animal food poisoning: हे गवत खाल्ल्यामुळे जनावरांना विषबाधेची शक्यता! हे करा लगेच घरगुती उपाय ?
पावसाच्या अभावामुळे आपल्या शेतात तनाचे प्रमाण खूप वाढले आहे शेतबरोबरच बांधवर ही विविध प्रकारचे गवत वाढले आहे यात काही गवत जनावरना खाण्या योग्य नसते हे गवत खाल्याने विषबाधा होणेची श्यकता असते.
काळजी घेऊनही जर आशे झाले तर की करावे हे सर्व खालील लेखात पाहणार आहोत
सध्या शेतात काँग्रेस ज्याला काही भागात गाजरगवत असेही म्हणतात हे खूप वाढले आहे . पौष्टिक चार कमी असल्यामुळे आपले जनावर हे गाजरगवत खात आहे का? जर खात असेल तर त्यास विषबाधेची शक्यता आहे.
ह्या गवताच्या सेवनामुळे आपल्या जनावरच्याच नव्हे तर आपल्याही प्रकृतीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे .
आपल्या जनावराने हे गाजर गवत खाल्ले आहे हे कसे ओळखायचे ?
त्यावर चांगला घरघुती उपाय काय ? हे सगळे जाणून आपण पुढे जाणून घेऊ.
गाजर गवताचा एक विशिष्ट कडवट घाण वास येतो.
हे गवत जर आपल्या जनावराने खाल्ले असेल तर ते दूध कडवट लागते.
ह्या गाजर गवताच्या परागकणांमुळे जनावरांना आणि आपल्यालाही वेगवेगळ्या प्रकारची ऍलर्जी होण्याची शक्यता असते.
जर अशी विषारी वनस्पती किंवा हे गाजर गवत जर आपल्या जनावराने खाल्ले असेल तर त्या जनावराच्या अंगावर विविध ठिकाणी जखमा दिसून येतात. शरीरावरील केस ही जातात,मुख्यतः मान व खांद्याकडील केस जातात.
त्वचा पांढरी पडते तसेच पापण्या व चेहेऱ्याच्या स्नायूंभोवती खाज येते. जनावराला अतिसार होऊन संपूर्ण शरीराला सूज येते.
त्वरित योग्य उपचार झाले नाहीत तर आपण आपल्या जनावरालाही गमावू शकतो.
याशिवाय जनावरालाच नव्हे तर अशा प्राण्याचे दूध पिल्याने आपल्यालाही याचा धोका होऊ शकतो कारण ते विषारी द्रव्य त्याच्या दुधात उतरते.
त्यामुळे ते दूधही कडवट लागते. असे दूध पिल्याने आपल्या शरीरावर त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात .
यावर चांगला घरघुती उपाय काय ते आपण आता बघू.
जर आपल्या जनावराने हे गाजरगवत खाल्ले असेल व त्यात आपल्याला वरील लक्षणे दिसत असतील तर त्यास लवकरात लवकर पशुवैद्याकडे दाखवा.
तसेच घरघुती उपाय म्हणून आपल्या जनावराला थोडा लसूण खाऊ घालावा . लसूण खाल्ल्यामुळे त्या जनावराची पोट दुखण्याची व्यथा व जुलाब कमी होतील. जनावराला तुळस आणि मेथीदाण्याचे पाणी पाजल्यानेही त्यांच्या प्रकृतीत फरक जाणवेल .
हे सगळे होण्यापासून टाळायचे असेल तर आपले जनावर काय खाते आहे ह्याची अत्यंत काळजी घ्या .
यात त्या जनावराचा आणि आपला दोघांचाही फायदा आहे . जनावराला जेथे रानटी किंवा विषारी गावात असेल तेथे चरायला सोडू नका . चार कापतांनाही त्या चाऱ्यात विषारी गावात किंवा काँग्रेस गावात येत तर नाहीये ना ह्याची काळजी घ्या .
आपण आपल्या जनावराच्या प्रकृतीची नीट काळजी घेतली तर आपलीही प्रकृती चांगली राहील