काही जिह्यात हवामान विभागानी येल्लो अलर्ट जरी केला आहे. तसेच हवामान खात्यांनी राज्यातील पावसाचा जोर वाढणार असल्याने नागरिकांना खबरदारीचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे मुंबई,ठाणे,कोकण आणि पुणे भागात पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
आजपासून राज्यातील पावसाचा जोर वाढणार असल्याचेही हवामान विभागानी सांगितले आहे. येत्या आठवड्याभरात विदर्भ,मध्य महाराष्ट्र,मराठवाडा याठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली आहे.

Leave a Comment