Khurpe Video: शेतकऱ्याचा जुगाड; बनवले नवीन पद्धतीचे खुरपे,काम होतंय डबल गतीने! कामाचा व्हिडीओ पहाच.

Khurpe Video: शेतकऱ्याचा जुगाड; बनवले नवीन पद्धतीचे खुरपे,काम होतंय डबल गतीने! कामाचा व्हिडीओ पहाच

नमस्कार शेतकरी मित्रानो सध्या सगळीकडे पेरणी झाली आहे व कोळपणी व खुरपणी ची कामे सुरु आहेत. कारण पाऊस चा जोर कमी झाला आहे व पिके जोमदार आली आहेत.

पावसाने उजाड दिली कि हि कामे आपण गतीने करत असतो पण कितीही गतीने केले तरी मजूर न मिळणे किंवा कमी मजूर मिळणे या कारणामुळे आपले काम संथ गतीने होतात.

त्यात आपण पारंपरिक पद्धतीचे शेती अवजारे वापरतो त्यामुळे कामाची गती कमी असते.

पण आता देशात विविध कृषी विद्यापीठे झाली आहेत व कृषी तज्ञ यांचे म्हणणे असते कि आपण अत्याधुनिक व काळानुरूप नवीन आलेली शेती अवजारे वापरायला हवीत.

पण बऱ्याच वेळा हि अवजारे महाग असतात किंवा आपल्या लोकल मार्केट मध्ये उपलब्ध नसतात. तेंव्हा आपल्यालाच आपल्या भागातील शेतरूप प्रमाणे आपल्याला अवजारे बनवावी लागतात.

सध्या सगळीकडे खुरपणी सुरु आहे आणि या दरम्यान या काळातच एका शेतकऱ्याचा अनोख्या पद्धतीच्या खुरप्याने खुरपणी करतानाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये त्याची खुरपण्याची गती पारंपरिक खुरप्याने खुरपणे पेक्षा जास्त आहे.

कशापद्धतीने आहे हे आधुनिक खुरपे ?

आपण पूर्वी पासून पाहत आलो आहे कि खुरपे हे मागे मूठ व पुढे थोडासा कर्व्ह आकारामध्ये असते व म्हणजे छोटा विळा असतो त्याप्रमाणे असते

पण व्हिडीओ मधील शेतकऱ्याने बनवलेले खुरपे हे थोडास वेगळे आहे.

या खुरप्याला मग मूठ आहे व पुढे करवातीप्रमाणे चक्र आहे ज्याला कि टोकदारपणा आहे व या खुरप्याची लांबी जास्त आहे. ज्यामुळे खुरपणी बसून न करता उभं राहूनही करता येते आहे.

हा शेतकरी कोणत्या भागातील आहे हे अद्याप समजले नसले तरी विविध शेतकरी बांधवांकडून याचे कौतुक होत आहे आणि का होणार नाही कारण जर या नवीन खुरप्याने जर शेतकरी बांधवांचे कष्ट कमी व जास्त काम होत असतील तर शेतकरी बांधव कौतुक करतील च ना, बरोबर आहे ना.

शेतीमध्ये सध्या अशा प्रकारेच आधुनिक यंत्रे वापरून शारीरिक कष्ट कमी करून स्मार्ट पद्धतीने शेती करणे सध्याच्या काळाची गरज आहे.

शेतकरी बांधवानो तुम्ही हा व्हिडीओ पाहायचा आहे व तुम्हाला या खुरप्याबद्दल काय वाटते ते कमेंट मध्ये तुमचे मत मांडा.

खुरप्याचा व्हिडीओ पाहण्यासाठी

👇👇👇

येथे क्लिक करा

Leave a Comment